कोल्हापूर : आपत्ती कोणतीही असो त्यात प्रथम जिल्हा, राज्य आणि परदेशातही मदतीसाठी तत्पर असलेली कोल्हापूरच्या व्हाईट आर्मीच्यावतीने थायलंड आणि म्यानमारमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी वैद्यकीय पथक, स्वयंसेवक आणि वस्तू पाठविल्या जाणार आहेत.(Myanmar disaster)
म्यानमार आणि थायलंडमध्ये २८ मार्च रोजी विनाशकारी भूकंप झाला. यात जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. अजूनही बरेच नागरीक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. म्यानमारची भारतीय संस्कृतीशी नाळ जोडली आहे. आपत्ती कोणतीही असो त्यात कोल्हापूरची व्हाईट आर्मी ही देश व अन्य बाबींचा विचार न करता मदतीला धावून जाते. (Myanmar disaster)
केरळ असो कि, काश्मिर, आसाम, नेपाळ भूकंप असो अशा सर्व ठिकाणी भारतीय लष्कराच्या सोबतीने संकटग्रस्तांच्या मदतीला धावली आहे. बाधितांना सुखरुप काढले असून त्यांचे योग्य ते पुनर्वसन होण्यास मदतही केली आहे. म्यानमार देशाच्या वैद्यकीय संसाधनांचा विचार करता आरोग्य सेवा सुविधा पुरवणे तत्काळ गरजेचे आहे. यासाठी भारत सरकारच्या ऑपरेशन ‘ब्रह्मा’ पाठोपाठ कोल्हापूरच्या व्हाईट आर्मीतर्फे एक वैद्यकीय पथक लवकरच पाठविले जाणार आहे.
यासाठी सेवाभावी डॉक्टरांनी या मोहीमेत सहभागी व्हावे. यात काही रुग्णालये त्यांचे प्रतिनिधीही पाठवू शकतात. यासह तेथील बांधितांना वस्तूही पाठविल्या जाणार आहेत. तरी इच्छुकांनी व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे (9850079801) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा :
ट्रॅक्टर विहिरीत कोसळून आठ ठार
‘मंगेशकर’मधील गर्भवती मृत्यू प्रकरणाची चौकशी