कोल्हापूर; प्रतिनिधी : नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी परदेशात गेला तरी आपल्या मातीची आपल्या राज्याची सेवा करण्यासाठी पुढे या. आई-वडील आणि समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या कार्यातूनच देशभक्त बना असे आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ,तळसंदेचा पहिला दीक्षांत समारंभ आज (ता.७) उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. (D Y Patil College University)
कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ.के.प्रथपन,कुलसचिव डॉ.जे.ए.खोत,परीक्षा नियंत्रक डॉ. गुरुनाथ मोटे,बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य,अँकेडमिक कौन्सिल मेंबर्स व्यासपीठावर उपस्थित होते.
तळसंदे एज्युकेशनल सिटीमधील शांताई सभागृहात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी उद्योगमंत्री पुढे म्हणाले, शेतीसाठी जमीन विकत घेणारी व्यक्ती त्याच जमिनीवर कृषी विद्यापीठ उभारतो हाच मोठा आदर्श आहे. हे विद्यापीठ लवकरच देशातील एक नंबरचे कृषी आणि तंत्र विद्यापीठ बनेल याची खात्री आहे.जमिनीवर पाय ठेवून चालणाऱ्या आणि आपल्या वागण्या बोलण्यातून नम्रपणाचा प्रत्यय देणारे पाटील कुटुंबीय सर्वांनीच आदर्श घ्यावा असे आहेत. ज्या संस्थेने आपल्याला मोठे केले त्या संस्थेला कधी विसरू नका. असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. (D Y Patil University)
यावेळी अग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांचा डी. लिट तर जैन इरिगेशनचे अनिल जैन यांना डी. एससी पदवीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. तर कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते यावेळी ६६१ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. १८ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात आले.
अनिल जैन मनोगतात म्हणाले, कृषी आणि तंत्रज्ञान या दोन्हींवर फोकस करून या विद्यापीठाचा सुरू असलेला प्रवास अभिमानास्पद आहे. कृषी क्षेत्राची गरज व व्याप्ती सतत वाढतच जाणार असून या माध्यमातून भारताच्या विकासामध्ये सहभागी होण्याची संधी तरुणाईला मिळणार आहे.तसेच डेडीकेशन व कमिटमेंट आणि त्याला हार्डवर्क आणि स्मार्ट वर्कची जोड दिल्यास कोणतेही यश अशक्य नसल्याचे त्यांनी सांगितले तर संपादक आदिनाथ चव्हाण यांनी आपल्याला मिळालेली डि.लीट. ही पदवी ही शेती, माती व शेतकऱ्यांसाठी समर्पित करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले देशातील पहिल्या कृषी विद्यापीठा कडून देशातील पहिल्या कृषी विषयाला वाहिलेल्या दैनिकाच्या संपादकाला मिळालेली डि लीट ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. (D Y Patil University)
कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तळसंदे येथील ओसाड माळरान ते गोल्डन लँड हा प्रवास मांडला. या ठिकाणी कृषी शिक्षण देणारे विद्यापीठ उभारण्याचा विचार, ते सुरू करण्यासाठी घेतलेली मेहनत व प्रत्यक्ष विद्यापीठाची स्थापना यांचा प्रवास त्यांनी सांगितला. या सर्व प्रक्रियेत तत्कालीन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. या विद्यापीठाचा जागतिक पातळीवर नावलौकिक होण्यासाठी सर्व सहकारी नक्कीच मेहनत घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाकुलगरू डॉ. के. प्रथापन यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडला. विद्यापीठ व प्राध्यापकाना मिळालेले विविध पुरस्कार, यश याबाबतची माहिती दिली
कुलगरू डॉ. के. प्रथापन यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडला. विद्यापीठ व प्राध्यापकाना मिळालेले विविध पुरस्कार, यश याबाबतची माहिती दिली. यावेळी सौ पूजा ऋतुराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, अजितराव पाटील बेनाडीकर, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. ए. एन. जाधव, डी. वय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, कृषी व तंत्र विद्यापीठाचे वित्त अधिकारी सुजित सरनाईक, अधिष्ठाता डॉ. संग्राम पाटील, डॉ. मुरली भूपती, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, सीएचआरओ श्रीलेखा साटम, चव्हाण व जैन कुटुंबीय यांच्यासह डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थामधील प्राचार्य, प्राध्यापक, पदवीप्राप्त विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :
- विनेश फोगाटने भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपट
- व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांना वैद्यकीय क्षेत्रासाठीचे नोबेल जाहीर
- सांगली : बिळूर-डोर्ली गावात पोलिसांची कारवाई; ४६ लाखांचा गांजा जप्त