-
राकेश कायस्थ
कधीकाळी इंदिरा गांधींना “गूंगी गुडिया” म्हटले गेले होते. ते विधानही अतिशयोक्तिपूर्ण होते. इंदिरा गांधी उच्चभ्रू वर्गातील होत्या, मितभाषी होत्या, परंतु दूरदृष्टी असलेल्या नेत्यांपैकी एक होत्या. त्या गूंगी गुडिया नव्हत्या. आपण किती आक्रमक होऊ शकतो, हे त्यांनी योग्य वेळ येताच दाखवून दिले. गेल्या पन्नास वर्षांत काँग्रेसच्या राजकारणातील सर्वात प्रभावी नेत्या सोनिया गांधींची कहाणी मात्र यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.
सोनियांना राजकारण आवडत नव्हते
सोनिया गांधींचं आयुष्य वेगळंच होतं. फक्त पती आणि मुलं एवढंच त्यांचं विश्व होतं. त्यांना राजकारण कधीच आवडत नव्हते. राजीव गांधी यांनी पंतप्रधान होण्यास त्यांचा विरोध होता. राजकारणात प्रवेश करण्यास त्यांना अडवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता. पुढं त्यांच्या आयुष्यात अनेक नाट्यमय वळणं आली. कुटुंबावर कोसळलेल्या अनेक दुर्दैवी आघातांनंतर स्वतः सोनिया गांधींनाही राजकारणात येण्यावाचून पर्याय उरला नाही. पण त्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागली. जेव्हा त्यांनी पहिले भाषण दिले, तेव्हा असं वाटलं की त्या गूंगी नव्हत्या, पण चावीने चालणाऱ्या बाहुलीसारख्या होत्या. अडखळत, थांबत-थांबत भाषण वाचायच्या. त्यांच्या इंग्रजीवरही इटालियन प्रभाsoniya gandhiव होता. त्या हिंदीतून बोलायच्या तेव्हा तर त्यांच्या बोलण्यात अनेक त्रुटी जाणवायच्या. त्याकाळी मीम्स नव्हते, पण टीव्हीवरील विनोदी शोमध्ये सोनिया गांधींची नक्कल करणे हा एक लोकप्रिय कार्यक्रम असायचा.
पण हे चित्र लवकरच बदलले. राजकीय दूरदृष्टीच्या बाबतीत सोनिया गांधींनी अनेक समकालीन नेत्यांना मागे टाकले. जे विरोधक त्यांची टिंगल करीत होते, त्यांनी आरोप करायला सुरुवात केली की “ही चावीवाली बाहुली” रिमोट कंट्रोलने सरकार चालवत आहे. नीट पाहिलं, तर लक्षात येईल की सोनिया गांधींनी भारतीय राजकारणात नैतिकतेची एक लक्ष्मणरेषा आखली. त्याच्यासारखं दाखवायलाही दुसरं उदाहरण नाही. पंतप्रधानपदाच्या संधी दोनदा आल्या, पण त्यांनी त्या नाकारल्या.
पारदर्शक सरकारच्या प्रमुख
सोनिया गांधींच्या “रिमोटने चालणाऱ्या” सरकारला आधुनिक भारतातील सर्वांत पारदर्शक सरकारांपैकी एक मानले जाते. त्या काळातील पंतप्रधान, आजच्या सारखे कॅमेऱ्यापासून पळणारे नव्हते. किंवा पत्रकारांना, प्रसारमाध्यमांना धमकावत नव्हते. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत होते. यू-ट्यूबवर “मनमोहन प्रेस कॉन्फरन्स” शोधून बघा, कळून येईल. त्यांच्या सरकारने सर्वाधिक राजीनामे घेतले आणि तेही अल्पमत सरकार असताना. नटवर सिंग यांच्यावर २५ वर्षांपूर्वी इराकमधून तेल कूपन घेतल्याचा आरोप झाला, तेव्हा त्यांचा राजीनामा घेतला गेला. दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री शिवराज पाटील यांनी एका दिवसात दोनदा कपडे बदलल्यावर त्यांनाही हटवण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख, जेव्हा त्यांच्या मुलासोबत ताज हॉटेलची पाहणी करायला गेले, तेव्हा त्यांची ती कृती असंवेदनशील मानली गेली आणि त्यांनाही राजीनामा द्यावा लागला.
“ऑफिस ऑफ प्रॉफिट” प्रकरणात स्वतः सोनिया गांधींनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणूक लढवली. आजच्या काळात असं काही शक्य आहे का? आज निर्लज्जपणे सांगितलं जातं, “आमच्याकडे राजीनामे होत नाहीत.” सोनिया गांधी यूपीए अध्यक्षा असताना मनरेगा, फूड सिक्युरिटी बिल आणि माहिती अधिकारासारखी क्रांतिकारी कामं झाली. मोदी सरकारने या योजनांवर माती टाकण्याचा प्रयत्न केला. पण कोविडच्या वेळी मनरेगा उपयोगी पडली. फूड सिक्युरिटी बिल पाच किलो अन्नधान्य योजनेचा पाया ठरला.
काँग्रेसच्या पतनाची सुरुवात
२०१० मध्ये सोनिया गांधींना कॅन्सर असल्याचं समजलं. त्यानंतर त्यांच्यावरील उपचार सुरू झाले आणि त्या सक्रीय राजकारणापासून हळूहळू लांब गेल्या. काँग्रेसच्या पतनाची कहाणी याच क्षणापासून सुरू झाली. मनमोहन सिंग यांनी स्वतःबाबत म्हटलं होतं की, इतिहास त्यांच्या बाबतीत अधिक दयाळू असेल. हेच सोनिया गांधींसंदर्भातही लागू होतं.
सोबतचा फोटो लोकसभेतला आहे. हा फोटो काहीही न बोलता भारतीय समाज आणि राजकारणाबद्दल बरंच काही सांगतो.
सोनिया गांधी यांनी वयाची ७८ वर्षे पूर्ण करून ७९व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा!
संजय मल्होत्रा आरबीआयचे २६वे गव्हर्नर
देश बहुसंख्याकांच्या इच्छेनुसार चालला पाहिजे
शेतकरी आंदोलन; रस्त्यावरील अडथळे दूर करण्याची मागणी फेटाळली