सांगली : येथील सिध्दार्थ प्रमोद कुदळे यांची राज्य शासनात जलसंधारण अधिकारीपदी नियुक्ती झाली. महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने घेतलेल्या सरळ सेवा परिक्षेत त्यांनी चांगल्या गुणांनी यश मिळवले. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री, इंद्रनील नाईक आणि आयुक्त गणेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या शासकीय कार्यक्रमात कुदळे यांना जलसंधारण अधिकारी वर्ग – २ म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले. (Siddharth kudale)
येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कुदळे यांचे ते पुत्र आहेत. सिद्धार्थ कुदळे यांनी यापूर्वी भूमी अभिलेख, जलसंपदा विभाग या परिक्षेमध्येही यश मिळवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवेतही त्यांनी नुकतेच यश प्राप्त केले. सध्या ते भूमी अभिलेख कडेगांव येथे कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल आमदार सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज पवार, जयश्रीताई पाटील, प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी त्यांचे कौतुक केले. (Siddharth kudale)
हेही वाचा :