कोल्हापूर : प्रतिनिधी : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि कलासागर अकॅडमीच्यावतीने रविवारी नऊ मार्चला वाई (जि. सातारा) येथे होणा-या ३५ व्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात सातारा जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील चार ज्येष्ठांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन होत आहे.(DAMASA)
ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर (सातारा), ज्येष्ठ समीक्षक डॉ. पंडित टापरे (वाई), कवयित्री प्रा. डॉ. रामकली पावसकर (पाटण) आणि साहित्यिक कार्यकर्ते दिनकर झिंब्रे (सातारा) यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून संबंधितांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीनगरी (सावकार लॉन, शहाबाग, वाई) येथे सकाळी दहा वाजता संमेलनाच्या उद्घाटन समारंभात हा सत्कार समारंभ होईल.(DAMASA )
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्या परिसरातील साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठांचा सन्मान केला जातो. यापूर्वी सांगली येथील संमेलनात ज्येष्ठ लेखिका कमल देसाई, पेठवडगाव येथे डॉ. गो. मा. पवार, निपाणी येथे साहित्यिक महादेव मोरे, प्रकाशक अनिल मेहता आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, कराड येथे साहित्यिक कार्यकर्ते पंढरीनाथ शेवाळे, साहित्यिक आनंद विंगकर आदींचे सत्कार करण्यात आले होते.
हेही वाचा :
भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत हत्या