प्रयागराज : महाकुंभाने प्रयागराजमधील असंख्य लोकांचे जीवन बदलून टाकले. ऑटो रिक्षाचालक, खाद्यविक्रेत्यांपासून ते नावाड्यांपर्यंत. अशा अनेक कुटुंबाचे जीवन या कुंभमेळ्याने बदलून टाकले. यांपैकीच प्रयागराजमधील पिंटू महरा या नाविक कुटुंबाची यशोगाथा अनेक स्थानिक वृत्तपत्रे आणि माध्यमांनी प्रसिद्ध केली आहे. या कुटुंबाने ३० कोटी रुपये कमावले आहेत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत ही माहिती सांगितली आणि एका रात्रीत पिंटू महरा आणि त्यांचे कुटुंब प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले आहे.(Boatman)
पिंटू महराकडे सुरवातीला काहीच नावा होत्या. त्यांनी हळूहळू नावांची संख्या वाढवली. ती ६० पर्यंत नेली. कुंभमेळ्यावेळी गर्दी होणार हे गृहित धरून त्यांनी नावांची संख्या १३०पर्यंत वाढवली. त्यांनी हे धाडस केले. त्यांचे हे धाडस त्यांना एवढ्या व्यावसायिक यशाच्या शिखरावर घेऊन गेले, असे योगी यांनी स्पष्ट केले.
या सर्व बोटींवर पिंटूंचे जवळचे नातेवाईक आणि इतर नातेवाईक मंडळीतील शंभरावर लोक काम करत होते. योगी सरकारने २०१९मध्येही कुंभमेळा आयोजित केला होता. त्यात महरा कुटुंबाने नावा भाड्याने ठेवल्या होत्या. या व्यावसायिक अनुभवाचा या कुटुंबाला फायदा झाला. याच अनुभवाच्या आधारे या महाकुंभमेळ्यात या कुटुंबाने मोठी कमाई केली. (Boatman)
मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेश सभागृहात सांगितले की, पिंटूच्या कुटुंबाने ३० कोटी रुपये कमावले.
महाकुंभमेळ्यात दक्षिणेकडील राज्यांमधून लाखो भाविक पवित्र स्नान करण्यासाठी अरैल येथे आले होते. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. अरैल घाटापासून संगमला जाण्यासाठी १० लोकांसाठी एका नावेचे भाडे किमान सहा हजार रुपये होते. तथापि, महाकुंभाच्या महत्त्वाच्या दिवसांत ते अनेक पटीने वाढवण्यात येत होते. एका व्यक्तीने तर ३०,००० रुपये दिल्याचा दावा केला. (Boatman)
पिंटूची आई शुक्लवती देवी यांच्यासाठी हा आशीर्वाद आहे.
‘‘माझ्या पतीच्या निधनानंतर कुटुंब आर्थिक संकटात होते. अशा परिस्थितीत, महाकुंभ तारणहार म्हणून आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ज्या पद्धतीने या महाकुंभाचे आयोजन केले त्यामुळे लाखो लोक संगमला स्नान करण्यासाठी आले. यामुळे आमचे उत्पन्न अनेक पटींनी वाढले,’’ असे त्या म्हणाल्या.
कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.
हेही वाचा :
परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यावर लंडनमध्ये हल्ल्याचा प्रयत्न