महाराष्ट्र दिनमान डेस्क : पाकिस्तानात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी किकेट स्पर्धेचे ‘जीतो बाजी खेल के’ हे टायटल साँग लाँच झाले आहे. स्पर्धेच्या आधी बारा दिवस आयसीसीने हे साँग लाँच केले. ते अतिम असलम याने सादर केले आहे. १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत पाकिस्तान आणि युएईमध्ये १५ सामने खेळवले जाणार आहेत. (champions trophy song)
अब्दुल्ला सिद्दीकी यांनी अदनान धूळ आणि असफंदयार असद यांचाही या टायटल साँग रचनेत सहभाग आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये रस्ते आणि बाजारपेठांपासून स्टेडियमपर्यंत पाकिस्तानच्या संस्कृतीचे वैविध्यपूर्ण पैलू दाखवण्यात आले आहेत. ते पाकिस्तानमधील क्रिकेटच्या ग्लॅमरला उजाळा देणारे आहेत. हे गाणे आता जगभरातील प्रमुख स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.(champions trophy song)
या गाण्याबद्दल अतिक अस्लम म्हणाले, ‘ क्रिकेट माझा आवडता खेळ आहेत. मला वेगवान गोलंदाज व्हायचे होते. खेळाची आवड आणि समज असल्याने मी प्रेक्षकांचा जल्लोष आणि चाहत्यांच्या भावना यांच्याशी माझ्या भावना जोडल्या आहेत. क्रिकेटचे सामने पहात असताना मी भारत-पाकिस्तान सामन्याची वाट पहात असे. या सामन्यांशी आमच्या भावना जोडलेल्या असायच्या. म्हणूनच मी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या अधिकृत गाण्याचा भाग होण्यास उत्सुक आहे.’
क्रिकेट जगतात सगळीकडे चॅम्पियन्स ट्रॉफीची चर्चा सुरू आहे. भारत पाकिस्तान सामन्याकडे क्रिकेट शौकिनांचे लक्ष आहे. नऊ मार्चला अंतिम सामना होणार आहे.
The wait is over!
Sing along to the official song of the #ChampionsTrophy, Jeeto Baazi Khel Ke, featuring the master of melody @itsaadee
pic.twitter.com/KzwwylN8ki
— ICC (@ICC) February 7, 2025
हेही वाचा :