महाराष्ट्र् दिनमान ऑनलाईन डेस्क : सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी सोडू नका. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. थेट रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही संधी आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) कडून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहेत. (Indian Railways)
IRCTC ने AGM/DGM आणि डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक उमेदवारांना irctc.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ६ नोव्हेंबर २०२४ आहे. शेवटच्या तारखेच्या अगोदर उमेदवारांना अर्ज करणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी ५५ वयोगटापर्यंतचे उमेदवार हे अर्ज करू शकतात. IRCTC च्या या भरती मोहिमेत मुलाखतीमधून उमेदवाराची निवड केली जाईल. अंतिम निवड मुलाखतीतील उमेदवारांच्या कामगिरीवर आधारित असेल. (Indian Railways)
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वात अगोदर IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज ही डाऊनलोड करावी लागणार आहेत आणि सर्व कागदपत्रांसह रेल्वे बोर्डाकडे पाठवावी लागतील. यासोबतच अर्जाची स्कॅन प्रत [email protected] वर ईमेल करणे आवश्यक आहे.
हेही वाचा :