कोल्हापूर : कुस्तीतील बांगडी डावाने प्रसिद्ध असणारे बांगडी बहाद्दर पैलवान आणि अनेक राष्ट्रीय पातळीवरील मल्ल घडविणारे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक पांडुरंग गोविंद तथा पीजी पाटील (वय ८३ ,रा. पाटाकडील तालीम, मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे सुना नातवंडे भाऊ-बहीण असा परिवार आहे. (Bangadi Bahaddar wrestler)
विद्यार्थी दशेतअसताना पी जी सरांनी पतियळा येथील स्पर्धेत पदक मिळवले होते. बरीच वर्षे विद्यापीठ चॅम्पियन असणारे पी जी पाटील मोतीबाग तालीम येथे सराव करीत होते. त्यांनी महान भारत केसरी पैलवान दादू चौगुले ,कुस्ती सम्राट पैलवान युवराज पाटील, हिंदकेसरी चंभा मुतनाळ, राष्ट्रकुल पदक विजेते राम सारंग संभाजी पाटील याआंतरराष्ट्रीय मल्लांसह महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर गुलाब बर्डे ,सरदार कुशल विष्णू फडतरे, बाळू पाटील. अग्नेल व जिजो निग्रो हिंदकेसरी विनोद चौगुले यांच्यासह आता सराव करणाऱ्या बहुतांशी मल्लांना प्रशिक्षण देऊन घडविले आहे.
विशेषतः कुस्ती सम्राट युवराज पाटील यांना आखाड्यातील सरावाबरोबरच क्रीडांगणावरही धावणे व इतर ऍथलेटिक्स व जिम्नेशियम करण्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले होते. सदैव क्रीडांगण आणि आखाड्यात असणारे पी.जी. पाटील गेल्या दीड वर्षात घरीच होते. पण, अनेक मल्ल त्यांना घरी भेटून त्यांचे मार्गदर्शन घेत होते. (Bangadi Bahaddar wrestler)
कोल्हापूर जिल्हा परिषदेत ते लिपिक होते. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेबरोबर पाटाकडील तालमीचे कार्याध्यक्ष ,कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सेक्रेटरी ,महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सचिव व प्रशिक्षक अशा अनेक संघटनात्मक पदावर त्यांनी काम केले. प्रसिद्धीपासून अलिप्त राहून कुस्ती कलेची सेवा करणारे एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले.
हेही वाचा :