कोल्हापूर : प्रतिनिधी : एक नव्हे, दोन नव्हे तर तीन विवाह केल्याचे चौकशीत निष्पन झाल्याने पोलिस उपनिरीक्षकाला पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले. त्याच्या पत्नीनेच तक्रार केल्यानंतर चौकशीत तीन लग्नाची गोष्ट उघडकीस आली. (Suspension)
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ पोलिस ठाण्यात पोलिस उप निरीक्षक इम्रान बाबाजी मुल्ला (वय ४०, रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड, जि. सातारा) यांनी तीन विवाह केल्याने त्यांना कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाने निलंबित केले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस उपनिरीक्षक मुल्ला यांनी २०१९ मध्ये आफरीन मुल्ला यांच्याशी विवाह केला. गोंदीया येथे सेवा बजावत असताना पत्नी आफरिन यांच्याशी इम्रान मुल्ला यांच्याशी सातत्याने वाद होत होता. आफरिन यांनी त्यांच्या विरुद्ध गोंदियातील केशारी पोलिस ठाण्यात शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याबद्दल फिर्याद दिली होती. त्यावेळी इम्रान यांना सेवेतून निलंबनाची कारवाई झाली होती. (Suspension)
दरम्यान २३ जून २०२४ रोजी इम्रान मुल्ला यांनी तिसरा विवाह केल्याची माहिती मिळाल्यावर पहिली पत्नी आफरीन मुल्ला यांनी कराड पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. पण मुल्ला यांच्याविरोधात कारवाई होत नसल्याने आफरीन यांनी माहिती अधिकारात अर्ज देऊन त्यांनी पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तपासात इम्रान मुल्ला यांनी तीन वेळा विवाह केल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने जिल्हा पोलिस प्रशासनाने इम्रान मुल्ला यांना निलंबित केल्याचा आदेश काढला आहे. शिरोळचे पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी उप निरीक्षक मुल्ला यांना निलंबित केल्याची माहिती दिली. (Suspension)
हेही वाचा :