Home » Blog » Chhawa : ‘छावा’ची ओपनिंग १० कोटींकडे

Chhawa : ‘छावा’ची ओपनिंग १० कोटींकडे

 महाराष्ट्रात सर्वांत जास्त प्रतिसाद

by प्रतिनिधी
0 comments
chhawa

मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाला पहिल्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंगला उदंड प्रतिसाद लाभला आहे. ओपनिंगला छावा चित्रपट दहा कोटीचा व्यवसाय करण्याकडे वाटचाल करत आहे. अॅडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटाने या आधीच सात कोटी २१ लाखांचा गल्ला गोळा केला आहे. (Chhawa)

छावा चित्रपटाची तरुणाईमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. पहिल्याच दिवशी चित्रपट पाहण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे बुकिंगवरून दिसत आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या आधीच चित्रपटाने ५.६५ कोटी रुपये कमावले आहेत. ७४४६ शोमध्ये २.०१ लाख तिकिटे विकली गेली आहेत. ब्लॉक केलेल्या जागांसह या चित्रपटाच्या अॅडव्हान्स कलेक्शनचा ७.२१ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. (Chhawa)

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्रवासीयांचे दैवत असल्याने छावाच्या अॅडव्हान्समध्ये महाराष्ट्र सर्वांत मोठा वाटा उचलणारे राज्य ठरले आहे. अॅडव्हॉन्समध्ये ३ कोटी ७१ लाख तर ब्लॉक केलेल्या जागांचा समावेश केल्यास एकूण कलेक्शन ४ कोटी ४१ लाखापर्यंत पोहोचले आहे. महाराष्ट्रात या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

हिंदी टू डी फॉरमॅटमध्ये छावा चित्रपट तिकीट विक्रीत सर्वांत आघाडीचा चित्रपट ठरला आहे. ज्याने अंदाजे पाच कोटी ३८ कोटी रुपये कमावले आहेत. उर्वरीत कलेक्शन आयमॅक्स टू डी, फोर डीएक्स आणि आयसीईसारख्या प्रीमियम फॉरमॅटमधून आले आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी रसिकांना उत्सुकता लागली आहे.

या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद असाच ठरला तर छावा पहिल्याच दिवशी दहा कोटी रुपये कमाई करण्याच्या मार्गावर आहे. असे झाले तर विकी कौशलच्या पहिल्या दिवसाच्या सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरले. ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ने पहिल्याच दिवशी आठ कोटी २० कोटी रुपयांची कमाई केली आहे. (Chhawa)

छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख भूमिकेत विकी कौशल आहे. येसुबाई राणीसाहेबांच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आहे. मुघलांविरोधात मराठा साम्राज्याच्या स्वातंत्र्यलढ्यात छत्रपती संभाजीराजे यांनी बलिदान दिले होते. हा जाज्ज्वल्य इतिहास चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी केला आहे.

हेही वाचा :

बोराडे नावाचे साहित्य शिवार
कोल्हापूर चित्रनगरीत लवकरच वस्तुसंग्रहालय

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00