नवी दिल्ली : आरोपीच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी चंदीगड सीबीआय न्यायालयाने हिमाचल प्रदेशचे पोलीस महानिरीक्षक (आयजी) झहूर हैदर जैदी यांच्यासह सात पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.(Custodial death)
२०१७ मध्ये शिमल्याच्या कोटखाई येथे एका १६ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचा कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.
दोषी पोलीस अधिकाऱ्यांमध्ये तत्कालीन पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) मनोज जोशी, उपनिरीक्षक राजिंदर सिंग, सहायक उपनिरीक्षक दीप चंद शर्मा, हेड कॉन्स्टेबल मोहन लाल, सुरत सिंग आणि रफी मोहम्मद, कॉन्स्टेबल रणजीत सटेटा यांचा समावेश आहे. (Custodial death)
शिक्षेच्या सुनावणीदरम्यान, दोषींच्या वकिलांनी त्यांचे वय, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि चांगल्या सेवा रेकॉर्डचा हवाला देऊन सौम्य शिक्षा देण्याची मागणी केली. मात्र ती फेटाळली. न्यायालयाने दोषींना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. १८ जानेवारी २०१७ रोजी कोटखाई पोलीस ठाण्यात आरोपी सूरजचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने आठ पोलीस अधिकाऱ्यांना दोषी ठरवले होते. विशेष न्यायाधीश अलका मलिक यांच्या कोर्टात सुनावणी झाली. (Custodial death)
सीबीआयचे वकील अमित जिंदाल यांच्या म्हणण्यानुसार, दोषी अधिकारी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) ३०२ (हत्या), १२०-बी (गुन्हेगारी कट), ३३० (स्वेच्छेने कबुलीजबाब देण्यासाठी दुखापत करणे), ३४८ (चुकीच्या पद्धतीने बंदिवासात ठेवणे) आणि १९५ (खोटे पुरावे देणे) सह अनेक कलमांखाली दोषी आढळले.(Custodial death)
४ जुलै २०१७ रोजी एक मुलगी बेपत्ता झाली होती. दोन दिवसांनी तिचा मृतदेह सापडला. पोस्टमॉर्टममध्ये तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे सिद्ध झाले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास केला.
या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने झैदी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले होते. पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सूरजसह सहाजणांना एसआयटीने अटक केली. मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला राजिंदर या अन्य आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. सूरजचा कोठडीत मृत्यू झाला होता.(Custodial death)
त्यानंतर हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने दोन्ही प्रकरणे पुढील तपासासाठी सीबीआयकडे वर्ग केली. चौकशीनंतर, सीबीआयने जैदी, जोशी आणि सूरजच्या कोठडीतील मृत्यूशी संबंधित इतर पोलिस अधिकाऱ्यांना अटक केली. विशेष सीबीआय न्यायालयाने या सर्वांना दोषी ठरवले. न्यायालयाने तत्कालीन पोलीस अधीक्षक डीडब्ल्यू नेगी यांची या खटल्यात निर्दोष मुक्तता केली.
हेही वाचा :
भाजपशासित उत्तराखंडमध्ये धडाधड फायरिंग
लग्न मोडलं, नोकरी गेली…