चेन्नई : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपतीने एक कोटी ३० रुपयांचे दान दिले आहे. या दानातून सिनेसृष्टीतील कामगारांसाठी घरे बनवण्यात येणार आहेत. त्याच्या या उपक्रमाचे स्वागत होत असून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Vijay setupati)
या घटनेने विजय सेतुपतीने स्क्रीन आणि स्क्रीनबाहेरच्या जगतातही स्टार असल्याचे सिद्ध केले आहे. साउथ इंडियन मुव्ही वर्कर्स युनियनला त्याने एक कोटी पेक्षा जास्त रकमेचे दान केले आहे. या रकमेतून युनियनच्या सभासदांना घरे बांधून दिली जाणार आहेत. विजय सेतुपतीने चेन्नईतील फिल्म एम्पलॉईज फेडरेशन ऑफ साऊथ इंडियाला मदत केली आहे. कुशल तंत्रज्ञ आणि गरीब कामगारांचे जीवनमान चांगले व्हावे, यासाठी विजय सेतुपती धडपडत आहे. (Vijay setupati)
ट्रेड अनॅलिस्ट रमेश बाला यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली आहे. विजय सेतुपती यांनी एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या निर्मितीसाठी एक कोटी ३० लाखाचे दान केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचा सन्मान होणार आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, मक्कन सेल्व्हन विजय सेतुपतीने घरे बनवण्यासाठी फेफ्सी मुव्ही वर्कर्स युनियला एक कोटी ३० लाख रुपयांचे दान दिले आहे. या अपार्टमेंटला ‘विजय सेतुपती टॉवर्स’असे म्हटले जाईल. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले आहे. (Vijay setupati)
२१ फेब्रुवारीला तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री अभिनेता उदयनिधी स्टॅलिन यांनी एक सरकारी अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार फेफ्सी, तमिल फिल्म प्रोड्यूसर्स काउंसिल, साउथ इंडियन आर्टिस्ट्स असोसिएशन आणि तामिळनाडू स्मॉल स्क्रीन आर्टिस्ट असोसिएशनसहित प्रमुख इंडस्ट्रीला एक जमिन भाडेतत्वावर दिली आहे. फेफ्सी तामिळ फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीशी संबधित विविध विभागातील युनियनमध्ये २५ हजार सदस्य प्रतिनिधीत्व करतात. (Vijay setupati)
२०२४ मध्ये विजय सेतुपतीचे तीन चित्रपट प्रदर्शित झाली आहेत. श्रीराम राघवनच्या ‘मेरी ख्रिसमस’ यांच्या चित्रपटात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ सोबत दिसणार आहे. त्याच्या ‘महाराज’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. ‘विदुथलाई पार्ट टू’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. २०२५ मध्य विजय सेतुपती नवीन चित्रपटाची तयारी करत आहे. त्याचे ‘गांधी टॉक्स’, ‘ऐस’ आणि ‘ट्रेन’ हे चित्रपट येणार आहेत. (Vijay setupati)
हेही वाचा :
सिनेमा
मुंबई : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनित ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यातच ‘उरी’लाही मागे टाकले. जगभरात या चित्रपटाने ३४३ कोटींची कमाई केली आहे. तो लवकरच पाचशे कोटींचा टप्पा गाठू ब्लॉकबस्टर ठरेल, असा विश्वास सिनेक्षेत्रांतील जाणकार व्यक्त करत आहे.(Chhaava beats Uri)
विकी कौशलला उरी : द सर्जिकल स्ट्राइकने मोठे यश मिळवून दिले. या चित्रपटाने त्याला पैसा आणि प्रसिद्धीही मिळवून दिली. त्यानंतर आता आठवड्यापूर्वीच रिलीज झालेल्या ‘छावा’ने आठव्या दिवशी ₹३२५ कोटींचा टप्पा ओलांडला. जागतिक पातळीवर त्याची कमाई ₹३४३ कोटींवर गेली आहे. ‘उरी’च्या एकूण ₹३४२ कोटींच्या एकूण कमाईचा टप्प्याच्याही पुढे ‘छावा’ने ही मजल केवळ एका आठवड्यातच गाठली आहे. (Chhaava beats Uri)
‘बॉलीवूड हंगामा’ नुसार, ‘छावा’ने आठव्या दिवशी, शुक्रवारी भारतात ₹२४ कोटी नेट जमा केले. यामुळे चित्रपटाचे देशांतर्गत निव्वळ कलेक्शन ₹२४९ कोटी झाले आहे. ‘उरी’चे देशांतर्गत कलेक्शन ₹२४४ कोटी होते. ‘छावा’ने परदेशातही चांगली कामगिरी केली आहे. आठ दिवसांत भारताबाहेर फक्त ५.३ दशलक्ष डॉलर्स कमावले. जगभरातील एकूण कमाई ₹३४३ कोटींवर नेली. उरी : सर्जिकल स्ट्राइकने एकूणच ₹३४२ कोटींची कमाई केली होती. त्यामुळे ‘छावा’ विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वांत हिट्ट ठरला आहे.
‘छावा’ची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड सुरूच आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात जबरदस्त कामगिरी केली. दुसऱ्या आठवड्याची सुरूवातही दणक्यातच झाली आहे. रविवारपर्यंत त्याची गती कायम राहिल्यास, तिसऱ्या वीकेंडपर्यंत चित्रपट ₹५०० कोटींचा टप्पा ओलांडण्याची मोठी शक्यता आहे. यामुळे हा चित्रपट निश्चित ब्लॉकबस्टर ठरेल. (Chhaava beats Uri)
महाराष्ट्रात तर ‘छावा’ने अनेक कलेक्शन रेकॉर्ड मोडले आहेत. अगदी आठवड्याचे सर्व दिवसातही अनेक टॉकीजमध्ये ९७-९८% वहिवाट नोंदवली आहे. देशभरातील चित्रपटरसिकांमध्ये या चित्रपटाची मोठी क्रेझ आहे. ही क्रेझ बराच काळ राहील, असे जाणकारांचे मत आहे.
हेही वाचा :
माझा जन्म जैविक नाही म्हणतो त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा?
मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाला पहिल्या दिवसाच्या अॅडव्हान्स बुकिंगला उदंड प्रतिसाद लाभला आहे. ओपनिंगला छावा चित्रपट दहा कोटीचा व्यवसाय करण्याकडे वाटचाल करत आहे. अॅडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटाने या आधीच सात कोटी २१ लाखांचा गल्ला गोळा केला आहे. (Chhawa)
छावा चित्रपटाची तरुणाईमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. पहिल्याच दिवशी चित्रपट पाहण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे बुकिंगवरून दिसत आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या आधीच चित्रपटाने ५.६५ कोटी रुपये कमावले आहेत. ७४४६ शोमध्ये २.०१ लाख तिकिटे विकली गेली आहेत. ब्लॉक केलेल्या जागांसह या चित्रपटाच्या अॅडव्हान्स कलेक्शनचा ७.२१ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. (Chhawa)
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्रवासीयांचे दैवत असल्याने छावाच्या अॅडव्हान्समध्ये महाराष्ट्र सर्वांत मोठा वाटा उचलणारे राज्य ठरले आहे. अॅडव्हॉन्समध्ये ३ कोटी ७१ लाख तर ब्लॉक केलेल्या जागांचा समावेश केल्यास एकूण कलेक्शन ४ कोटी ४१ लाखापर्यंत पोहोचले आहे. महाराष्ट्रात या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
हिंदी टू डी फॉरमॅटमध्ये छावा चित्रपट तिकीट विक्रीत सर्वांत आघाडीचा चित्रपट ठरला आहे. ज्याने अंदाजे पाच कोटी ३८ कोटी रुपये कमावले आहेत. उर्वरीत कलेक्शन आयमॅक्स टू डी, फोर डीएक्स आणि आयसीईसारख्या प्रीमियम फॉरमॅटमधून आले आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी रसिकांना उत्सुकता लागली आहे.
या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद असाच ठरला तर छावा पहिल्याच दिवशी दहा कोटी रुपये कमाई करण्याच्या मार्गावर आहे. असे झाले तर विकी कौशलच्या पहिल्या दिवसाच्या सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरले. ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ने पहिल्याच दिवशी आठ कोटी २० कोटी रुपयांची कमाई केली आहे. (Chhawa)
छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख भूमिकेत विकी कौशल आहे. येसुबाई राणीसाहेबांच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आहे. मुघलांविरोधात मराठा साम्राज्याच्या स्वातंत्र्यलढ्यात छत्रपती संभाजीराजे यांनी बलिदान दिले होते. हा जाज्ज्वल्य इतिहास चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी केला आहे.
हेही वाचा :
बोराडे नावाचे साहित्य शिवार
कोल्हापूर चित्रनगरीत लवकरच वस्तुसंग्रहालय
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला, गृहखाते पुन्हा टार्गेटवर
मुंबई : परभणी आणि बीडच्या घटनांमुळे महाराष्ट्राचे गृहखाते वादाच्या केंद्रस्थानी असतानाच सैफ अली खानवरील (Saif Ali Khan Attack) हल्ल्यामुळे ते पुन्हा टीकेचे लक्ष्य बनले आहे. अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री त्याच्या मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील घरात हल्ला झाला. अडीच वाजण्याच्या सुमारास चोरटा घरात घुसला. त्याने आधी मोलकरणीशी वाद घातला. आवाज ऐकून बाहेर आलेल्या सैफने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, असता झालेल्या झटापटीत चोरट्याने सैफवर चाकूहल्ला केला, त्यात गंभीर जखमी झाला.सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. (Saif Ali Khan Attack)
सैफवरील हल्ल्यानंतर मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सैफची पत्नी करीना कपूरकडून एक निवेदन प्रसिद्धीस देऊन सैफची प्रकृती ठीक असल्याचे म्हटले आहे. (Saif Ali Khan Attack)
समोर आलेल्या अधिकृत माहितीनुसार मध्यरात्रीनंतर अडीच वाजता अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात चोरटा घुसला. आधी त्याने घरातल्या मोलकरणीसोबत वाद घातला. आवाजामुळे सैफ बाहेर आला त्याने चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने सैफवर हल्ला केला. या घटनेत सैफ जखमी झाला.
मुंबईतील झोन नऊचे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी यासंदर्भात सांगितले की, “अभिनेता सैफ अली खानच्या घरात अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केली. सैफ व घुसखोर यांच्यात झटापट झाली. या घटनेत सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.”
डॉक्टरांचे निवेदन
जखमी सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैफच्या प्रकृतीसंदर्भात लीलावती रुग्णालयाचे सीओओ सीओओ डॉ निरज उत्तमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार “त्याला पहाटे साडेतीन वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. त्याला सहा जखमा झाल्या आहेत, त्यापैकी दोन जखमा खोल आहेत. एक जखम मणक्याजवळ झाली आहे. आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहोत,” न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि भूलतज्ज्ञ निशा गांधी यांच्याकडून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. (Saif Ali Khan Attack) (Kareena Kapur)
प्रकृती धोक्याबाहेर
गुरुवारी दुपारनंतर सैफच्या टीमने एक निवेदन जारी केले. “सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. डॉक्टर त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत आणि पोलिस या घटनेचा तपास करत आहेत,” असे त्यात लिहिले आहे. या टीमने डॉक्टरांचे तसेच चाहते आणि हितचिंतकांचे आभार मानले आहेत. “आम्ही डॉ. निरज उत्तमानी, डॉ. नितीन डांगे, डॉ. लीना जैन आणि लीलावती हॉस्पिटलच्या टीमचे आभार मानतो. सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांनी केलेल्या प्रार्थनेसाठी धन्यवाद,” असे या निवेदनात म्हटले आहे.
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्याची पत्नी करीना कपूरमार्फत एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, “रात्री सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या घरी घरफोडीचा प्रयत्न झाला. सैफला दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबातील इतर सदस्य सुरक्षित आहेत. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना याप्रकरणी संयम बाळगण्याची विनंती करतो, तसेच या प्रकरणी कोणत्याही अफवा पसरवू नये, कारण पोलीस तपास करत आहेत. काळजीबद्दल सर्वांचे आभार,”
संजय राऊत यांचा हल्लाबोल
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सैफवरील हल्ल्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही. मुंबई असो, बीड असो किंवा परभणी सगळीकडे कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. पंतप्रधानाचं आगतस्वागत, निवडणूक, शिबीरे यामध्ये सरकार गुंतून पडले आहे. सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तो मोठा कलाकार आहे. बुधवारी पंतप्रधान मुंबईत होते, सगळी सुरक्षा तिकडे असणार. पंतप्रधान मुंबईत असले तरीही महाराष्ट्रात काय चालले आहे हा प्रश्न राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारला पाहिजे.
हा पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी धक्का असल्याचे सांगून राऊत म्हणाले, १५ दिवसांपूर्वी सैफ अली खान कुटुंबासह मोदींना भेटायला गेले होते. पंतप्रधान मोदींनी एक तास त्यांच्या कुटुंबासह घालवला होता. त्यानंतर सैफ अली खानवर हल्ला झाला. या राज्यात कुणीही सुरक्षित नाही. महिलांना रस्त्यावर फिरणं कठीण झालं आहे. या राज्याची ९० टक्के सुरक्षा आणि पोलीस हे आमदार, फुटलेल्या लोकांसाठी आहेत. गद्दारांना सुरक्षा पुरवली जाते. सैफ अली खानला सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला आहे. मात्र पद्मश्री किताब असूनही मुंबईत सैफ अली खान यांना सुरक्षित राहू शकत नाही हे वास्तव आहे.
हेही वाचा :
लॉरेन पॉवेल झाल्या कमला !
-
अमोल उदगीरकर
मागच्या आठवड्यात एक अप्रतिम सीरिज आणि एक सुंदर सिनेमा बघायला मिळाला. सर्वप्रथम सीरिजबद्दल बोलूयात.(The Offer and The Killer)
‘द ऑफर’ चं सौंदर्य त्याच्या कथेत तर आहेच पण त्यापेक्षाही त्या सीरिजमधल्या ‘माहोल’ मध्ये आहे. ‘द ऑफर’ ही सीरिज तुम्हाला छोटी छोटी आश्वासनं देते आणि ती पूर्ण करते. आपल्याकडे जेव्हा एखाद्या कलाकृतीच्या तयार होण्याची गोष्ट बनते तेव्हा ती नेहमी त्यांच्या निर्मिकाच्या किंवा त्या कलाकृतीमागच्या सर्जनशील व्यक्तिरेखेच्या POV मधून बनते. ‘Mank’ हर्मन जे मॅकेविझच्या चष्म्यातून दिसतो. ‘लक बाय चान्स’ विक्रम जयसिंगच्या गॉगलमधून दिसतो. आणि अजूनही उदाहरणं आहेत.
‘द ऑफर ‘ चं वेगळेपण असं की ती घडते ‘गॉडफादर’ या अजरामर चित्रपटांच्या यादीत ध्रुवताऱ्यासारखं अढळ स्थान पटकावणाऱ्या प्रोड्युसरच्या नजरेतून. आपल्याकडे प्रोड्युसर म्हणजे सिनेमात पैसे गुंतवून हिरोईनवर डोरे टाकणारा माणूस अशी जनमानसात एक इमेज आहे. खरं तर ‘प्रोडक्शन’ हा फार किचकट, जगाशी पंगे घेत असणाऱ्या लोकांचा जॉब आहे. काही खूप गाजलेले सिनेमे बनण्यात दिग्दर्शकापेक्षा executive producer (EP ) आणि निर्मात्यांचा वाटा जास्त असल्याची उदाहरण आहेत. निर्भीडता हीच पात्रता, लोकांना अंगावर घेणं हेच क्वालिफिकेशन. ‘गॉडफादर’ लिहिणारा मारियो पुझो आणि ‘गॉडफादर’ ही फिल्म डायरेक्ट करणारा फ्रांसिस फोर्ड कपोला इथं दिसत असले तरी ते काहीशा दुय्यम भूमिकेत आहेत. इथल्या दोन प्रमुख भूमिकांमध्ये आहेत पॅरामाउंट या स्टुडिओचा प्रोडक्शन हेड इव्हान्स आणि ‘गॉडफादर’ च्या निर्मितीचं शिवधनुष्य खांद्यावर घेतलेला अल्बर्ट रुडी. (The Offer and The Killer)
सिनेमाचं मीठ खाल्लेल्या लोकांची गोष्ट
अल्बर्ट रुडी हा ‘गॉडफादर’ मधल्या मायकेलसारखाच एकांडा, मनस्वी इसम. ‘गॉडफादर’ मधल्या मायकेलबद्दल बोलताना फ्रान्सिस कपोला बोलून जातो, “He is outsider in his own family.” हेच विधान खरं तर रूडीला पण लागू होण्यासारखं आहे. सिनेमा क्षेत्राचा फारसा अनुभव नसणारा नवशिका रुडी ‘गॉडफादर’ च्या निर्मितीची जबाबदारी घेतो खरं पण पावलापावलावर त्याला प्रचंड अडथळे येतात. त्या अडथळ्यांमागे तत्कालीन अमेरिकेतली सामाजिक-राजकीय गुंतागुंत आहे. ‘गॉडफादर’ च्या केंद्रस्थानी असणारे माफिया ज्या प्रभावशाली ‘अमेरिकन -इटालियन’ समूहातून आलेले आहेत, त्यांचा ‘गॉडफादर’ पुस्तकाला आणि त्यावर बनणाऱ्या सिनेमाला जोरदार आक्षेप आहे.
हा सिनेमा बनू नये म्हणून जोरदार प्रयत्न चालू होतात आणि त्यात आपसूकच इन्व्हॉल्व होतात माफिया. त्यातून प्रोजेक्टवर आणि रूडीवर पण मरणांतिक संकट येतात. बजेटसाठी आणि दिग्दर्शकाला हवी ती कास्टिंग मिळवून देण्यासाठी रुडी आपल्या वरिष्ठांशी वाईटपणा घेऊन संघर्ष करत असतो. खरं तर रुडी हा काही सृजनशील कलाकार नाहीये. पण कपोला आणि पुझोसारख्या कलाकारांना व्यवहारी आणि पैसा हाच परमेश्वर असणाऱ्या हॉलिवूड स्टुडियो सिस्टमपासून तो ज्या निगुतीने जपत असतो ते बघून प्रत्येक दिग्दर्शकाला वाटेल की आपला प्रोड्युसर /executive producer पण रूडीसारखाच असावा. रुडीच्या मागे ठामपणे उभी असणारी त्याची सेक्रेटरी बेटी, रुडी आणि इव्हान्सच्या आयुष्यात येऊन गेलेल्या पॉम्पस स्त्रिया, रुडीशी जिव्हाळ्याचं मैत्र तयार झालेला माफिया जो कोलंबो ही लोकं बघताना वाटत जातं की या प्रत्येक माणसात एक त्याचं स्वतःचं शहर आहे. उगीच स्टिरिओटाइप झालेल्या प्रोड्युसर लोकांना ट्रिब्यूट देणारी ही सीरिज.
तुम्हाला ‘लक बाय चान्स’ आवडला असेल तर हा तुमचा शो आहे. श्रीकृष्णाने वर माग असं कुंतीला सांगितल्यावर त्याला ‘दुःख देत राहा’ असा वर मागितला होता. एखादी कलाकृती बनवताना पडद्यामागे राहून योगदान देणारी माणसं कुंतीसारखी असतात. सिनेमाचं मीठ खाल्लेल्या लोकांनी सिनेमाचं मीठ खाल्लेल्या या लोकांची गोष्ट एकदा तरी आवर्जून बघितली पाहिजे. वूटवर आहे. (The Offer and The Killer)
प्रोफेशनल किलरच्या सायकॉलॉजीचा वेध
याच आठवड्यात बघितलेला डेव्हिड फिंचरचा ‘द किलर’ हा पण एक वेगळा अनुभव होता. ‘सेव्हन’, ‘झोडियॅक’ आणि ‘माईंडहंटर’ सारखं फिंचरचं पूर्वीचं काम डोक्यात ठेवून डेव्हिड फिंचरची ‘द किलर’ बघणार असाल तर थोडा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. मला व्यक्तिशः फिल्म प्रचंड आवडली. फिंचरच्या आधीच्या कामापेक्षा खूप वेगळं आहे हे.
एरवी सीरियल किलर आणि त्यांच्या सायकॉलॉजीचा वेध घेणाऱ्या फिंचरने इथं एका प्रोफेशनल किलरच्या सायकॉलॉजीचा आणि फिलॉसॉफीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रोफेशनल किलर आपलं सावज टप्प्यात येईपर्यंत तासंतास, दिवसेंदिवस वाट बघतात. ते वाट बघत बसणं फिंचरने दाखवलं आहे आणि ही वाट बघत असताना किलर आपली सायकॉलॉजी आणि फिलॉसॉफी प्रेक्षकांना सांगत असतो. सिनेमाचा तीस ते चाळीस टक्के भाग कॉन्ट्रॅक्ट किलरच्या मुख्य भूमिकेत असणाऱ्या मायकेल फासबेंडरच्या मोनोलॉगचा आहे.
मध्यंतरी एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘द किलर’ च्या स्क्रीनिंगनंतर उपस्थित प्रेक्षकांनी फिल्मला स्टँडिंग ओव्हेशन दिल्यावर आणि टाळ्या वाजवल्यावर डेव्हिड फिंचर वैतागून तिथून निघून गेला होता असं वाचलं होतं. फिंचरच वैतागणं ‘द किलर’ बघितल्यावर थोडं कळलं. स्लो बर्न सिनेमा आहे म्हणून न वैतागता सिनेमा बघणार असाल तर ट्रीट आहे. एका प्रसंगात कॉन्ट्रॅक्ट किलरच्या हातून मृत्युमुखी पडण्यापूर्वी एक पात्र त्याला अस्वलाची आणि शिकाऱ्याची एक बोधकथा सांगतं. सिनेमातला सर्वोत्कृष्ट प्रसंग. शेवट पण खूप अनपेक्षित. फिल्म नक्की बघा. नेटफ्लिक्सवर आहे. (The Offer and The Killer)
हैदराबाद : प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनचा ॲक्शन ड्रामा असलेल्या ‘पुष्पा’ने १५०० कोटीची एकत्रित कमाई केली. या दोन्ही भागामुळे पुष्पा अक्षरश: मालामाल होत आहे. मात्र त्याची कथा ज्यावर आधारीत आहे त्या रक्तचंदनाला मात्र राज्यात उठाव नसल्याचे चित्र आहे. आंध्र प्रदेश सरकारच्या ताब्यात असलेल्या रक्तचंदनाच्या साठ्याचा लिलाव अनेकदा जाहीर करण्यात आले. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. (Pushpa)
सिनेमात रक्तचंदनाची होणारी तस्करी आणि त्यातून घडणारे नाट्य दाखवले. सिनेमाचे दोन्ही भाग प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई झाली. म्हणजे दोन्ही भागाची एकत्रित कमाई १५०० कोटीवर गेली आहे. तथापि, आंध्र प्रदेश सरकार मात्र रक्तचंदनाच्या अधिकृत लिलावातून नफा मिळविण्यासाठी अजूनही धडपड असल्याचे वास्तव आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून त्यासाठी कुणी फारसा रस दाखवेनासे झाले आहे. (Pushpa)
लाल चंदन हे लुप्तप्राय प्रजाती म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेने सूचीबद्ध केले आहे. त्यामुळे त्याची तोडणी किंवा विक्री बेकायदेशीर ठरवण्यात आली आहे. मात्र मर्यादित कायदेशीर विक्रीला परवानगी देऊन, संकटग्रस्त यादीतून प्रजाती काढून टाकण्याची परवानगी भारताला मिळाली आहे.
रक्तचंदन रायलसीमा प्रदेशात मिळते. काही पारंपरिक औषधांमध्ये त्याचा वापर केला जाते. तसेच लक्झरी वस्तू उद्योगांमध्ये त्याचा वापर करण्यात येतो. आंध्र प्रदेश सरकार त्याचा लिलाव करते. परंतु, कोविड महामारीपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक टनही विकले गेले नाही.
दरम्यान, भारतातील सर्वांत श्रीमंत जैवक्षेत्रांपैकी एक असलेले राज्यातील शेषाचलम हिल्स रक्तचंदनाच्या तस्करीचे केंद्र बनले आहे. (Pushpa)
एपी सरकारमधील सूत्रांनी असे स्पष्ट केले की, कोविड-१९ साथीच्या काळापासून, कोणत्याही आंतरराष्ट्रीय लिलावात लाल चंदन विकले गेले नाही. विशेष म्हणजे या लाकडासाठी सर्वाधिक रस दाखवणाऱ्या चीननेही यात फारसा रस दाखवलेला नाही.
परकीय व्यापार महासंचालनालयाने आंध्र पदेशला ११,००० टन रक्तचंदन लिलाव करण्याची परवानगी दिली आहे. त्यापैकी सुमारे ४,००० टन अजूनही तिरुपती मंदिरातील डेपोमध्ये अत्यत कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे.
१९९० च्या दशकापासून, आंध्र सरकारने आंतरराष्ट्रीय लिलावाच्या जवळपास २४ फेऱ्या केल्या. परंतु केवळ ₹१,८०० आणि ₹१,९०० कोटी इतकीच रक्कम मिळाली आहे. ‘पुष्पा’च्या कमाईपेक्षा ती किंचित जास्त आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील घरावर संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी दगडफेक केली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी घरात अल्लू अर्जुन घरी नव्हता. (Allu Arjun)
उस्मानिया विद्यापीठातील संयुक्त कृती समितीच्या पदाधिकार्यांनी दगडफेकीसह अल्लू अर्जुन घरात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत महिलेच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संयुक्त कृती समितीच्या सहा जणांना ताब्यात घेतले. दरम्यान अल्लू अर्जुनच्या घरात तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडिया व्यहायल झाला आहे.
जुबली हिल्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील घरावर विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या (जेएसी) सदस्यांनी दगडफेक केली. यासह फलक घेऊन त्याचा निषेध केला. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. परंतु, याप्रकरणाबद्दल अल्लू अर्जुनच्या कुटुंबीयांनी आमच्याकडे कोणतीही तक्रार केलेली नाही असे सांगितले. (Allu Arjun)
Attackers of Allu Arjun’s residence allegedly have pictures with CM Revanth Reddy.
There is pin-drop silence in the Leftist Ecosystem on the state-sponsored attack.
Imagine if this happened to SRK or Aamir Khan in a BJP-ruled state. pic.twitter.com/AkVDd54Rxc
— BALA (@erbmjha) December 22, 2024
हेही वाचा :
नवी दिल्ली : UI (2024) Box Office Collection : “यूआई” या २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या कन्नड चित्रपटाने केवळ दोन दिवसांतच पुष्पा २ च्या १७ दिवसांच्या उत्पन्नाच्या दुप्पट कमाई केली आहे. अल्लू अर्जुनचा पॅन इंडिया सिनेमा “पुष्पा २” हिंदी भाषेत सुपर हिट ठरला असली, तरी कन्नड भाषेत तो तितकासा यशस्वी झाला नाही. मात्र, “यूआई” ने दोन दिवसांत जोरदार प्रदर्शन करून बाजी मारली आहे.
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सैकनिल्कच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, “यूआई” ने पहिल्या दिवशी ६.९५ कोटींची ओपनिंग केली. त्यात कन्नडमध्ये ६.२५ कोटी, तेलुगूमध्ये ६५ लाख, तमिळमध्ये ४लाख, तर हिंदीत एक लाख इतकी कमाई झाली. दुसऱ्या दिवशी हा आकडा साडेसहा कोटी ते सात कोटींच्या दरम्यान होता, ज्यामुळे भारतातील एकूण कलेक्शन १३.९० कोटींपर्यंत पोहोचले. तुलनेत, “पुष्पा २” ने कन्नड भाषेत १७ दिवसांत केवळ ७.२४ कोटींची कमाई केली होती.
“UI ” हा कन्नड भाषेतील सायन्स फिक्शन अॅक्शन चित्रपट आहे. त्याचे लेखन व दिग्दर्शन अभिनेता उपेंद्र यांनी केले आहे. यात रेशमा ननैय्या, निधी सुब्बैया, साधु कोकिला, मुरली कृष्ण, मुरली शर्मा आणि इंद्रजीत लंकेश असे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपटाबाबत प्रदर्शनानंतर संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. मात्र, “यूआई” चे ओपनिंग कलेक्शन अभिनेता उपेंद्रच्या आधीच्या “कब्जा” चित्रपटाच्या च्या 10 कोटींच्या कलेक्शनपेक्षा कमी आहे.
हेही वाचा :
नवी दिल्ली : Pushpa : The Rule – Part 2 बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई करत आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट कमाईचे नवे उच्चांक प्रस्थापित करीत आहे. तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला एक हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. २०२४ मध्ये भारतात एक हजार कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. तसेच २०२४ च्या अखेरपर्यंत किंवा २०२५ च्या सुरुवातीपर्यंत अन्य कोणताही चित्रपट हा विक्रम मोडण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे पुष्पा २ हा २०२४ मध्ये एक हजार कोटींचा आकडा गाठणारा एकमेव चित्रपट ठरला आहे. त्यासोबतच या चित्रपटाने आतापर्यंतच जवान, पठाण, एनिमल आणि स्त्री 2 यांसारख्या चित्रपटांच्या एकूण उत्पन्नालाही मागे टाकले आहे.
पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागाप्रमाणे त्याचा दुसरा भागही प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. सोशल मीडियावर त्याच्या गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. या सगळ्याचे प्रतिबिंब उत्पन्नाच्या आकड्यांमध्ये उमटलेले दिसून येते.
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सैकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, सोळाव्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या शुक्रवारी पुष्पा २ ने १३.७५ कोटींची कमाई केली आहे. भारतातील एकूण कलेक्शन १००४.३५ कोटींवर पोहोचले आहे. त्यात तेलुगूमध्ये २९७.८ कोटी, हिंदीमध्ये ६३२.२६ कोटी, तमिळमध्ये ५२.८ कोटी, कन्नडमध्ये ७.१६ कोटी आणि मल्याळममध्ये १३.९९ कोटींची कमाई झाली आहे. जागतिक स्तरावर हा आकडा दीड हजार कोटींच्या पुढे गेला आहे.
Pushpa : The Rule – Part 2 या चित्रपटाने पहिल्या दिवशी १६४.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी ९३.८ कोटी, तिसऱ्या दिवशी ११९.२५ कोटी, चौथ्या दिवशी १४१.०५ कोटी, पाचव्या दिवशी ६४.४५ कोटी, सहाव्या दिवशी ५१.५५ कोटी, सातव्या दिवशी ४३.३५ कोटी, आठव्या दिवशी ३७.४५ कोटींसह पहिल्या आठवड्यात ७२५.८ कोटींची कमाई झाली.
नवव्या दिवशी ३६.४ कोटी, दहाव्या दिवशी ६३.३ कोटी, अकराव्या दिवशी ७६.६ कोटी, बाराव्या दिवशी २६.९५ कोटी, तेराव्या दिवशी २४.३५ कोटी, चौदाव्या दिवशी २०.५५ कोटी आणि पंधराव्या दिवशी १७.६५ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात एकूण २६४.८ कोटींचा आकडा गाठला आहे.
या आठवड्यातही अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तसेच ख्रिसमसच्या निमित्ताने वरुण धवनचा बेबी जॉन हा चित्रपट रिलीज होण्यास सज्ज आहे. त्यामुळे पुष्पा 2 च्या कमाईवर याचा कितपत परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
-अमोल उदगीरकर
मला कराटेपट/कुंग फू आवडतात. मी अगदी मन लावून ते बघतो. झी टीव्ही आणि मी असे दोघेही बाल्यावस्थेत असताना झीवर ‘हिमगिरी का वीर’ नावाची डब मालिका दाखवायचे. ती मी अतिशय आवडीने बघायचो. त्यात कुंग फू ऍक्शनचा जोरदार धमाका होता. पण विशेष मजेशीर गोष्ट म्हणजे ‘हिमगिरी का वीर’ मधल्या सगळ्या पात्रांना महाभारतातल्या व्यक्तिरेखेची नाव दिलेली होती. त्यात नायकाचं नाव अर्जुन होतं तर खलनायकाचं नाव छोटा कर्ण असं काही तरी होतं. तर तेव्हापासून लागलेला चस्का नंतर कुंग फू सिनेमे बघण्याच्या व्यसनात रूपांतरित झाला. ब्रुसलीचा ‘एंटर द ड्रॅगन’, जॅकी चेनचे सिनेमे, ‘ईप मॅन’ चे पहिले दोन भाग, ‘कराटे किड’ (नवीन आणि जुना दोन्ही ), आणि अगदी ऍनिमेशनपट असणारा ‘ कुंग फु पांडा’ (तिन्ही भाग ) मला प्रचंड आवडतात. या सिनेमांचा प्रचंड प्रभाव ज्यांच्यावर पडला आहे त्यांच्यामध्ये टारंटिनो सारख्या महत्वाच्या दिग्दर्शकाचा पण समावेश आहे. त्याच्या ‘किल बिल’ मध्ये हा प्रभाव स्पष्टच दिसून येतो. कुंग फू पटांची खासियत म्हणजे ते बहुतेक देमार पटांसारखे डोकं बाजूला ठेवून बघण्याचे सिनेमे नाहीत. या सिनेमांना बहुतेक एक अध्यात्मिक डूब असते. बौद्ध धर्मातल्या तत्त्वांचा या सिनेमाच्या पटकथेवर प्रभाव असतो. मुख्य म्हणजे एक्शनपट पुरुषांनाच आवडतात या नियमांना हे सिनेमे छेद देतात. या सिनेमात हिंसाचार असतो पण अतिरक्तपात नसतो. मुख्य म्हणजे या सिनेमांमध्ये नायिका या शोपीस नसतात तर लढवय्या असतात. पुरुषांच्या बरोबरीने दे दणादण हाणामारी करतात. (Kung Fu Hustle)
पण, एक असा कुंग फू पट आहे जो माझ्यासाठी या वरच्या सगळ्या सिनेमांपेक्षा दशांगुळे सरस आहे. तो सिनेमा म्हणजे ‘कुंग फु हसल’. ‘ये सिर्फ मुव्ही नही, एक इमोशन है’ असा घासूनपुसून गुळगुळीत झालेला वाक्प्रचार माझ्यापुरता ‘कुंग फु हसल’ च्या बाबतीत तरी खरा आहे.
सिनेमाची गोष्ट वरकरणी सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमधली लढाई अशी वाटू शकते. पण तसं खरंच आहे का? एका शहरावर दहशत ठेवून असणा-या एक्स गँगची टक्कर एका चाळीत राहणाऱ्या काही रहिवाशांशी होते. या संघर्षाशी काहीही देणंघेणं नसणारा एक भुरटा चोर या संघर्षात स्वतःच्या मूर्खपणामुळे ओढला जातो. अशा दोन ओळीत सिनेमाची कथा सांगणं म्हणजे भगवदगीतेचे सार दोन ओळीत सांगण्यासारखं आहे. टिपिकल मसालापट असून पण ‘कुंग फु हसल’ फिल्ममेकिंगच्या अनेक नियमांना फाट्यावर मारतो. या सिनेमात खलनायक एक्स गॅंग आहे असं प्रेक्षकाला वाटत असतानाच मध्यंतराच्या अलीकडे खऱ्या खतरनाक खलनायकाची एंट्री होते. कसा आहे हा खलनायक? चेहऱ्यावर कारकुनी भाव असणारा. काहीसा स्थूल. डोळ्यावर चष्मा घातलेला. सिनेमात खरा नायक कोण आहे ते सगळ्यात शेवटी कळतं. जे पात्र फक्त विनोदनिर्मितीसाठी आणि कॉन्फ्लिक्ट तयार करण्यासाठी आहे, तो खरा नायक आहे, हे कळल्यावर जबर धक्का बसतो. पण नंतर काळजीपूर्वक बघितल्यावर त्याच्या नायक असण्याचे क्ल्यू सिनेमाभर सोडले आहेत, हे लक्षात येतं. (Kung Fu Hustle)
सिनेमाचं अजून एक मुख्य आकर्षण म्हणजे चाळीत राहणाऱ्या वल्ली. चाळीत राहणाऱ्या या व्यक्ती वरपांगी साधारण, घाबरट आणि loser वाटतात. पण नंतर त्यांच्या अंगी कशा नाना कळा आहेत हे फार उत्तमपणे दाखवलं आहे. सुपरहिरो समाजात आल्टर इगोच्या बुरख्यात लपून असतात, ही थियरी सिनेमात उत्कृष्टरित्या दाखवली आहे. आपलं सध्याचं जग पण असंच आहे. वरून काहीतरी वेगळंच दिसणारं आणि आतून काहीतरी वेगळंच असणारं. चाळीची जहाँबाज खडूस कजाग भांडकुदळ मालकीण जिला तिच्या नवऱ्यासकट सगळे टरकून असतात, ती या सिनेमात सगळ्यात जमून आलेलं पात्र आहे. सिनेमात एक छोटीशी सुंदर प्रेमकथा पण आहे. सिनेमातली एक्शन भन्नाट आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नियमांच सिनेमात पूर्णपणे वाट लावलेली आहे. आपले साऊथ इंडियन सिनेमे `कुंग फू हसल` समोर माना खाली घालून शरणागती पत्करतील. पण हा सिनेमा एकदा बघून एन्जॉय करून सोडून देण्यासारखा आहे का? तर नाही. अंडरडॉग- ज्याच्या बद्दल नंतर आपल्याला सहानुभूती निर्माण होते, त्याचं रूपांतर शेवटी एका फायटर नायकात होण्याची प्रक्रिया जितकी मनस्वी, सुंदर आहे तितकीच अध्यात्मिक आहे. आणि क्लायमॅक्समधला शेवटचा ऍक्शन सीन म्हणजे वल्लाह, अझिमोशां शहेनशहा आहे. आणि सिनेमाचा शेवट पण तितकाच सुंदर. पुन्हा एक्शनपटांच्या नियमांना फाट्यावर मारणारा. मला या सिनेमाचं वाचोवस्की ब्रदर्सच्या ‘मॅट्रिक्स’ चित्रत्रयीच्या बाबतीत जाणवतं. (Kung Fu Hustle)
सिनेमात एक भिकारी दाखवला आहे. तो लहान मुलांना फसवून त्यांच्याकडचे पैसे घेऊन त्यांना कुंग फू ची पुस्तकं विकत असतो. त्याच्याकडे कुंग फू कसा करावा, हठयोग कसा करावा, कुंडलिनी जागृत करण्याची पुस्तकं असतात. सिनेमातला नायक अशा हळुवार संवेदनशील क्षणी आपल्याकडचे आहे नाही ते पैसे देऊन त्याच्याकडून पुस्तकं विकत घेतो आणि अपमान मानभंग विकत घेतो. पण त्या पुस्तक विकत घेण्याच्या छोट्या कृतीचे परिणाम किती मोठे होतात, हे बघण्यासाठी सिनेमाचं बघायला पाहिजे. आता सध्याच्या अस्थिर असुरक्षित जगात पुस्तकासाठी आपला पैशांचा गल्ला फोडणाऱ्या मुलांची खूप गरज आहे. आता पुन्हा हा संदर्भ समजण्यासाठी तुम्हाला हा भन्नाट सिनेमा बघावाच लागेल. ‘कुंग फू हसल’ नक्की बघा.
हेही वाचा :