Home » Blog » क्लाऊड! एक आधार स्तंभ

क्लाऊड! एक आधार स्तंभ

क्लाऊड! एक आधार स्तंभ

by प्रतिनिधी
0 comments
cloud computing

माहिती तंत्रज्ञानाच्या (Information Technology) मायाजालात आजकाल जे काही परवलीचे शब्द बनले आहेत, त्यातील एक म्हणजे ‘क्लाऊड ’ ( cloud computing ) क्लाऊड म्हणजे नेमके काय व त्याचा उपयोग काय असा प्रश्न या क्षेत्राशी थेट संबधित नसलेल्या सर्वसामान्यांना नेहमी पडत असतो..त्याचे सहज- सोप्या भाषेत उत्तर देण्यासाठी हा लेखन प्रपंच.

इंग्रजी डिक्सनरीनुसार अर्थ शोधायला गेले तर ‘क्लाऊड ’ म्हणजे ढग. माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रात मात्र हा शब्द वेगळ्या अर्थाने परिचित आहे. क्लाऊड ही एक अशी यंत्रणा आहे की जी तयार झालेला संगणकीय डेटा (data )सुरक्षित जतन करण्याचे एक विश्वासार्ह ठिकाण म्हणता येईल. थोडक्यात सांगायचे तर माहितीच्या प्रचंड संग्रहाचे हे एक प्रकारचे गोदामच मानता येईल. तुम्हा-आम्हाला माहिती असलेल्या गोदामांत ज्याप्रमाणे वस्तूंचा साठा केला जातो त्याच धर्तीवर क्लाऊड यंत्रणेत इंटरनेटच्या माध्यमातून संगणकीय माहितीचा एक प्रकारे सुरक्षित साठा केला जातो. आपल्याला हवा तेव्हा तो साठा उपलब्ध करुन देणा्याची सेवा देण्याऱ्या संस्था, व्यवस्था अस्तित्वात आहेत. आपल्याला गरजेनुसार तो उपलब्ध करुन देतात. त्यासाठी किंमत आकारली जाते.

क्लाऊडवरुन तुमचा डेटा जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही व केव्हाही तुम्ही मिळवू शकता. वापरकर्ते ( Users कोणत्याही साधनांवर ( डिव्हाईसवर ) तो प्राप्त करु शकतात. वर्क फ्राॅम होम ( work from home ) ही संकल्पना कोविड कालवाधीत व्यापक प्रमाणात वापरली गेल्याचे आपण पाहिले. हे शक्य होण्यामागे क्लाऊडचाच मोठा आधार असतो. ज्यानुसार एकाच कंपनीतील जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलेले एका टीममधील सहकारी एकावेळी एका विषयावर ( Project) काम करु शकतात.

माहितीचा साठा करणे हे एरवी फार मोठे खर्चिक काम ठरु शकते. त्यामुळे जगभरातील विविध व्यावसायिक संस्था आणि व्यक्तीगत वापरकर्तेही क्क्लाऊड सेवेचा आधार घेवून आपल्या पायाभूत यंत्रणा व देखभाल खर्चात बचत करु शकतात. एखाद्या छोट्या स्टार्टअपपासून ते बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंच सर्वानाच उपयुक्त अशी क्लाऊडची खासियत आहे.

तंत्रज्ञानात झालेल्या या क्रांतीकारी बदलांमळे क्लाऊड सेवेची उपयुक्तता व लोकप्रियताही दिवसागणिक वाढतच आहे. संगणकीय क्रांतीमुळे जग जवळ आले आहे, भौगोलिक सीमाना बंधन राहिलेले नाही असे म्हटले जाते. ते खरेही आहे . म्हपीणूनच या सर्व सेवेचा आधार असलेला एक महत्वाचा खांब असलेल्या क्लाऊडविषयी तुम्हाला अधिक जाणून घेण्याची उत्सुकता आता नक्कीच लागून राहील यात संदेह नाही.

-पी. ऋतुजा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00