Home » Blog » Dalit Women Raped :दलित तरुणीच्या ‘केरळ स्टोरी’ने हादरा

Dalit Women Raped :दलित तरुणीच्या ‘केरळ स्टोरी’ने हादरा

१३ वर्षाची असल्यापासून ६४ जणांकडून लैंगिक शोषण

by प्रतिनिधी
0 comments
Dalit Woman Raped

कोची : केरळमधील दलित तरुणीवर ती १३ वर्षाची असल्यापासून आतापर्यंत ६४ जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  या ‘केरळ स्टोरी’ने केरळ राज्य हादरून गेले आहे. अत्याचार करणाऱ्यांमध्ये तिचे शेजारी, क्रीडा प्रशिक्षक आणि तिच्या वडिलांच्या जवळच्या मित्रांचाही समावेश असल्याचे तिने सांगितले. समुपदेशनादरम्यान संबंधित तरुणीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी उलगडली.(Dalit Women Raped)

पथकाने यासंबंधीची माहिती जिल्हा बालकल्याण समितीला दिली. त्यानुसार लगेच पोलिसांशीही संपर्क साधण्यात आला. तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत २८ जणांना अटक केली आहे. त्यांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आणखी काहीजणंना अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी संबंधितांच्या शोधासाठी २५ जणांचे पथके तयार केली आहेत.(Dalit Women Raped)

राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली. राष्ट्रीय महिला आयोगानेही यासंबंधी केलेल्या कारवाईसंबंधीचा अहवाल मागवला आहे. बालकांचे लैंगिक शोषण विरोधी कायदा-पोक्सो आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकारी नंदकुमार एस यांनी, संबंधित तरुणी अल्पवयीन असतानाही अत्याचार झाला आहे. त्यामुळे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

‘बीबीसी’ हे वृत्त दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी १३ वर्षांची असताना कथित अत्याचाराला सुरुवात झाली. तिच्या शेजाऱ्याने तिचा विनयभंग केला. तिची आक्षेपार्ह छायाचित्रे घेतली, असे वृत्त न्यूज मिनिट वेबसाइटने वृत्त दिले आहे.(Dalit Women Raped)

अत्याचारानंतर आक्षेपार्ह छायाचित्रे

ती १६ वर्षांची असताना तिच्या शेजाऱ्याने तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केला. अत्याचाराचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. ते इतर अनेकांसोबत शेअर केले. आणखी काहीजणांनी तिच्यावर अनेकदा अत्याचार केले. जिल्ह्याच्या बालकल्याण समितीचे प्रमुख असलेल्या एका वकिलाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ती तरुणी खेळाडू आहे. तिने विविध क्रीडा शिबिरांत सहभाग घेतला होता. त्यावेळी तिच्यावर क्रीडा प्रशिक्षकाकडून गैरवर्तन झाले असण्याची शक्यता आहे.

गेल्या पाच वर्षांत तिच्यावर तीन वेळा सामूहिक बलात्कार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कथित अत्याचाराबद्दल महिलेच्या कुटुंबाला माहिती नव्हती.

समुपदेशकांसमोर संबंधित तरूणीने आपल्यावरील अत्याचाराचा उलगडा केल्यानंतर बालकल्याण समितीला अलर्ट केले आणि महिलेला तिच्या आईसह समितीसमोर हजर राहण्यास सांगितले. तिच्या संरक्षणासाठी तिला बालकल्याणशी संबंधित निवारागृहात हलवण्यात आले आहे.

हेही वाचा :

गोळी सुटली, आमदाराच्या डोक्यात घुसली…

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00