नवी दिल्ली : प्रतिनिधी : चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी पुन्हा महेंद्र सिंग ढोणी याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. चेन्नईचे फलंदाज प्रशिक्षक मायकेल हसी यांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामान्यात नेतृत्व बदलाचे संकेत दिले आहेत. (Chennai Captain)
शनिवारी (दि.५) चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात नेतृत्व बदल होणार असून कर्णधारपदाची धुरा एमएस धोनी यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. नुकत्याच राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामान्यात कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या संघातील सहभागाबद्दल शंका निर्माण झाली आहे. तो खेळला नाही तर पर्याय म्हणून घरच्या मैदानावर धोनीला चेन्नईचे कर्णधार म्हणून मैदानात उतरावे लागण्याची शक्यता आहे. (Chennai Captain)
शुक्रवारी फलंदाज प्रशिक्षक मायकेल हसी यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला. ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त असून तो बरा झाला आहे का हे आम्ही नेटमध्ये तो फलंदाजी कसा करतो यावर ठरवणार आहोत. जर तो खेळला नाही तर कोण नेतृत्व करेल हे निश्चित नाही. परंतु एका तरुण यष्टीरक्षकाची जागा भरण्याची दाट शक्यता आहे. (Chennai Captain)
तरुण यष्टीरक्षकाच्या उल्लेखामुळे एम.एस धोनी याच्याकडे चेन्नईचे नेतृत्व जाईल अशी अटकळ बांधली जात आहे. यापूर्वी धोनीने चेन्नई सुपर किंगचे २२६ सामन्यात नेतृत्व केले आहे. त्याने फ्रँचायझीला पाच आयपीएल आणि दोन चॅम्पियन लिग जेतेपद मिळवून दिले आहेत. या आयपीएल हंगामात चेन्नईने तीन सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे तर दोन सामन्यात पराभूत झाला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सविरुध्दच्या सामन्यात चेन्नईचा कस लागणार आहे. (Chennai Captain)
हेही वाचा :