Home » Blog » clash broke out in Nepal: लोकशाही चालणार नाही…!

clash broke out in Nepal: लोकशाही चालणार नाही…!

नेपाळमध्ये राजेशाहीची मागणी करत हिंसक आंदोलन

by प्रतिनिधी
0 comments
clash broke out in Nepal

काठमांडू : लोकशाही चालणार नाही, राजेशाही पूर्ववत आणा, अशी मागणी करत नेपाळमध्ये शुक्रवारी (२८ मार्च) उग्र निदर्शने करण्यात आली. यावेळी झालेल्या हिंसाचार अनेकजण जखमी झाले. आंदोलकांनी इमारती आणि कार्यालयांची तोडफोड करण्यात आली.(clash broke out in Nepal)

नेपाळला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी करत काठमांडूमध्ये शुक्रवारी आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. लोकशाही नको, राजेशाही हवी, अशी मागणी करत आंदोलकांनी रस्त्यावरील वाहने आणि इमारतींना लक्ष केले. रस्त्यावर आगी लावण्यात आल्या. पोलिसांनी या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचे कडे तोडून जमावाने चाल केली. पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. त्यात अनेक पोलिस जखमी झाले. त्यामुळे पोलिसांना अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.(clash broke out in Nepal)

राजेशाहीची मागणी करणाऱ्या घोषणा देणाऱ्या आंदोलकांच्या दिशेने पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्याचा जोरदार मारा केला. पोलिसांनी हवेत गोळीबारही केला. तिनकुने या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते. यावेळी आंदोलक राजेशाही आणि देश वाचवा, भ्रष्ट सरकारने खुर्ची खाली करावी, आम्हाला राजेशाही हवीय, अशा जोरदार घोषणा देत होते. (clash broke out in Nepal)

आंदोलकांपैकी अनेकांच्या हातात नेपाळचा राष्ट्रध्वज आणि भूतपूर्व राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या प्रतिमा होत्या. ते जोरजोरात घोषणा देत होते. त्यांच्यापैकी अनेकजण रस्त्यावर पळताना दगडफेक करत होते. (clash broke out in Nepal)

आंदोलन चिघळू नये म्हणून पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. काठमांडूमध्ये सर्वत्र मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तिनकुने, सिनामंगल आणि कोटेश्वर भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा :
शक्तीशाली भूकंपामुळे म्यानमार, थायलंडमध्ये हाहाकार
 म्यानमार, थायलंडला सर्वतोपरी मदत

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00