कोल्हापूर : प्रतिनिधी : माजी आमदार दिनकरराव भाऊसाहेब जाधव (वय ९५) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. उद्या रविवारी (दि. १५) सकाळी भुदरगड तालुक्यातील तिरवडे या गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून त्यांची ओळख होती. (Ex MLA death)
दिनकरराव जाधव हे सध्या ताराबाई पार्क येथे मुलांकडे वास्तव्य होते. उद्या रविवारी त्यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम होता. पण शनिवारी रात्री त्यांचे निधन झाल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. १९७८ मध्ये ते काँग्रेस पक्षांकडून आमदार म्हणून निवडून आले होते. (Ex MLA death)
बिद्री येथील दूधगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. तळागाळातील कार्यकर्त्यांशी जवळीक असलेला आणि काँग्रेस विचारसरणीवर पक्की श्रद्धा असलेला नेता अधी त्यांची ओळख होती. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचा प्रचार करत खासदार शाहू छत्रपतींना विजयी करण्यासाठी परिश्रम घेतले होते. जाधव यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.