महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणूक धर्तीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान कॉंग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी (Congress Candidate 2nd List) आज (दि.२६) जाहीर केली. या यादीत एकुण २३ उमेदवार आहेत. यापूर्वी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर केली. या यादीत एकुण ४८ जणांची उमेदवारी जाहीर केली होती. आतापर्यंत एकुण ७१ जणांची नावे जाहीर केली आहेत. लवकरच तिसरी यादीही कॉंग्रेस जाहीर करणार आहे.
Congress Candidate 2nd List : कोणाला मिळाली उमेदवारी?
कॉंग्रेस पक्षाने दुसरी यादी आज (दि.२६) जाहीर केली. याबाबत महाराष्ट्र कॉंग्रेसच्या अधिकृत एक्स (X) या सोशल मिडिया हॅंडलवर पोस्ट करत म्हटलं आहे.” भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. श्री. मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने दिलेल्या मंजुरीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.” शिरोळ मतदार संघातून गणपतराव पाटील तर निलंगा मतदार संघातून अभयकुमार साळुंखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. जाणून घेवूया विधानसभा मतदार संघ आणि उमेदवार यांची यादी.
- शिरोळ – गणपतराव पाटील
- निलंगा – अभयकुमार साळुंखे
- भुसावळ – डॉ. राजेश तुकाराम मानवतकर
- जळगाव (जामोद) – श्रीमती स्वाती संदिप वाकेकर
- अकोट – महेश गांगणे
- वर्धा – शेखर प्रमोदबाबू शेंडे
- सावनेर – अनुजा सुनील केदार
- नागपूर दक्षिण – गिरीष कृष्णराव पांडव
- कामठी – सुरेश यादवराव भोयार
- भंडारा – पूजा गणेश तावकर
- अर्जुनी मोरगाव – दिलीप वामन बनसोड
- आमगाव – राजकुमार लोटूजी पुरम
- राळेगाव – वसंत पुरके
- यवतमाळ – अनिल मंगुळकर
- अर्णी – जितेंद्र मोघे
- उमेरखेड – साहेबराव कांबळे
- जालना – कैलास गोरंट्याल
- औरंगाबाद पूर्व – मधुकर देशमुख
- वसई – विजय पाटील
- कांदिवली पूर्व – काळू बधेलिया
- चारकोप – यशवंत सिंह
- सायन कोळीवाडा – गणेश यादव
- श्रीरामपूर – हेमंग ओगले
महाविकास आघाडीच्या झालेल्या पत्रकार परिषदेत आघाडीतील कॉंग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाला ८५-८५-८५ असे सुत्र ठरले होते. या घोषणेप्रमाणे या याद्या (List) जाहीर होत आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. श्री. मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने दिलेल्या मंजुरीनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ साठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.… pic.twitter.com/aTcHiWtDc1
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 26, 2024
हेही वाचा
- जागावाटपात काँग्रेसचा ‘हाथ’ खाली
- अनिल देशमुखांचा ‘होम मिनिस्टर’, ऐन निवडणुकीत वाढविणार संशयकल्लोळ!
- विधानसभा निवडणूूकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर
- महाविकास आघाडीतील वाद विकोपाला