पुणे : प्रतिनिधी : दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडली. आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना उपचारासाठी दाखल करण्यासाठी हॉस्पिटलने दहा लाख रुपये डिपॉझिट भरण्याची मागणी केली होती. तनिषा भिसे यांना दाखल करुन घेण्यासाठी मंत्रालयातून हॉस्पिटल प्रशासनाला फोन केला. तीन लाख भरण्याची तयारी दर्शवली होती. तरीही रुग्णालय प्रशासनाने तनिषा भिसे दाखल करण्यास नकार दिला असा आरोप आमदार अमित गोरखे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर कडक पावले उचलावीत अशी मागणीही केली आहे. (Tanish Bhise)
आमदार अमित गोरखे यांनी घटनेची माहिती दिली. सुशांत भिसे आपले स्वयं सहाय्यक असून त्यांच्या गर्भवती पत्नीला रुग्णालयात दाखल होण्यासाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेले होते. पोटामध्ये जुळे मुले होती. तिथे गेल्यावर हॉस्पिटल प्रशासनाने १० लाख रुपये तात्काळ भरा अन्यथा आम्ही दाखल करणार नाही, असे सांगण्यात आले. तीन लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्यांना आम्ही दाखल करुन घेण्यात आले नाही. क्रिटिकल शस्रक्रिया आहे असे सांगितले गेले आणि अॅडमिशन नाकारले गेले. त्यानंतर मंत्रालयातून फोन गेल्यानंतरही तिथल्या प्रशासनाने त्यांना दाखल केले नाही. (Tanish Bhise)
त्या धावपळीत त्यांना दुसऱ्या रुग्णालयात जावे लागले. त्या दुसऱ्या रुग्णालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना दोन मुली झाल्या. पण तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. दीनानाथ रुग्णालय हे गरीबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवले जाते. पण अशाप्रकारचा गंभीर गुन्हा या रुग्णालयाने केलेला आहे. रुग्णालयासंबंधी अशा अनेक तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात आम्ही हा विषय मांडणार आहोत, असेही अमित गोरखे यांनी सांगितले. (Tanish Bhise)
तनिषा यांना प्रसुतीवेदनेचा त्रास होत असल्याने नातेवाईकांनी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेलं. पण तिथे गेल्यावर रुग्णालय प्रशासन हे १० लाख रुपयाच्या डिपॉझिटसाठी अडून राहिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. (Tanish Bhise)
हेही वाचा :