मोहाली : महिलेला आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका पास्टरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०१८ मध्ये ही घटना घडली होती. बजिंदर सिंग असे या पास्टरचे नाव आहे. (Pastor sentenced)
मोहालीचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विक्रांत कुमार यांच्या न्यायालयाने शुक्रवारी (२८ मार्च) ४२ वर्षीय बजिंदरला दोषी ठरवले. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ३२३ (स्वेच्छेने दुखापत केल्याबद्दल शिक्षा) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत कोर्टाने त्याला दोषी ठरवले.
बजिंदरने एका महिलेवर अत्याचार केला होता. तिला परदेशात नेऊन तेथे स्थायिक होण्यासाठी मदत करण्याचे आमिष त्याने दाखवले होते. तिला मोहालीच्या सेक्टर ६३ येथील त्याच्या निवासस्थानी नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्याचे रेकॉर्डही केले. संबंधित महिलेने त्याच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर रेकॉर्ड केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी दिली होती, असा आरोप पीडित महिलेने केला होता. (Pastor sentenced)
एफआयआर नोंदवल्यानंतर, बजिंदरला २०१८ मध्ये दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले होते.
हेही वाचा :
ढिगाऱ्याखाली स्कूल बॅग्ज, पुस्तके आणि खेळणी…
इम्रान खान यांचे नोबेलसाठी नामांकन