Home » Blog » Cooking Gas price hike: मोदी सरकारचा सामान्यांना झटका

Cooking Gas price hike: मोदी सरकारचा सामान्यांना झटका

गॅस सिलिंडर दरात ५० रुपयांची वाढ

by प्रतिनिधी
0 comments
Cooking Gas price hike

नवी दिल्ली : मोदी सरकारने सोमवारी (७ एप्रिल) सर्वसामान्यांना झटका दिला. एलपीजीच्या किमतीत प्रति सिलिंडर ५० रुपयांनी वाढ केली. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या त्रासात आणखी भर पडली आहे. (Cooking Gas price hike)

नव्या गॅस दरवाढीनुसार, उज्ज्वल्ला योजनेतील लाभार्थ्यांसाठी सिलिंडरची किंमत ५०० रुपयांवरून ५५० रुपये आणि सामान्य वापरकर्त्यांसाठी ८०३ रुपयांवरून ८५३ रुपये होईल असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले.

‘‘एलपीजीच्या प्रति सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढेल. ५०० वरून ते ५५० (पीएमयूवाय लाभार्थ्यांसाठी) आणि इतरांसाठी ते ८०३ रुपयांवरून ८५३ रुपये होईल. या दरवाढीचा नंतर आढावा घेण्यात येईल. आम्ही दर २-३ आठवड्यांनी यासंबंधीचा आढावा घेऊन दर ठरवले जातात,’’ पुरी म्हणाले. (Cooking Gas price hike)

‘‘सध्या चर्चेत असलेले उत्पादन शुल्क पेट्रोल आणि डिझेलवर ग्राहकांवर लादली जाणार नाही. “तेल विपणन कंपन्यांना गॅस पुरवठ्यामुळे झालेल्या ४३,००० कोटी रुपयांच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी ही अबकारी कर वाढ करण्याचा हेतू आहे,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.

पुरी म्हणाले की, एलपीजीवरील वाढीचा दर १५-३० दिवसांनी आढावा घेतला जाईल. (Cooking Gas price hike)

“प्रति सिलिंडर ५० रुपयांची ही वाढ उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी तसेच इतर लाभार्थ्यांसाठीही असेल. दर १५-३० दिवसांनी याचा आढावा घेतला जाईल. पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत, जर हाच ट्रेंड कायम राहिला तर त्यांच्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे.”

सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्कात प्रत्येकी २ रुपयांची वाढ केल्यानंतर गॅस दरवाढ करण्यात ली आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पेट्रोलवरील उत्पादन शुल्क १३ रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील १० रुपये करण्यात आले आहे.

तथापि, पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले की किरकोळ किमतींवर या वाढीचा परिणाम होणार नाही.

हेही वाचा :
शेअर बाजारात तांडव

 भ्रमाचा भोपळा फुटला; आता मोदी कुठायत?

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00