Home » Blog » CJI Khanna : वाद सोडवण्यासाठी मध्यस्थीचा पर्याय महत्त्वाचा

CJI Khanna : वाद सोडवण्यासाठी मध्यस्थीचा पर्याय महत्त्वाचा

सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे मत

by प्रतिनिधी
0 comments
CJI Khanna

नागपूर : प्रत्येक वादाकडे केवळ कायद्याच्या दृष्टिकोनातून न पाहता मानवतेच्या अंगाने पाहिले पाहिजे. सर्वच वाद न्यायालयात आणून खटलेबाजी करण्यासाठी गरजेचे नसतात. अनेक वाद सोडवण्यासाठी मध्यस्थीचा पर्याय महत्त्वाचा ठरतो, असे मत सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी व्यक्त केले.(CJI Khanna)

नागपूर येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षान्त समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून ते शनिवारी बोलत होते.

न्यायप्रक्रियेत लवचिकता आणण्याची गरज व्यक्त करून ते म्हणाले, भारतातील कायदेशीर मदत प्रणाली जगातील सर्वांत मजबूत व्यवस्थांपैकी एक आहे. त्यामुळे येथे सर्व घटकांना मदत मिळणे शक्य होते.(CJI Khanna)

सरन्यायाधीश खन्ना यांनी कायदेशीर कारवाई करण्याआधी आपापसांत मध्यस्थीवर जोर दिला. मध्यस्थी ही केवळ वाद सोडवण्यासाठीच उपयुक्त ठरत नाही; तर ती नातेसंबंध मजबूत करते. त्यातून मोठे समाधान मिळते. वकीलवर्ग जनतेच्या समस्या सोडवतो. त्यामुळे तो  ‘समाधानकर्ता’ आहे. कायदा आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून समस्येचे समाधान शोधले पाहिजे.

दिवसेंदिवस प्रश्न जटील होत आहेत. या प्रश्नांवर मात करण्यासाठी अधिक लवचिकता दाखवली पाहिजे. न्यायाच्या मार्गात बाधा येणार नाही, याची गरज त्यांनी व्यक्त केली. परंपरेच्या पलीकडे जाऊन विचार करून सर्वांनी न्याय प्रदान करण्याची पद्धती अधिक प्रभावी आणि वक्तशीर करण्याची गरज आहे, असे खन्ना म्हणाले.(CJI Khanna)

मानवाधिकार आणि सामाजिक न्यायव्यवस्थेवर परिणाम

आपल्या पूर्वजांनी कधी कल्पनाही केली नसेल असे अनेक जटील प्रश्न आजच्या पिढींसमोर उभे ठाकले आहेत, त्यांचा त्यांना सामना करावा लागणार आहे, असे सांगून सरन्यायाधीश म्हणाले, पाणी आणि हवा प्रदूषण हे केवळ पर्यावरणासाठीच धोक्याचे नाही तर त्यामुळे मानवाधिकार आणि सामाजिक न्यायव्यवस्थेवर परिणाम होत आहे. याशिवाय, डिजिटल विकासाशी संबंधित नवे प्रश्नही निर्माण झाले आहे. गोपनीयता आणि सुरक्षेचे मुद्दे पुढे येत असल्याचे खन्ना म्हणाले.(CJI Khanna)

हेही वाचा :

भारत-अमेरिका ‘मेगा पार्टनरशिप’!
 ‘ओपन एआय’ने मस्कची ऑफर फेटाळली

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00