महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : संसद परिसरातील धक्काबुक्की प्रकरणानंतर भाजप आणि काँग्रेसच्या खासदारांनी संसद मार्ग पोलिल ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केला. या प्रकरणानंतर काल रात्री (दि.१९) पोलिसांनी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केला. यावेळी राहुल गांधी यांच्यावर जाणीवपूर्वक दुखापत पोहोचवणे, धमकी देणे अशी इतर कलमे लावली आहेत. (Rahul Gandhi)
संसदेतील कथित धक्काबुक्की प्रकरणानंतर काँग्रेस आणि भाजपच्या खासदारांनी एकमेकांविरोधात संसद मार्ग पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान रात्री दिल्ली पोOलिसांनी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल केला. धमकी देणे, जाणीवपूर्वक दुखापत पोहोचवणे यांसह इतर कलमे लावण्यात आली आहेत.
खासदारांवर निलंबणाची कारवाई ?
संसदेत आणि परिसरात निदर्शने करणाऱ्या खासदारांविरोधात लोकसभा अध्यक्ष कारवाईचा शक्यता आहे. अध्यक्षांच्या खुर्ची जवळ गेलेल्या आणि संसदेच्या मकर द्वार गेटजवळ धक्काबुक्की करणाऱ्या खासदारांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते. (Rahul Gandhi)
#Parliament scuffle: Police file FIR against #RahulGandhi based on BJP complaint
What are the charges 🔗 https://t.co/looTnl2iOm pic.twitter.com/xw3hmU5cq1
— The Times Of India (@timesofindia) December 19, 2024
हेही वाचा :