भुवनेश्वरः बंगालच्या उपसागरातून उगम पावलेले चक्रीवादळ ‘दाना’ ताशी १८ किलोमीटर वेगाने ओडिशाच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. ओडिशातील भद्रकमध्ये गुरुवारी सकाळी पावसाला सुरुवात झाली. चक्रीवादळ आज मध्यरात्रीनंतर किंवा पहाटे दोन वाजता भितरकणिका राष्ट्रीय उद्यान आणि धामरा बंदराजवळ उतरेल. (Dana Cyclone)
भुवनेश्वर हवामान केंद्राच्या मते, लँडफॉलची प्रक्रिया ५ तास चालेल. या वेळी, वादळ ओडिशाच्या उत्तरेकडील भागातून ताशी १२० किलोमीटर वेगाने पुढे जाईल. ओडिशा आणि पश्चिम बंगालवर या वादळाचा सर्वाधिक परिणाम होणार आहे. त्यामुळे भुवनेश्वर आणि कोलकाता विमानतळांवर गुरुवारी संध्याकाळी ५ ते २५ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजेपर्यंत सुमारे १६ तास उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याशिवाय ५५२ गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. दक्षिण पूर्व रेल्वेने १५० गाड्या रद्द केल्या आहेत. ‘ईस्ट कोस्ट रेल्वे’ने १९८ गाड्या रद्द केल्या आहेत. ‘ईस्टर्न रेल्वे’ने १९० गाड्या रद्द केल्या आहेत आणि ‘दक्षिण पूर्व मध्य रेल्वे’ने १४ ट्रेन रद्द केल्या आहेत. (Dana Cyclone)
ओडिशातील १४ जिल्ह्यांमध्ये २५ ऑक्टोबरपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. या जिल्ह्यांतील १० लाख लोकांना स्थलांतरित केले जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व पर्यटन उद्याने, ओडिशा उच्च न्यायालय २५ ऑक्टोबरपर्यंत बंद करण्यात आली आहेत. ओडिशाने राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, ओडिशा आपत्ती निवारण दल आणि अग्निशमन दलाच्या २८८ तुकड्या तैनात केल्या आहेत.
हेही वाचा :
- ‘सेबी’च्या प्रमुख माधवी बुच चौकशीला गैरहजर
- जागावाटपात काँग्रेसचा ‘हाथ’ खाली
- अनिल देशमुखांचा ‘होम मिनिस्टर’, ऐन निवडणुकीत वाढविणार संशयकल्लोळ!