मुंबई : प्रतिनिधी : हिंदी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांचे वयाच्या ८७ वर्षी निधन झाले. मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांनी शुक्रवारी (४ एप्रिल) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. डीकंपेंसेटेड लिव्हर सिरोसिस या आजाराने ते बरेच दिवस आजारी होते. २१ फेब्रुवारी रोजी त्यांना उपचारासासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शनिवारी (५ एप्रिल) त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
भारतकुमार नावाने प्रसिद्ध
देशभक्तिपर चित्रपटाची निर्मिती मनोजकुमार यांनी केली होती. त्यांची भारत कुमार नावाने ओळख होती. त्यांनी उपकार, पूरब पश्चिम, क्रांती, रोटी कपडा और मकान या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली होती. सात वेळा फिल्मफेअर पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. १९९२ मध्ये त्यांना पद्मश्री आणि २०१६ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
आबोटाबादमध्ये मनोजकुमार यांचा जन्म
मनोजकुमार यांचे जन्म २४ जुलै १९३७ रोजी अबोटाबाद येथे झाला होता. सध्या हा भाग पाकिस्तानात आहेत. हरक्रिशन गोस्वामी हे त्यांचे मूळ नाव आहे. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, चित्रपट लेखन, गीतकार, एडिटर या सर्व गोष्टीत त्या पारंगत होते. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते. त्यांच्या पत्नीचे नाव शशी गोस्वामी असून अभिनेता कुणाल गोस्वामी असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. फाळणीनंतर ते भारतात आले. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नाटकातही कामे केली. त्यांचा चेहरा देखणा असल्याने त्यांना चित्रपटात संधी मिळाली. दिलीपकुमार हा त्यांचा आवडता अभिनेता होता. १९५७ मध्ये फॅशन या चित्रपटातून अभिनयास प्रारंभ केला. रेशमी रुमाल, काँच की गुडिया, डॉक्टर विद्या, हरियाली और रास्ता, वो कौन थी, गुमनाम, शहीद, हिमालय की गोद मे, सावन की घटा, दो बदन, पत्थर के सनम हे चित्रपट त्यांचे गाजले. चरित्र अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. शहीद या चित्रपटातील त्यांची क्रांतीवीर भगतसिंग यांची भूमिका चांगलीच गाजली होती.
देशभक्तीपर चित्रपटांची निर्मिती
उपकार या चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. या चित्रपटातील ‘मेरे देश के धरती’ हे गाणे खूपच गाजले होते. रोटी कपडा और मकान, क्रांती, पूरब और पश्चिम, पेंटर बाबू, जय हिंद, शोर, क्लर्क या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली होती. देशभक्तीपर चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली. क्रांती, पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान या चित्रपटांची निर्मिती केली. मनोज कुमार यांना सात फिल्मफेअर अवॉर्ड मिळाली होती. १९७३ मध्ये बेईमान या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
हेही वाचा :