Home » Blog » Delhi election : दिल्ली निवडणुकीत ‘कचरा’

Delhi election : दिल्ली निवडणुकीत ‘कचरा’

यमुनेचे पाणीही पेटलेले…

by प्रतिनिधी
0 comments
Delhi election

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे रण चांगलेच पेटले आहे. यमुना नदीच्या पाणी प्रदूषणाचा मुद्दा आम आदमी पक्षाने उचलून धरला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे एकाहून एक नेते उत्तरे द्यायला सरसावले आहेत. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हेही या प्रश्नावर अरविंद केजरीवाल कसे खोटे बोलत आहेत, ते सांगू लागले आहेत. त्यात आता ‘आप’च्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी उडी घेत स्वपक्षाविरोधातच बंड करत केजरीवाल यांच्या घरासमोर कचरा टाकला आणि भाजपच्या हाती आयते कोलीत दिले. (Delhi election)

पोलिसांनी मालिवाल यांना ताब्यात घेतले आहे. दिल्ली शहरात मोठ्या प्रमाणात कचरा पडून असतो, असे सांगत मालिवाल यांनी टेम्पोतून आणलेला कचरा स्वत: फावडे घेऊन केजरीवाल यांच्या घरासमोर ओतायला सुरुवात केली. रस्त्यावर कचरा टाकू नका, असा इशारा पोलीस वारंवार देत होते, मात्र त्यांनी काहीही न ऐकता कचरा ओतायला सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी नाईलाजाने त्यांना ताब्यात घेतले. (Delhi election)

‘आप’ धोकेबाज : अमित शहा

आम आदमी पक्ष (आप) धोकेबाज आणि खोटारडा असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. रोहिणी येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीत ते बोलत होते. केजरीवाल यांनी निवासी भागातील दारू दुकाने बंद करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु दुकाने बंद करण्याऐवजी मंदिरे आणि शाळांच्याजवळही दुकानांना परवानगी दिली. हजारो कोटीचा मद्यघोटाळा केल्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले, असा आरोपही शहा यांनी यावेळी केला.

दिल्ली विधानसभेसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होत आहे. निकाल ८ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांकडून राजकारण : केजरीवाल

दिल्लीत खुलेआम पैसे आणि चादरी वाटल्या जात आहेत. निवडणूक आयोग यावर काहीच करत नाही. मुख्य निवडणूक आयुक्त राजीकुमार राजकारण करत आहेत. आम्ही यमुना नदीतील तीन बाटल्या पाणी त्यांना पाठवू. त्या पत्रकार परिषद ते पाणी पिऊन दाखवावे, असे आव्हान आपचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी दिले. (Delhi election)

ते म्हणाले, राजीव कुमार १८ फेब्रुवारीला निवृत्त होत आहेत. त्यानंतर त्यांना नोकरी हवी आहे. त्यांनी निवडणूक आयोग उद्ध्वस्त केला आहे. इतिहास त्यांना माफ करणार नाही. त्यांना राजकारणच करायचे असेल तर त्यांनी दिल्लीतील कोणत्याही विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले.

हेही वाचा :

लखनौ, प्रयागराज तुंबले!
कुराण जाळणाऱ्याची हत्या
रश्मी शुक्ला यांचा राजीनामा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00