13
ठाणे : महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. केदार दिघे यांच्या गाडीतून दारू आणि पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Kedar Dighe)
गाडीतून दारू आणि पैसे वाटप करत असताना केदार दिघे स्वतः गाडीत उपस्थित होते आणि वाटप करत असताना शिंदेंच्या शिवसैनिकांनी त्यांना रंगेहाथ पकडले. शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी वर्षा भोसले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार म्हणून केदार दिघे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.