मुंबई : विशेष प्रतिनिधी : जी भूमिका मांडतो त्यावर अखेरपर्यंत ठाम असतो. आपल्या हातात सत्ता दिल्यास ४८ तासाच्या आत सर्व मशिदींवरील भोंगे काढायला लावतो. अन्यथा राज ठाकरे नाव नाही सांगणार नाही, असे आव्हान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले. वरळीतील मनसेचे उमेदवार देशपांडे यांच्या प्रचारासाठी आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. ते म्हणाले की, ‘संपूर्ण शहराचा विचका झाला आहे. कोणाचे लक्ष नाही. मागे रझा अकादमीचा मोर्चा निघाला होता. आझाद मैदानावर त्यांनी चॅलेनच्या ओबी व्हॅन फोडून टाकल्या. पोलीस भगिनींवर हात टाकले. त्या मोर्चाच्या विरोधात कोणीही आवाज काढला नाही.
फक्त मनसेने मोर्चा काढला. त्यावेळी एक कमिश्नर होते. ते पोलिसांना सांगत होते ते काहीही करतील पण तुम्ही हात नाही उचलायचा. मग दांडके कशाला दिलेत, गरबा खेळायला ?’ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले माहितीये सगळ्यांना. काही विचारधाराच राहिलेली नाही. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेच्या होर्डिंगवरचे बाळासाहेचांच्या नावापुढचे हिंदूहृदयसम्राट हे शब्द काढून टाकले होते. काही होर्डिंगवर तर ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ आले अशी टीका त्यांनी केली.