जयसिंगपूर : प्रतिनिधी : श्री दत्त-शिरोळ कारखान्याच्या यंदाचा ५३ व्या ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडीत गणपतराव पाटील यांच्याहस्ते झाला.
यावेळी पाटील म्हणाले, कारखान्याने नेहमीच सभासदांचे हित जोपासले आहे. सहकार चळवळ टिकली पाहिजे. सहकार चळवळ टिकली तरच सर्वसामान्य जनतेचे हित जोपासले जाईल. कारखान्याने सभासद केंद्रस्थानी मानून कारखाना व्यवस्थापनाचे कामकाज सुरू आहे. या हंगामासाठी एकरकमी एफआरपी प्रतिटन ३१४० रुपये देणार आहोत. या हंगामात १५ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगून सर्व सभासदांनी आपला ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी स्वागत केले. कारखान्याचे चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील यांनी आभार मानले.
याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक अरुणकुमार देसाई, अनिलकुमार यादव, संचालिका श्रीमती विनया घोरपडे, संचालक बाबासो पाटील, संचालिका संगीता पाटील- कोथळीकर, अस्मिता पाटील, विश्वनाथ माने, शेखर पाटील, आदी मोठ्या उपस्थित होते.