मुंबई : प्रतिनिधी : भारतीय शेअरबाजारात आज सोमवारी पहिल्याच दिवशी अक्षरश: तांडव घडून आले शेअर बाजारात प्रचंड घसरण झाली असून बिएसई सेन्सेक्स ३२०० अंकापेक्षा जास्त घसरला आहे. शेअरबाजारातील बेंचमार्क निर्देशांक, बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. दोन्ही शेअरबाजारातील निर्देशांक चार टक्क्यांनी घसरले. अमेरिकचे टॅरिफ धोरण, चीनचे टॅरिफला प्रत्युत्तर, अमेरिकन बाजारात जागतिक मंदीची भिती, जागतिक बाजारातील घसरण याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात पहायला मिळाले. (Stock Market Crash)
भारतीय शेअर बाजार उघडण्यापूर्वी अशियातील प्रमुख देशातील शेअरबाजारात हाहाकार माजल्याने भारतीय शेअरबाजारात त्याचे पडसाद काय उमटतात याकडे लक्ष लागले होते. सकाळपासून शेअरबाजारात तीन हजार अंकांची घसरण झाली. वाहन कंपन्या आणि आयटी कंपन्यांच्याच्या शेअरमध्ये घसरण पहायला मिळाली. सकाळी पावनेअकरा वाजण्याच्या सुमारास बीएसई सेन्सेक्स २८६० अंकानी म्हणजेच ३.७९ अंकानी घसरून ७२,५०५.१८ वर व्यवहार करत होता. निफ्टीतही ४.०५ ने घसरून २१,९७५.९० अंकावर होता. (Stock Market Crash)
बीएसई सेन्सेक्समध्ये सर्वाधीक घसरण झाली ती टाटा स्टीलमध्ये. मायनस १० टक्क्यांनी शेअर्स घसरले. टाटा मोटर्स -७.८६%, इन्फोसिस -६.९८%, टेक महिंद्रा -६.३६%, आणि एल अँड टी -६.४५% या कंपन्यामध्ये घसरण दिसून आली. अमेरिकेत मोठ्या प्रमाणात महसूल देणाऱ्या तंत्रज्ञान कंपन्यामध्ये सात टक्के घट झाली. लहान आणि मध्यम आकाराच उद्योगांचा समावेश असलेल्या विस्तुत विभागामध्ये अनुक्रमे ६.२ आणि ४.६ टक्के घसरण झाली. (Stock Market Crash)
प्रमुख बाजार निर्देशांकांमध्ये लक्षणीय घट झाली, निफ्टी मेटलमध्ये ८% तर निफ्टी आयटीमध्ये ७% पेक्षा जास्त घट झाली. निफ्टी ऑटो, रिअल्टी आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रात प्रत्येकी ५% पेक्षा जास्त घसरण झाली. याचा व्यापक बाजार परिणाम लक्षणीय होता, कारण स्मॉल-कॅप आणि मिड-कॅप निर्देशांकांमध्ये अनुक्रमे १०% आणि ७.३% ची घसरण झाली.बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलात १९.४ लाख कोटी रुपयांची घट झाली, ज्यामुळे एकूण मूल्य ३८३.९५ लाख कोटी रुपये झाले. (Stock Market Crash)
शेअर बाजार कोसळत असल्याबद्दल तज्ज्ञांकडून विविध कारणे सांगितले जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ धोरण जाहीर केल्याने त्यांचे पचंड पडसाद जागतिक बाजारपेठेवर पडले आहेत. त्यामुळे जगातील सर्व शेअरबाजारांमध्ये मोठी घसरण झाली आहे. त्याचे पडसाद भारतीय शेअरबाजारावर पडल्याने भारतीय शेअरबाजार मोठ्या प्रमाणात पडला आहे. (Stock Market Crash)
अशियाई बाजारही कोसळला
अशियाई शेअरबाजारातही लक्षणीय घसरण झाली आहे. जपानी निक्केईमध्ये ७% घसरण नोंदवली गेली, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी ५% घसरला. चीनचा ब्लू-चिप निर्देशांक जवळजवळ ७% घसरला. हाँगकाँगच्या हँग सेंगमध्ये १०.५% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. त्याचबरोबर अमेरिकन फ्युचर्समध्ये सतत कमकुवतपणा दिसून आला, नॅस्डॅक फ्युचर्समध्ये ४% आणि एस अँड पी ५०० फ्युचर्समध्ये ३.१% घट दिसून आली. युरोपियन फ्युचर्स मार्केटमध्येही लक्षणीय नकारात्मक हालचाल दिसून आली. (Stock Market Crash)
जागतिक कमोडिटी मार्केटमध्येही पडसाद
जगभरातील कमोडिटी मार्केटमध्ये कमी मागणी आणि संभाव्य आर्थिक घटीच्या चिंतेमुळे मोठे नुकसान झाले आहे. ब्रेंट क्रूडच्या किंमतीत ६.५% घट झाली, तर डब्ल्यूटीआयमध्ये ७.४% घट झाली. मौल्यवान धातूंनाही यातून वगळण्यात आले नाही, सोने २.४% आणि चांदी ७.३% घसरली. औद्योगिक धातूंमध्येही लक्षणीय घट झाली, तांबे ६.५%, जस्त २% आणि अॅल्युमिनियम ३.२% घसरले. (Stock Market Crash)
हेही वाचा :