Home » Blog » Delete Data : मोबाईलमधील डाटा डिलीट केल्याची कोरटकरची कबुली!

Delete Data : मोबाईलमधील डाटा डिलीट केल्याची कोरटकरची कबुली!

कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतले

by प्रतिनिधी
0 comments
Delete Data

कोल्हापूर : प्रतिनिधी : राष्ट्रपुरुषांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नागपूरचा प्रशांत कोरटकरने मोबाईलमधील डाटा डिलीट केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. बुधवारी (२६ मार्च) कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले. पोलिसांनी पाच तासाहून अधिक वेळ जबाब घेतला आहे. (Delete Data)

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिलेल्या प्रशांत कोरटकरच्या मुसक्या कोल्हापूर पोलिसांनी आवळल्यानंतर त्याला तेलंगणातून काल मंगळवारी (दि.२५) कोल्हापूरात आणले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (Delete Data)

जुना राजवाडा पोलिस ठाण्यात कोरकटराचा गुन्हा नोंद झाला असला तरी त्याची रवानगी राजारामपुरी पोलिस ठाण्यातील कोठडीत करण्यात आली आहे. कोरटकराचा पाच तपास जबाब घेण्यात आला. मोबाईलमधील इतिहास संशोधक सावंत यांना दिलेली धमकी, राष्ट्रपुरुषांविषयी केलेले वक्तव्याचा डाटा, मोबाईल नंबर, कॉल डिलिट केल्याची कबुली दिली. गुन्हा नोंद झाल्यानंतर कोरटकरांचे वास्तव्य कुठे होते, त्याला कोण भेटले याची माहिती पोलिस घेत आहेत. (Delete Data)

गुन्हा नोंद झाल्यावर कोरटकरने मोबाईल वापरण्याचे टाळले होते अशी माहिती तपासात पुढे आली आहे. तसेच त्याने आपण पकडले जाऊ या भितीने त्याने युपीआय पेमेंट टाळून रोखीने व्यवहार केल्याची कबुली दिली. हैद्राबादला पळून जाण्याचा प्लॅन असल्याच् त्याने सांगितले. पण तत्पूर्वी कोल्हापूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. चंद्रपूरमध्ये त्याचा मुक्काम कुठे होता? त्याला कोण भेटले? याची माहिती पोलिस घेत आहेत. (Delete Data)

सहा तासाहून अधिक वेळ घेतले आवाजाचे नमुने

कोरटकरने सावंत यांना मोबाईलवरुन धमकी दिली होती. हे आपले संभाषण नव्हते असा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतले. फॉरेन्सिक लॅबच्या दोन अधिकाऱ्याने राजारामपुरी पोलिस ठाण्यात कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेतले. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास फॉरेन्सिकचे अधिकारी पोलिस ठाण्यात आले होते. सायंकाळी सात वाजेपर्यंत त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यात काम सुरू होते. (Delete Data)

साधे जेवण आणि कोठडीतच मुक्काम

प्रशांत कोरटकरला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणार असल्याची चर्चा सुरू असताना फिर्यादी इंद्रजीत सावंत यांनी पोलिस ठाण्यातील सर्व कार्यालये आणि आवारातील सीसीटीव्ही सुरू आहेत का? असल्याचे त्याचे तपशील मागितले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून कोरटकरला आरोपीची वागणूक मिळत असल्याची माहिती पुढे आली आहे. तपासाव्यतिरिक्त त्याला पोलिस कोठडीत ठेवले जात आहे. चौकशीसाठी त्याला पोलिस निरीक्षकांच्या खोलीत आणले जाते. त्याला नेहमीच्या आरोपीप्रमाणे चपाती, उसळ असे जेवण दिले जाते. कोठडीतील सर्वच संशयित आरोपींना चपाती उसळच दिली जाते. (Delete Data)

हेही वाचा :  

जयकुमार गोरे प्रकरणाची ए टू झेड स्टोरी

सकाळी प्रेयसीसोबत, संध्याकाळी ठरलेल्या मुलीशी लग्न

सभागृहात मला बोलूच दिले जात नाही…

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00