Home » Blog » China AI: चॅटबॉट्स ते इंटेलिजंट टॉइज

China AI: चॅटबॉट्स ते इंटेलिजंट टॉइज

चीनची ‘एआय’ क्षेत्रातील झेप…

by प्रतिनिधी
0 comments
China AI

बीजिंग : बुद्धिबळाच्या पटावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) चालणाऱ्या रोबोला हरवण्याच्या प्रयत्नात टिमी विचारमग्न आहे… त्याचे वय अवघे आठ वर्ष. डोक्यावर हात ठेवून स्वतःशीच बडबडत तो काही आडाखे बांधतोय…(China AI)

हा एआय रोबो एखादी शोरूम किंवा लॅबोरेटरीत नाही. तो आहे टिमीच्या अपार्टमेँटमधील कॉफी टेबलवर. तर तो घरी आल्याच्या पहिल्या रात्री टिमीने त्याच्या या सोबत्याला (रोबो) कडकडून मिठी मारली.

‘‘हा तर एका छोट्या शिक्षकासारखाच आहे किंबहुना, मित्रासारखाच,’’ बुद्धिबळाच्या पटावरील पुढची चाल खेळत टिमी त्याच्या आईला सांगतो.

काही क्षणांनंतर, रोबो आवाज देतो, ‘‘ मित्रा अभिनंदन! तू जिंकलास.’’ स्क्रीनवर गोल डोळे मिचकावत तो नवीन खेळ सुरू करण्यासाठी पटावरील सोंगट्या गोळा करू लागला आणि पुढे म्हणाला, ‘‘मी तुझी क्षमता ओळखलीय, आता मी पुढच्या वेळी चांगले खेळेन….’’ (China AI)

२०३० पर्यंत तंत्रज्ञानात महासत्तेच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या चीनने ‘एआय’ स्वीकारले आहे. आता ते घरोघरी वापरले जात आहे. याचे हे प्रातिनिधीक चित्र.

चॅटबॉट, डीपसीकच्या माध्यमातून चीनने जानेवारीत जगाचे लक्ष वेधून घेतले. चीनच्या महत्त्वाकांक्षेचा हा पहिला संकेत होता.

चीनच्या तंत्र औद्योगिक विश्वात अधिक भांडवल मिळवून देणाऱ्या ‘एआय’ व्यवसायात सध्या मुबलक पैसे ओतला जात आहे. त्यामुळे देशांतर्गत स्पर्धा वाढली आहे. एआय विकसित करणाऱ्या आणि विकणाऱ्या ४,५०० हून अधिक कंपन्या आहेत. राजधानी बीजिंगमधील शाळा या वर्षाच्या अखेरीस प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी एआय अभ्यासक्रम सुरू करत आहेत. विद्यापीठांनीही ‘एआय’चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागांची संख्या वाढवली आहे. (China AI)

‘‘आधुनिक जगाची ही अपरिहार्य गरज आणि ट्रेंड आहे. आपण एआयसोबत सहअस्तित्वात राहू,’’ टिमीची आई यान झ्यू म्हणते. ‘‘मुलांनी ते लवकरात लवकर जाणून घेतले पाहिजे. आपण ते नाकारू नये.’’

२०१७ मध्ये चिनी कम्युनिस्ट पक्षाने ‘एआय’ ही देशाच्या प्रगतीची ‘मुख्य प्रेरक शक्ती’ असेल असे जाहीर केले तेव्हा त्यांनी कदाचत हेच अपेक्षिले होते. चीनची अर्थव्यवस्था मंदावली आहे. त्यातच त्यांचा सर्वांत मोठ्या व्यापारी भागीदार असलेल्या अमेरिकेने चीनवर आयात कर लादला आहे. या धक्क्याच्या पार्श्वभूमीवरअध्यक्ष शी जिनपिंग आता ‘एआय’वर मोठा भर देत आहेत. (China AI)

चीन आगामी १५ वर्षांत या क्षेत्रात १० ट्रिलियन चिनी युआन ($१.४ ट्रिलियन; £१ ट्रिलियन) गुंतवण्याची योजना आखत आहे. कारण या प्रगत तंत्रज्ञानातील त्यांची  मुख्य स्पर्धा अमेरिकेशी आहे. सध्या सुरू असलेल्या सरकारच्या वार्षिक राजकीय अधिवेशात एआय निधीसाठी आणखी एक चालना मिळाली. अमेरिकेने प्रगत चिप्ससाठी निर्यात नियंत्रणे आणखी कडक केली आहेत. चीनच्या अनेक व्यापारी कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे. त्यानंतर काही दिवसांतच, म्हणजे जानेवारीत एआयमधील गुंतवणूक निधी चीनने ६० अब्ज युआन केला आहे. (China AI)

चिनी कंपन्या कोणत्याही आव्हानांना सामोरे जाऊ शकतात, अडथळ्यांवर मात करू शकतात हे ‘डीपसीक’ने दाखवून दिले आहे. यामुळेच सिलिकॉन व्हॅलीसह अमेरिकेन आयटी उद्योगतज्ज्ञांना धक्का बसला आहे. त्यांना चीन इतक्या लवकर पुढे येईल, अशी अपेक्षा नव्हती.

तर बुद्धिबळ खेळणारा एआय रोबो बनवलाय टॉमी टँग यांनी. ते चिनीच आहेत. टिमीचा मशीन सेन्सरोबो त्यांच्या कंपनीने तयार केला. त्यांच्या फर्मने १००,००० हून अधिक रोबो विकले आहेत. त्यांचा अमेरिकेतील एका प्रमुख साखळी सुपरमार्केट कॉस्टकोसोबत करार झाला आहे. चीनची ‘एआय’ क्षेत्रातील प्रगती अशा वेगाने होत आहे.

(सौजन्य : बीबीसी)

हेही वाचा :

न्यूयॉर्कला जाणारे विमान पुन्हा मुंबईकडे

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00