मुंबई : प्रतिनिधी : मुंबई वेधशाळेने कोल्हापूरसह सांगली, सोलापूरला पावसाचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांसह मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. तसेच मुंबईसाठीही महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे.(Weather Forecast)
दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडेल. ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, असेही वेधशाळेने म्हटले आहे. (Weather Forecast)
तसेच कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी रात्रीचे तापमान वाढलेले असण्याची शक्यता आहे.