बेलग्रेड : सर्बियन संसदेत मंगळवारी (४ मार्च) अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले. विरोधकांनी अचानक आक्रमक होत सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधारी आणि विरोधी खासदार एकमेकांशी भिडले. हाणामारी सुरू झाली. कहर म्हणजे काही क्षणातच सभागृहात अश्रूधुरांची नळकांडी फुटू लागली. काही समजायच्या आतच सुरू झालेल्या प्रकाराने सुरक्षा कर्मचारीही चक्रावून गेले.(Chaos in Serbian parliament)
विरोधी सदस्यांनी मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांच्या बाकाच्या दिशेने नळकांडी फोडली. त्यामुळे सभागृह धुराने माखून गेले. सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टी (एसएनएस) च्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीच्या विद्यापीठ कायद्यासह काही महत्त्वाचे विषय पत्रिकेवर ठेवले होते. कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अचानक त्यांच्या जागा सोडल्या. सुरक्षा कर्मचाऱ्यांशी त्यांची झटापट सुरू झाली. विरोधकांनी थेट सभापती अना ब्रनाबिक यांच्याकडे धाव घेतली. त्यामुळे गोंधळ उडाला. सत्ताधारी आणि विरोधी सदस्य एकमेकांना भिडले. हाणामारी सुरू झाली. यादरम्यान, निदर्शकांनी अश्रूधुराची नळकांडी फोडली. त्यामुळे सभागृहाचा काही भाग काळ्या आणि गुलाबी धुराने भरून गेला. (Chaos in Serbian parliament)
विद्यापीठांसाठी निधी वाढवण्यासाठी कायदा करण्याचा मुख्य विषय पत्रिकेवर होता. विद्यार्थ्यांनी या प्रश्नावर डिसेंबरपासून निदर्शने आणि आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर या मागणीसह अनेक प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन आयोजित केले होते. मात्र सभागृह सुरू होताच ते रणमैदान झाले.
चार महिन्यांपूर्वी रेल्वे स्थानकाचे छत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यात १५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रश्नावर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली होती. अशांतता धुमसत होती. ते सर्बियन सरकारसाठी आतापर्यंतचे सर्वांत मोठे आव्हान बनले आहे. (Chaos in Serbian parliament)
अधिवेशनात पंतप्रधान मिलोस वुसेविक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तथापि, सत्ताधारी आघाडीने विरोधकांना कसलीही भीक न घालता कामकाज सुरू ठेवले. त्यामुळे विरोधी सदस्य चिडले. त्याची परिणती गोंधळ आणि हाणामारीत झाली. (Chaos in Serbian parliament)
या घटनेनंतर सभापती ब्रनाबिक यांनी या हाणामारीत तीन सदस्य जखमी झाल्याचे सांगितले. प्रभावित झालेल्यांमध्ये एसएनएस पक्षाच्या जस्मिना ओब्राडोविक यांचाही समावेश आहे. त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे, तथापि, विरोधकांनी हे कृत्य केले असले तरी संसदेचे कामकाज सुरू राहील. सभागृह सर्बियाचे रक्षण करेल, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
एकाच क्रमांकाची अनेक डुप्लिकेट मतदार ओळखपत्रे