बेंगळुरू : कर्नाटक विधानसभेतून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सावरकरांचे नातू रंजीत सावरकर यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. या निर्णयाचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावरही पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. (Karnataka Assembly)
कनार्टक सरकारने बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमधील सावरकरांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे. स्वातंत्र्य चळवळीत सावरकरांचे कसलेही योगदान नसल्याचे सांगत काँग्रेस सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे. २०२२ मध्ये तत्कालीन भाजप सरकारचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सरकारने स्वा. सावरकरांची प्रतिमा विधानसभेत लावली होती.
सावरकरांचे नातू रंजीत सावरकर यांनी ‘सीएनएन नेटवर्क १८’ या वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेसच्या या निर्णयावर टीका केली आहे. काँग्रेसला या निर्णयाची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. रंजीत सावरकर म्हणाले, काँग्रेस सरकार असे करेल असे वाटत नव्हते. मात्र सावकरांचा अपमान करण्याचे त्यांचे प्रयत्न कायम आहेत. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. सावरकर यांच्या तुलनेत नेहरुंचे योगदान किती आहे?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे स्वातंत्र्यांची लढाई सावरकर लढले नाहीत. त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली आहे, यावर काँग्रेस ठाम आहे.
हेही वाचा :
- देश बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार चालला पाहिजे
- कर्नाटक पोलिसांची दडपशाही
- शेतकरी आंदोलन; रस्त्यावरील अडथळे दूर करण्याची मागणी फेटाळली