जेद्दा, सौदी अरेबिया : रशिया आणि युक्रेनमधील युदध थांबवण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला असून सौदी अरेबियामध्ये अमेरिका आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत अमेरिकेने दिलेला युध्द विरामाचा प्रस्ताव युक्रेननने मान्य केला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदीमीर झेलेन्सीक यांनी युध्द विराम प्रस्तावाची माहिती दिली. अमेरिकेने ३० दिवस युद्ध विरामाचा प्रस्ताव ठेवला होता. तो युक्रेनने मान्य केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. (Ceasefire)
व्हाईट हाऊसमध्ये झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात यापूर्वीच युद्धाबाबत बैठक झाली होती. बैठकीत दोघांमध्ये खडाजंगी झाली होती. या खडाजंगीच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि युक्रेनच्या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. युक्रेनने युद्धविरामाचा प्रस्ताव मान्य केल्याने युक्रेनला दिली जाणार मदत अमेरिका पुन्हा सुरू ठेवणार आहे. (Ceasefire)
सौदी अरेबियातील जेद्दाह येथे अमेरिका आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत युद्धविरामासह दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र हल्ले रोखण्यासाठी आणि युद्धात पकडलेल्या कैद्यांच्या मुक्ततेवर चर्चा झाली. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपुष्ठात आणणे हा बैठकीचा मुख्य उद्देश होता. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्टज या बैठकीला उपस्थित होते. (Ceasefire)
बैठकीनंतर बोलताना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले, “हे एक सकारात्मक पाऊल असून युद्धविरामाचा प्रस्तावाचा स्वीकार करण्यास युक्रेन तयार आहे. रशियाला राजी करण्याची जबाबदारी आता अमेरिकेची आहे. मॉस्कोने मान्यता दिल्यावर युद्धविराम होईल”. (Ceasefire)
बैठकीवर बोलताना ट्रम्प म्हणाले, “युक्रेनने युद्धविरामाला होकार दिला आहे. आता आम्ही रशियाला जाऊ. राष्ट्राध्यक्ष पुतीनही युद्धविरामासाठी राजी होतील, अशी आम्हाला आशा आहे. शहराशहरांमध्ये स्फोट होऊन लोक मरत आहेत. युद्ध् लवकर संपावे अशी आमची इच्छा आहे” (Ceasefire)
हेही वाचा :