कोल्हापूर : प्रतिनिधी : चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि.४ ) झालेल्या सामन्यात यजमान बालगोपाल तालीम मंडळाने प्रॅक्टीस फुटबॉल क्लबचा ३-१ अशा फरकाने पराभव केला. दिलबहार तालीम मंडळाने सुभाषनगर फुटबॉल क्लब चा ३- ० अशा गोलफरकाने एकतर्फी विजय मिळवत करत पुढील फेरीत प्रवेश केला. बालगोपाल तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरु आहे. (Chandrakant Cup)
शुक्रवारी सकाळी झालेल्या सामन्यात बालगोपाल तालीम विरुद्ध प्रॅक्टीस क्लब या दोन संघांत सामना झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ झाला. दोन्हीं संघाकडून गोल करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. १३ व्या मिनिटाला बालगोपालकडून झालेल्या चढाईत प्रथमेश जाधव याने गोल नोंदवत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापूर्वी बालगोपालकडून सिंगरे कोम याने गोल करत आघाडी २-० केली. (Chandrakant Cup)
उत्तरार्धातील खेळावर बालगोपालचा आक्रमक पवित्रा कायम ठेवत सुरुवातीलाच ४३ व्या मिनिटाला रोहित कुरणेने गोल नोंदवून संघाला ३ -० असे आघाडीवर नेले. प्रॅक्टिस क्लब कडून झालेल्या चढाईत आकाश बावकर ने ५६ व्या मिनिटाला गोल करत आघाडी १ ने कमी करण्याचा प्रयत्न केला. अखेर बालगोपालने ३ – १ गोलची आघाडी ठेवत सामना जिंकला. बालगोपालकडून आशिष कुरणे, सार्थक जाधव, आदित्य पाटील, सागर पोवार यांनी तर प्रॅक्टीसकडून साहिल डाकवे, ओम घाटगे, यश खोत , साईराज पाटील यांचा चांगला खेळ झाला. (Chandrakant Cup)
दुपारच्या सत्रातील दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध सुभाषनगर फुटबॉल क्लब यांच्यातील सामन्यात सहाव्या मिनिटाला दिलबहार च्या प्रथम भोसलेने गोल नोंदवत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या २० व्या मिनिटाला प्रतीक कांबळेच्या पासवर अजीज मोमीन गोल करत संघाची आघाडी २ – ० केली. फ्रेडी ने ३२ व्या मिनिटाला गोल करत मध्यंतरापर्यंत गोलफलक ३ – ० असा आघाडी वर राहिला. (Chandrakant Cup)
उत्तरार्धात सुभाषनगरने परतफेड करण्यासाठी प्रयत्न केले. दिलबहारच्या चढायाही सुभाषनगरने रोखल्या. दिलबहार कडून रोहन दाभोळकर ,माणिक पाटील सतेज साळोखे यांनी चढाया केल्या . गोलची परतफेड करण्यासाठी सुभाषनगर क्लबकडून जोरदार चढाया केल्या. यात नितीन पोवार,प्रवीण सुतार ,आकाश मोरे सुशील सावंत यांनी आघाडी कमी करण्यासाठी प्रयत्न केले पण समन्वयाअभवी गोल करण्यात अपयशी ठरले. अखेर हा सामना दिलबहार ने ३-० अशा फरकाने जिंकला. (Chandrakant Cup)
सामनावीर: प्रथम भोपळे (दिलबहार तालीम), सिंगरे कोम (बालगोपाल तालीम)
शनिवारचे सामने: पाटाकडील तालीम मंडळ ब वि. सम्राट नगर स्पोर्ट्स , सकाळी ८ वा.
संयुक्त जुना बुधवार तालीम वि. झुंझार क्लब , दुपारी ४.००वा.
हेही वाचा :