Home » Blog » Chhaava beats Uri: ‘छावा’ पाचशे कोटीच्या दिशेने!

Chhaava beats Uri: ‘छावा’ पाचशे कोटीच्या दिशेने!

जगभरात कमाईचा ३४३ कोटींचा टप्पा पार

by प्रतिनिधी
0 comments
Chhaava beats Uri

मुंबई : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनित ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यातच ‘उरी’लाही मागे टाकले. जगभरात या चित्रपटाने ३४३ कोटींची कमाई केली आहे. तो लवकरच पाचशे कोटींचा टप्पा गाठू ब्लॉकबस्टर ठरेल, असा विश्वास सिनेक्षेत्रांतील जाणकार व्यक्त करत आहे.(Chhaava beats Uri)

विकी कौशलला उरी : द सर्जिकल स्ट्राइकने मोठे यश मिळवून दिले. या चित्रपटाने त्याला पैसा आणि प्रसिद्धीही मिळवून दिली. त्यानंतर आता आठवड्यापूर्वीच रिलीज झालेल्या ‘छावा’ने  आठव्या दिवशी ₹३२५ कोटींचा टप्पा ओलांडला. जागतिक पातळीवर त्याची कमाई ₹३४३ कोटींवर गेली आहे. ‘उरी’च्या एकूण ₹३४२ कोटींच्या एकूण कमाईचा टप्प्याच्याही पुढे ‘छावा’ने ही मजल केवळ एका आठवड्यातच गाठली आहे. (Chhaava beats Uri)

‘बॉलीवूड हंगामा’ नुसार, ‘छावा’ने आठव्या दिवशी, शुक्रवारी भारतात ₹२४ कोटी नेट जमा केले. यामुळे चित्रपटाचे देशांतर्गत निव्वळ कलेक्शन ₹२४९ कोटी झाले आहे. ‘उरी’चे देशांतर्गत कलेक्शन ₹२४४ कोटी होते. ‘छावा’ने परदेशातही चांगली कामगिरी केली आहे. आठ दिवसांत भारताबाहेर फक्त ५.३ दशलक्ष डॉलर्स कमावले. जगभरातील एकूण कमाई ₹३४३ कोटींवर नेली. उरी : सर्जिकल स्ट्राइकने एकूणच ₹३४२ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे ‘छावा’ विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वांत हिट्ट ठरला आहे.

‘छावा’ची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरूच आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात जबरदस्त कामगिरी केली. दुसऱ्या आठवड्याची सुरूवातही दणक्यातच झाली आहे. रविवारपर्यंत त्याची गती कायम राहिल्यास, तिसऱ्या वीकेंडपर्यंत चित्रपट ₹५०० कोटींचा टप्पा ओलांडण्याची मोठी शक्यता आहे. यामुळे हा चित्रपट निश्चित ब्लॉकबस्टर ठरेल. (Chhaava beats Uri)

महाराष्ट्रात तर ‘छावा’ने अनेक कलेक्शन रेकॉर्ड मोडले आहेत. अगदी आठवड्याचे सर्व दिवसातही अनेक टॉकीजमध्ये ९७-९८% वहिवाट नोंदवली आहे. देशभरातील चित्रपटरसिकांमध्ये या चित्रपटाची मोठी क्रेझ आहे. ही क्रेझ बराच काळ राहील, असे जाणकारांचे मत आहे.

हेही वाचा :

माझा जन्म जैविक नाही म्हणतो त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा?

साहित्य ही संस्कृती रचणारी महान शक्ती

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00