चंद्रपूर : ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या तीन गिधाडांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. बोटेझरी जंगलात ही गिधाडे सोडली होती. याच वर्षीच्या जानेवारीत हरियाणातील पिंजोर येथून आणलेल्या संकटग्रस्त व नामषेश होण्याच्या मार्गावर असलेल्या १० गिधाडांना जीएसम ट्रान्समिशन ट्रॅकिंग डिव्हाईस लावून बोटेझरी येथे सोडले होते. ही घटना गुरुवारी उजेडात आली आहे. वनविभागाने मृत गिधाडांचे अवशेष अधिक तपासणीसाठी पाठविले आहे. (Tadoba)
महाराष्ट्र
मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुंबईवरील २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या पोलिसांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अभिवादन केले. मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस स्मारक येथे पोलीस अधिकारी व जवानांना पुष्पचक्र वाहिले.
राज्यपालांनी हुतात्मा पोलीस कुटुंबातील सदस्यांची तसेच उपस्थित आजी व माजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, रश्मी शुक्ला, वरिष्ठ अधिकारी डॉ. इकबाल सिंह चहल, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनीही अभिवादन केले.
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र राज्य विधानसभेची आज (दि.२६) मुदत संपत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सादर केला. यावेळी नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी एकनाथ शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्य कारभार पाहण्यास सांगितले. (Eknath Shinde)
आज (दि.२६) सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यपालांनी एकनाथ शिंदेंचा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री
चौदाव्या विधानसभेचा कालावधी संपुष्टात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राजभवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपल्या पदाचा व मंत्रीमंडळाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कार्यभार सांभाळण्यास सांगितले.
चौदाव्या विधानसभेचा कालावधी आज संपुष्टात आला. त्यामुळे हे सभागृह बरखास्त झाले आहे. निवडून आलेल्या सदस्यांकरवी नवीन सभागृह अस्तित्वात येईल. नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. (Eknath Shinde)
हेही वाचा :
मुंबईः महाराष्ट्रात भाजपला आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि भाजपच्या दबावामुळे आता फडणवीस यांच्या निवडीची औपचारिकता उरली आहे. अजित पवार यांनी रविवारीच फडणवीस यांच्या मुख्यमंत्री होण्याला अनुकूलता दाखवली होती. एकनाथ शिंदे यांच्या काही समर्थकांनी बिहार व अन्य राज्यांची उदाहरणे देत नाव रेटण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यावर उतारा म्हणून आता भाजप आणि शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद घेण्याचा फॉर्म्युला तयार करण्यात आला असून, त्याला तीनही पक्षांनी मान्यता दिली आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत उशिरा त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने राज्यात सरकार चालवण्याचा फॉर्म्युला ठरवला आहे. पहिली अडीच वर्षे फडणवीस मुख्यमंत्री, तर पुढील अडीच वर्षे शिंदे मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर फडणवीस यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केले जाणार आहे. सूत्रानुसार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मिळून फडणवीस यांची भूमिका निश्चित केली आहे. त्यांना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये करार झाला आहे. त्याचवेळी फडणवीस यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी पक्षश्रेष्ठी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तयारी सुरू झाली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी सहमती दर्शवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याचे मुख्य कारण म्हणजे फडणवीस यांचा दोन्ही संघटनांमधील समान समन्वय हे आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून फडणवीस विजयी झाले आहेत. या जागेवरून त्यांचा हा सलग चौथा विजय आहे. फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांचा पराभव केला आहे. २०१४ मध्येही दोघे आमनेसामने आले होते. त्या वेळी फडणवीस ५८,९४२ मतांनी विजयी झाले होते. २०१९ मध्ये काँग्रेसने उमेदवार बदलून आशिष देशमुख यांना तिकीट दिले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस ४९,३४४ मतांनी विजयी झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने फडणवीस यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्रिपदासाठी मंजुरी मिळाल्याचे भाजपच्या एका सूत्राने सांगितले. महायुतीतील अन्य सूत्रांनी सांगितले, की फडणवीस मुख्यमंत्रिपदी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी एक उपमुख्यमंत्रिपद असेल. पवार यांच्यासह शिंदे यांना उपमुख्यमंत्री केले जाण्याची शक्यता आहे. गेल्या ३६ तासांपासून शिंदे यांची भाजपशी चर्चा सुरू होती.
शिवसेनेला जवळपास १२ मंत्रिपदे मिळू शकतात आणि काही महत्त्वाची खाती दिली जाऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसलाही सुमारे दहा मंत्रिपदे मिळणार असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्रातील मंत्री परिषदेची संख्याबळ मर्यादा ४३ आहे, त्यात मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. १३२ आमदारांसह भाजपकडे २१ मंत्रिपदे जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह, वित्त, नगरविकास आणि महसूल ही प्रमुख चार खाती आता भाजपऐवजी युतीतील मित्रपक्षांना दिली जाणार आहेत. मंत्रिपदे आणि खात्यांच्या संख्येवरून वाटाघाटी सुरू आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्लीत शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. त्यानंतर घोषणा अपेक्षित आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पक्षाचे हित अबाधित ठेवत त्यांच्या समस्यांची काळजी घेण्याचे आश्वासन मित्रपक्षांना दिल्याचे मानले जात आहे. यापूर्वी २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळही पूर्ण केला. त्या वेळी भाजपची तत्कालीन अविभाजित शिवसेनेशी युती होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने अजित पवार यांच्याशी हातमिळवणी केली. फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली; परंतु हे सरकार केवळ ८० तास टिकले.
सर्वाधिक आमदार फडणवीस यांच्या पाठीशी
भाजपच्या पाठिंब्यामुळे चार सहयोगी पक्षांतील आमदार निवडून आले. विधानसभेतील नवनिर्वाचित पाच आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि अशोक माने, युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा आणि अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांचा भाजपला पाठिंबा आहे. ५ आमदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपची संख्या १३७ वर पोहोचली आहे. महायुतीतील सर्वाधिक आमदारांची मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पसंती देण्यात आली आहे. भाजपने आपल्या कोट्यातून चार जागा मित्रपक्षांना सोडल्या होत्या, त्यापैकी तीन जागांवर विजय झाला असून, तिन्ही आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे.
मुंबईः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट फडणवीस यांच्यावर हल्ला केला आहे. तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाला, की मी पुन्हा उपोषणाला बसलोच समजा. तुम्ही पुन्हा या, मी पुन्हा उपोषणास बसतो. काय व्हायचे ते बघू या. आपल्यापाशी सुट्टी नाही, असा इशारा त्यांनी दिला. जरांगे पाटील म्हणाले, की यापूर्वीही तेच होते. दुसरे कोणी नव्हते. मराठे सगळ्यांशी खेटले आहेत. मराठ्यांपुढे कोणीही सत्ताधारी नाही. मी मराठ्यांची पोर मोठे करण्याचा ध्यास घेतला आहे. आरक्षण देण्याचे वचन समाजाला दिले आहे. पडणारे पडले, निवडून येणारे आले. आपण त्यांचे संसार मोठे केले. आम्ही पडलेला आणि निवडून आलेला दोघांनाही मतदान केलेले आहे. आता या दोघांनी मराठ्यांच्या गोरगरीब पोरांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे.
राज्यात कोणाचेही सरकार आले, तरी मराठ्यांना काही टेन्शन नाही. कारण कोणीही आले तरी आम्हाला लढावेच लागणार आहे. मागच्या सरकारमध्ये तेच होते. या सरकारमध्ये तेच आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांचे काही सोयरसुतक नाही. आता देशात झाले नाही, असे सामूहिक उपोषण आपण करणार आहोत. आता मराठ्यांचा नाद करायचा नाही. मराठ्यांच्या मनगटात बळ आहे. त्यांच्यात रग आहे. त्यांना तोडीस तोड उत्तर दिले जाईल. तुम्ही आहेतच किती? तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आपल्याकडून बोलत नाहीत. यामुळे मराठ्यांना लढावेच लागणार आहे. हे दोन्ही बोलत नाहीत, म्हणूनच आम्हाला उमेदवार उभे करून त्यांचा सुपडा साफ करायचा होता; परंतु आमचे समीकरण जुळले नाही. तसेच निवडणूक एकाच जातीवर निवडून येणे शक्य नव्हते; परंतु माझ्या मराठ्याशिवाय राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही. मराठे गप्प आहेत. शांत आणि संयमी आहेत; परंतु त्यांच्यात भयंकर आग धुमसते आहे. ताकदसुद्धा आहे. मराठ्यांना खेटण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.
मुंबईः मुंबईतील पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने आरोपीच्या वकिलाला चांगलेच फटकारले. न्यायालयाने म्हटले आहे, की एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला आणि तुम्ही पीडितेशी आरोपीचे अधिकार संतुलित करण्याची मागणी करत आहात, तुम्ही हे कसे करू शकता? या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी करत होते.
सुनावणीदरम्यान न्या. शर्मा म्हणाले, की यापेक्षा क्रूर केस मी पाहिलेली नाही. न्या. त्रिवेदी म्हणाल्या, की हे ओपन अँड शट केस आहे. सर्व साक्षीदार तुमच्या विरोधात आहेत, हा उच्च न्यायालयाचा सविस्तर निर्णय आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आरोपींनी केलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली. या प्रकरणाची सुनावणी मंगळवार, २६ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. २०१३ मध्ये मुंबईत २३ वर्षीय महिला फोटो जर्नालिस्टवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला. महिला पत्रकार संध्याकाळी फोटो काढण्यासाठी तिच्या मित्रासोबत लोअर परळ येथील शक्ती मिल परिसरात गेली होती. त्यादरम्यान आरोपींनी पीडितेच्या मित्राला बंधक बनवून बेल्टने बांधले. त्यानंतर महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला. या आरोपींपैकी एक किशोरवयीन होता.
सामूहिक बलात्कारानंतर पीडित महिलेची प्रकृती अत्यंत वाईट झाली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. त्यांना पकडण्यासाठी सुमारे २० पथके तैनात करण्यात आली होती. सर्व आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. त्या वेळी या प्रकरणावरून बराच गदारोळ झाला होता. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईतील एन. एम.जोशी पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने केली, तर मुंबईतील पत्रकार संघटनेनेही मोर्चा काढला होता.
मुंबईः विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती एकही जागा लागली नाही. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच असे घडले आहे. मनसेचा एकही आमदार विधानसभेमध्ये नसेल. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज पराभूत आमदारांबरोबर पराभवाच्या कारणांची माहिती घेण्यासाठी, चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबरची जवळीक घातक ठरल्याचे मत पराभूत उमेदवारांनी नोंदवले.
आज राज यांनी मुंबईमधील निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतले. या बैठकीमध्ये ‘ईव्हीएम’संदर्भातील काही तक्रारी पराभूत उमेदवारांनी राज यांच्याकडे केल्या. भाजपबरोबरची जवळीक आपल्याला फायद्याची ठरली नाही, असे पराभूत उमेदवारांनी राज यांना सांगितले आहे. राज यांनी मुंबई आणि उपनगरांमधून एकूण ४२ उमेदवार उभे केले होते; मात्र एकही उमेदवार जिंकून आला नाही. इतकेच काय तर स्वत: राज यांचे पुत्र अमित ठाकरे हेसुद्धा दादर-माहीम मतदारसंघातून तिसऱ्या स्थानी राहत पराभूत झाले. पक्षाचा एकही आमदार निवडून आलेला नाही.
या पार्श्वभूमीवर राज यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला मुंबई आणि परिसरातील पराभूत उमेदवारांना बोलावले होते. नेमका पराभव कशामुळे झाला याची चाचपणी त्यांनी या बैठकीमध्ये केली. मनसेच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत होता. सभांना गर्दी होत होती, मग त्याचे रूपांतर मतांमध्ये का झाले नाही? यावर या बैठकीत चर्चा झाली. किमान चार ते पाच जण निवडून येतील, अशी अपेक्षा मनसेला होती; मात्र १३८ उमेदवार उभे करून एकही उमेदवार निवडून आला नाही. या वेळी बैठकीमधील पराभूत उमेदवारांकडून ‘ईव्हीएम’वर शंका उपस्थित करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीला भाजपशी जवळीक करत बिनशर्त पाठिंबा दिला होता; मात्र विधानसभेला भाजपशी जवळीक करणे फायद्याचे ठरले नाही, असे पराभूत उमेदवारांनी सांगितले. या सगळ्या गोष्टींची नाराजी उमेदवारांनी व्यक्त केली आहे. या बैठकीमध्ये राज यांनी कोणतेही मार्गदर्शन केले नाही. त्यांनी केवळ पराभूत उमेदवारांना काय वाटते, हे जाणून घेतसे. आता राज यानंतर काय बोलणार, प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार का, हे अजून गुलदस्त्यातच आहे.
मुंबई : विशेष प्रतिनिधी : आदर्श आचारसंहिता लागू असताना वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आचारसंहितेचा भंग केला आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
निवडणूक काळात काँग्रेसने वारंवार केलेल्या मागणीमुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवले होते. सरकारने त्यांना निवडणूक काळापूर्वीपुरता सक्तीच्या रजेवर पाठवले. विधानसभेत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्याने त्यांचे सरकार पुन्हा स्थापन होणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्ला यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेत यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते.
याबाबत लोंढे म्हणाले की, तेलंगणामध्ये अशाच प्रकारे पोलीस महासंचालक आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वरिष्ठ मंत्र्याची भेट घेतली असता निवडणूक आयोगाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली होती. गैरभाजपा राज्यात निवडणूक आयोग तत्काळ कारवाई करतो पण भाजपाशासित राज्यात निवडणूक आयोगाला काही दिसतच नाही का?. शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यासारखे गंभीर गुन्हे आहेत. काँग्रेसच्या मागणीमुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. विधानसभेचा निकाल लागला असला तरी आचारसंहिता संपण्याआधीच गृहमंत्र्यांना भेटून शुक्ला यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केलेले आहे, त्यांच्यावर तातडीने कारावाई झाली पाहिजे, याचा पुनरूच्चार लोंढे यांनी केला.
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील २८८ मतदारसंघांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक,२३० जागा मिळाल्या. विरोधी महाविकास आघाडीला ५० जागांचा आकडाही पार करता आला नाही. ‘मविआ’ची पुरती धूळदाण उडाली. जाणून घ्या पक्षनिहाय नवनियुक्त आमदारांची नावे…
भारतीय जनता पार्टी
- शहादा (२५)- राजेश उदेसिंग पाडवी
- नंदुरबार (३) – डॉ.विजयकुमार कृष्णराव गावित
- धुळे ग्रामीण (६)- राघवेंद्र (रामदादा) मनोहर पाटील
- धुळे शहर (७)- अग्रवाल अनुपभैय्या ओमप्रकाश
- सिंदखेडा (८)- जयकुमार जितेंद्रसिंग रावल
- शिरपूर (९)- काशीराम वेचन पावरा
- रावेर (११)- अमोल हरिभाऊ जावळे
- भुसावळ (१२)- सावकारे संजय वामन
- जळगाव शहर (१३)- सुरेश दामू भोळे (राजू मामा)
- चाळीसगाव (१७)- मंगेश रमेश चव्हाण
- जामनेर (१९)- गिरीश दत्तात्रय महाजन
- मलकापूर (२१)- चैनसुख मदनलाल संचेती
- चिखली (२३)- श्वेता विद्याधर महाले
- खामगाव (२६)- आकाश पांडुरंग फुंडकर
- जळगाव (जामोद) (२७)- कुटे संजय श्रीराम
- अकोट (२८) – प्रकाश गुणवंत भारसाकळे
- अकोला पूर्व (३१)- रणधीर प्रल्हादराव सावरकर
- मूर्तिजापूर (३२)- हरीश मारोतीअप्पा पिंपळे
- वाशिम (३४)- श्याम रामचरण खोडे
- कारंजा (३५)- साई प्रकाश डहाके
- धामणगाव रेल्वे (३६)- अडसड प्रताप अरुणभाऊ
- तेओसा (३९)- राजेश श्रीरामजी वानखडे
- मेळघाट (४१)- केवलराम तुळशीराम काळे
- अचलपूर (४२)- प्रवीण वसंतराव तायडे
- मोर्शी (४३)- उमेश उर्फ चंदू आत्मारामजी यावलकर
- आर्वी (४४)- सुमित वानखेडे
- देवळी (४५)- राजेश भाऊराव बकाणे
- हिंगणघाट (४६)- समीर त्र्यंबकराव कुणावर
- वर्धा (४७)- डॉ.पंकज राजेश भोयर
- काटोल (४८)- चरणसिंग बाबुलालजी ठाकूर
- सावनेर (४९)- डॉ.आशिषराव देशमुख
- हिंगणा (५०)- समीर दत्तात्रय मेघे
- नागपूर दक्षिण पश्चिम (५२)- देवेंद्र गंगाधर फडणवीस
- नागपूर दक्षिण (५३)- मोहन गोपाळराव माटे
- नागपूर पूर्व (५४)- खोपडे कृष्णा पंचम
- नागपूर मध्य (५५)- दटके प्रवीण प्रभाकरराव
- कामठी (५८)- चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे
- तिरोरा (६४)- विजय भरतलाल रहांगडाले
- गोंदिया (६५)- अग्रवाल विनोद
- आमगाव (६६)- संजय पुराम
- गडचिरोली (६८)- डॉ.मिलिंद रामजी नरोटे
- राजुरा (७०)- देवराव विठोबा भोंगळे
- चंद्रपूर (७१)- जोरगेवार किशोर गजानन
- बल्लारपूर (७२)- मुनगंटीवार सुधीर सच्चिदानंद
- चिमूर (७४)- बंटी भांगडीया
- वरोरा (७५)- करण संजय देवतळे
- राळेगाव (७७) – प्रा.डॉ.अशोक रामाजी वूईके
- आर्णी (८०)- राजू नारायण तोडसाम
- उमरखेड (८२)- किसन मारोती वानखेडे
- किनवट (८३)- भीमराव रामजी केराम
- भोकर (८५)- चव्हाण श्रीजया अशोकराव
- नायगाव (८९)- राजेश संभाजीराव पवार
- देगलूर (९०) – अंतापूरकर जितेश रावसाहेब
- मुखेड (९१)- तुषार गोविंदराव राठोड
- हिंगोली (९४)- मुटकुळे तान्हाजी सखारामजी
- जिंतूर (९५)- बोर्डीकर मेघना दीपक साकोरे
- परतूर (९९)- बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर)
- बदनापूर (१०२)- कुचे नारायण टिळकचंद
- भोकरदन (१०३)- दानवे संतोष रावसाहेब
- फुलंब्री (१०६)- अनुराधा अतुल चव्हाण
- औरंगाबाद पूर्व (१०९)- अतुल मोरेश्वर सावे
- गंगापूर (१११)- बंब प्रशांत बन्सीलाल
- बागलाण (११६)- दिलीप मंगलू बोरसे
- चांदवड (११८)- डॉ.आहेर राहुल दौलतराव
- नाशिक पूर्व (१२३)- ॲड. राहुल उत्तमराव ढिकले
- नाशिक मध्य (१२४)- देवयानी सुहास फरांडे
- नाशिक पश्चिम (१२५)- हिरे सीमा महेश
- विक्रमगड (१२९) – भोये हरिश्चंद्र सखाराम
- नालासोपारा (१३२)- राजन बाळकृष्ण नाईक
- वसई (१३३)- स्नेहा दुबे पंडित
- भिवंडी पश्चिम (१३६)- चौघुले महेश प्रभाकर
- मुरबाड (१३९)- किसन शंकर कथोरे
- उल्हासनगर (१४१)- ऐलानीकुमार उत्तमचंद
- कल्याण पूर्व (१४२)- सुलभा गणपत गायकवाड
- डोंबिवली (१४३)- चव्हाण रवींद्र दत्तात्रय
- मीरा भाईंदर (१४५)- नरेंद्र मेहता
- ठाणे (१४८)- संजय मुकुंद केळकर
- ऐरोली (१५०)- गणेश रामचंद्र नाईक
- बेलापूर (१५१)- मंदा विजय म्हात्रे
- बोरिवली (१५२)- संजय उपाध्याय
- दहिसर (१५३)- चौधरी मनीषा अशोक
- मुलुंड (१५५)- मिहीर कोटेचा
- कांदिवली पूर्व (१६०)- अतुल भातखळकर
- चारकोप (१६१)- योगेश सागर
- गोरेगाव (१६३)- विद्या ठाकूर
- अंधेरी पश्चिम (१६५)- अमित भास्कर साटम
- विलेपार्ले (१६७)- अलवणी पराग
- घाटकोपर पश्चिम (१६९)- राम कदम
- घाटकोपर पूर्व (१७०)- पराग शहा
- वांद्रे पश्चिम (१७७)- ॲड. आशिष शेलार
- सायन कोळीवाडा (१७९)- कॅप्टन आर तमिळ सेल्वन
- वडाळा (१८०)- कालिदास निळकंठ कोळंबकर
- मलबार हिल (१८५)- मंगल प्रभात लोढा
- कुलाबा (१८७)- ॲड राहुल सुरेश नार्वेकर
- पनवेल (१८८)- प्रशांत रामशेठ ठाकूर
- उरण (१९०)- महेश बालदी
- पेण (१९१)- रविशेठ पाटील
- दौंड (१९९) – कुल राहुल सुभाषराव
- चिंचवड (२०५)- जगताप शंकर पांडुरंग
- भोसरी (२०७)- महेश (दादा) किसन लांडगे
- शिवाजीनगर (२०९)- सिद्धार्थ अनिल शिरोळे
- कोथरूड (२१०)- चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील
- खडकवासला (२११)- भीमराव धोंडिबा तापकीर
- पार्वती (२१२)- माधुरी सतीश मिसाळ
- पुणे कॅन्टोन्मेंट (२१४)- कांबळे सुनील ज्ञानदेव
- कसबा पेठ (२१५)- हेमंत नारायण रासणे
- शिर्डी (२१८) – पाटील विखे राधाकृष्ण एकनाथराव
- शेवगाव (२२२)- मोनिका राजीव राजळे
- राहुरी (२२३)- कर्डिले शिवाजी भानुदास
- श्रीगोंदा (२२६)- पाचपुते विक्रम बबनराव
- आष्टी (२३१)- धस सुरेश रामचंद्र
- कैज (२३२)- नमिता अक्षय मुंदडा
- लातूर ग्रामीण (२३४)- रमेश काशीराम कराड
- निलंगा (२३८)- निलंगेकर संभाजी दिलीपराव पाटील
- औसा (२३९)- अभिमन्यू दत्तात्रय पवार
- तुळजापूर (२४१)- राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील
- सोलापूर शहर उत्तर (२४८)- देशमुख विजय सिद्रामप्पा
- सोलापूर शहर मध्य (२४९)- देवेंद्र राजेश कोठे
- अक्कलकोट (२५०)- कल्याणशेट्टी सचिन पंचप्पा
- सोलापूर दक्षिण (२५१)- देशमुख सुभाष सुरेशचंद्र
- पंढरपूर (२५२) – औताडे समाधान महादेव
- मान (२५८)- जयकुमार भगवानराव गोरे
- कराड उत्तर (२५९)- मनोज भीमराव घोरपडे
- कराड दक्षिण (२६०)- डॉ.अतुलबाबा सुरेश भोसले
- सातारा (२६२)- शिवेंद्रराजे अभयसिंहराजे भोंसले
- कणकवली (२६८)- नितेश नारायण राणे
- कोल्हापूर दक्षिण (२७४)- अमल महादेवराव महाडिक
- इचलकरंजी (२७९)- राहुल प्रकाश आवाडे
- मिरज (२८१)- डॉ.सुरेश (भाऊ) दगडू खाडे
- सांगली (२८२) – सुधीरदादा उर्फ धनंजय हरी गाडगीळ
- शिराळा (२८४)- देशमुख सत्यजित शिवाजीराव
- जत (२८८)- गोपीचंद कुंडलिक पडळकर
शिवसेना (एकनाथ शिंदे)
- अक्कलकुवा (१) – आमश्या फुलाजी पाडवी
- साक्री (५)- मंजुळा तुळशीराम गावित
- चोपडा (१०)- चंद्रकांत बळीराम सोनवणे
- जळगाव ग्रामीण (१४)- गुलाबराव रघुनाथ पाटील
- एरंडोल (१६)- अमोल चिमणराव पाटील
- पाचोरा (१८)- किशोर आप्पा पाटील
- मुक्ताईनगर (२०)- चंद्रकांत निंबा पाटील
- बुलढाणा (२२)- गायकवाड संजय रामभाऊ
- रामटेक (५९)- आशिष नंदकिशोर जैस्वाल (वकिल)
- भंडारा (६१)- भोंडेकर नरेंद्र भोजराज
- दिग्रस (७९)- राठोड संजय दुलीचंद
- हदगाव (८४)- कोहलीकर बाबुराव कदम
- नांदेड उत्तर (८६)- बालाजी देविदासराव कल्याणकर
- नांदेड दक्षिण (८७)- आनंद शंकर तिडके
- कळमनुरी (९३)- बांगर संतोष लक्ष्मणराव
- घनसावंगी (१००)- उडान हिकमत बळीराम
- जालना (१०१)- अर्जुन पंडितराव खोतकर
- सिल्लोड (१०४)- अब्दुल सत्तार
- कन्नड (१०५)- रंजनाताई (संजना) हर्षवर्धन जाधव
- औरंगाबाद मध्य (१०७)- जैस्वाल प्रदीप शिवनारायण
- औरंगाबाद पश्चिम (१०८)- संजय पांडुरंग शिरसाट
- पैठण (११०)- भुमरे विलास संदीपानराव
- वैजापूर (११२)- बोरनारे (सर) रमेश नानासाहेब
- नांदगाव (११३)- सुहास (अण्णा) द्वारकानाथ कांदे
- मालेगाव बाह्य (११५)- दादाजी दगडू भुसे
- पालघर (१३०)- गावित राजेंद्र धेड्या
- बोईसर (१३१)- विलास सुकूर तरे
- भिवंडी ग्रामीण (१३४)- शांताराम तुकाराम मोरे
- कल्याण पश्चिम (१३८)- विश्वनाथ आत्माराम भोईर
- अंबरनाथ (१४०)- डॉ.बालाजी प्रल्हाद किणीकर
- कल्याण ग्रामीण (१४४)- राजेश गोवर्धन मोरे
- ओवळा – माजिवडा (१४६)- प्रताप बाबुराव सरनाईक
- कोपरी – पाचपाखाडी (१४७) – एकनाथ संभाजी शिंदे
- मागाठाणे (१५४)- प्रकाश सुर्वे
- भांडुप पश्चिम (१५७)- अशोक धर्मराज पाटील
- अंधेरी पूर्व (१६६)- मुरजी पटेल (काका)
- चांदिवली (१६८)- दिलीप भाऊसाहेब लांडे
- चेंबूर (१७३)- तुकाराम रामकृष्ण काटे
- कुर्ला (१७४)- कुडाळकर मंगेश
- कर्जत (१८९)- थोरवे महेंद्र सदाशिव
- अलिबाग (१९२)- महेंद्र हरी दळवी
- महाड (१९४) – गोगावले भरत मारुती
- पुरंदर (२०२)- विजयबापू शिवतारे
- संगमनेर (२१७)- अमोल धोंडिबा खताळ
- नेवासा (२२१)- विठ्ठल वकीलराव लंघे
- परंडा (२४३)- प्रा.डॉ.तानाजी जयवंत सावंत
- कोरेगाव (२५७)- महेश संभाजीराजे शिंदे
- पाटण (२६१)- देसाई शंभूराज शिवाजीराव
- दापोली (२६३) – कदम योगेशदादा रामदास
- रत्नागिरी (२६६)- उदय रवींद्र सामंत
- राजापूर (२६७)- किरण उर्फ भैय्या सामंत
- कुडाळ (२६९)- निलेश नारायण राणे
- सावंतवाडी (२७०)- दीपक वसंतराव केसरकर
- राधानगरी (२७२)- आबिटकर प्रकाश आनंदराव
- करवीर (२७५)- चंद्रदीप शशिकांत नरके
- कोल्हापूर उत्तर (२७६)- राजेश विनायक क्षीरसागर
- खानापूर (२८६)- बाबर सुहास अनिलभाऊ
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
- अमळनेर (१५)- अनिल भाईदास पाटील
- सिंदखेड राजा (२४)- कायंदे मनोज देवानंद
- अमरावती (३८)- सुलभा संजय खोडके
- तुमसर (६०)- कारेमोरे राजू माणिकराव
- अर्जुनी मोरगाव (६३)- बडोले राजकुमार सुदाम
- अहेरी (६९) – आत्राम धरमरावबाबा भगवंतराव
- पुसद (८१)- इंद्रनील मनोहर नाईक
- लोहा (८८)- प्रतापराव पाटील चिखलीकर
- बससमथ (९२)- चंद्रकांत उर्फ राजूभैय्या रमाकांत नवघरे
- पाथरी (९८)- राजेश उत्तमराव विटेकर
- कळवण (११७)- नितीनभाऊ अर्जुन (ए.टी.) पवार
- येवला (११९)- छगन भुजबळ
- सिन्नर (१२०) – ॲड. कोकाटे माणिकराव शिवाजी
- निफाड (१२१)- बनकर दिलीपराव शंकरराव
- दिंडोरी (१२२)- नरहरी सीताराम झिरवाळ
- देवळाली (१२६)- अहिरे सरोज बाबुलाल
- इगतपुरी (१२७)- खोसकर हिरामण भिका
- शहापूर (१३५)- दौलत भिका दरोडा
- अनुशक्ती नगर (१७२)- सना मलिक
- श्रीवर्धन (१९३)- अदिती सुनील तटकरे
- आंबेगाव (१९६)- दिलीप दत्तात्रय वळसे पाटील
- शिरूर (१९८) – ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके
- इंदापूर (२००)- दत्तात्रय विठोबा भरणे
- बारामती (२०१) – अजित अनंतराव पवार
- भोर (२०३)- शंकर हिरामण मांडेकर
- मावळ (२०४)- सुनील शंकरराव शेळके
- पिंपरी (२०६) – अण्णा दादू बनसोडे
- हडपसर (२१३)- चेतन विठ्ठल तुपे
- अकोले (२१६) – डॉ.किरण यमाजी लहामटे
- कोपरगाव (२१९)- आशुतोष अशोकराव काळे
- पारनेर (२२४)- काशिनाथ महादू दाते सर
- अहमदनगर शहर (२२५)- संग्राम अरुणकाका जगताप
- गेवराई (२२८) – विजयसिंह शिवाजीराव पंडित
- माजलगाव (२२९)- प्रकाश (दादा) सुनादरराव सोळंके
- परळी (२३३)- धनंजय पंडितराव मुंडे
- अहमदपूर (२३६)- बाबासाहेब मोहनराव पाटील
- उदगीर (२३७)- संजय बाबुराव बनसोडे
- फलटण (२५५)- सचिन पाटील
- वाई (२५६)- मकरंद लक्ष्मणराव जाधव (पाटील)
- चिपळूण (२६५)- शेखर गोविंदराव निकम
- कागल (२७३)- मुश्रीफ हसन मियालाल
काँग्रेस
- नवापूर (४)- शिरीषकुमार सुरुपसिंग नाईक
- अकोला पश्चिम (३०)- साजिद खान पठाण
- रिसोड (३३)- अमीत सुभाषराव झनक
- उमरेड (५१)- संजय नारायणराव मेश्राम
- नागपूर पश्चिम (५६)- विकास पांडुरंग ठाकरे
- नागपूर उत्तर (५७)- डॉ.नितीन काशिनाथ राऊत
- साकोली (६२)- नानाभाऊ फाल्गुनराव पाटोळे
- आरमोरी (६७)- रामदास मालुजी मसराम
- ब्रह्मपुरी (७३)- विजय नामदेवराव वडेट्टीवार
- यवतमाळ (७८)- अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मांगुळकर
- मालाड पश्चिम (१६२)- अस्लम रामजनअली शेख
- धारावी (१७८)- डॉ.गायकवाड ज्योती एकनाथ
- मुंबादेवी (१८६)- अमीन पटेल
- श्रीरामपूर (२२०)- ओगले हेमंत भुजंगराव
- लातूर शहर (२३५)- अमित विलासराव देशमुख
- पलूस – कडेगाव (२८५)- कदम विश्वजित पतंगराव
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
- मुंब्रा – कळवा (१४९)- आव्हाड जितेंद्र सतीश
- वडगाव शेरी (२०८)- बापूसाहेब तुकाराम पठारे
- कर्जत जामखेड (२२७)- रोहित पवार
- बीड (२३०)- संदीप रवींद्र क्षीरसागर
- करमाळा (२४४)- नारायण (आबा) गोविंदराव पाटील
- मधा (२४५)- अभिजीत धनंजय पाटील
- मोहोळ (२४७)- खरे राजू ज्ञानू
- माळशिरस (२५४)- उत्तमराव शिवदास जानकर
- इस्लामपूर (२८३)- जयंत राजाराम पाटील
- तासगाव – कवठेमहांकाळ (२८७)- रोहित सुमन आर.आर.आबा पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- मेहकर (२५): खरात सिद्धार्थ रामभाऊ
- बाळापूर (१९) : नितीन भिकनराव देशमुख
- दर्यापूर (४०) : गजानन मोतीराम लवाटे
- वणी (७६): देरकर संजय निळकंठराव
- परभणी (९६) : डॉ.राहुल वेदप्रकाश पाटील
- विक्रोळी (१५६) : सुनील राजाराम राऊत
- जोगेश्वरी पूर्व (१५८): अनंत (बाळा) बी. नर
- दिंडोशी (१५९): सुनील वामन प्रभू
- वर्सोवा (१६४): हारून खान
- कलिना (१७५): संजय गोविंद पोतनीस
- वांद्रे पूर्व (१७६): वरुण सतीश सरदेसाई
- माहीम (१८१): महेश बळीराम सावंत
- वरळी (१८२): आदित्य उद्धव ठाकरे
- शिवडी (१८३): अजय विनायक चौधरी
- भायखळा (१८४) : मनोज पांडुरंग जामसुतकर
- खेड आळंदी (१९७) : बाबाजी रामचंद्र काळे
- उमरगा (२४०): प्रवीण वीरभद्रय्या स्वामी (सर)
- उस्मानाबाद (२४२): कैलास बाळासाहेब घाडगे पाटील
- बार्शी (२४६): दिलीप गंगाधर सोपल
- गुहागर (२६४): जाधव भास्कर भाऊराव
राजर्षी शाहू विकास आघाडी
- शिरोळ (२८०)- राजेंद्र शामगोंडा पाटील (यड्रावकर)
समाजवादी पक्ष
- भिवंडी पूर्व (१३७): रईस कासम शेख
- मानखुर्द शिवाजी नगर(१७१): अबू असीम आझमी
जन सुराज्य शक्ती
- साहुवाडी (२७७): विनय विलासराव कोरे (सावकर)
- हातकणंगले(२७८) दलितमित्र डॉ.अशोकराव माने
एआयएमआयएम
- मालेगाव (मध्य) : मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक
इतर
- बडनेरा (३७): रवी गंगाधर राणा
- गंगाखेड (९७): गुट्टे रत्नाकर माणिकराव
- डहाणू (१२८): विनोद भिवा निकोळे
- सांगोले (२५३): बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख
- जुन्नर (१९५): शरददादा भीमाजी सोनवणे
- चंदगड (२७१): शिवाजी शत्तुरा पाटील
महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लोकसभेतील पराभव विसरत महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत महायुतीने मोठा कमबॅक केला आहे. या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मी माझ्या लाडक्या बहिणींचे मनापासून अभिनंदन करतो. राज्यात महायुती सरकारने केलेल्या कामांची पोचपावती मिळाली आहे. या दणदणीत विजयामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. राज्यातील जनतेला त्रिवार वंदन करतो. महायुतीच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. (Eknath Shinde)
एकनाथ शिंदे यांनी नेत्यांसह मिठाई वाटप करून आनंद साजरा केला. पुढे बोलताने एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री कोण होणार हे अजून ठरलेले नाही. निवडणुकीचा स्पष्ट निकाल येवू द्या. जसे आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे गेलो. तसेच महायुती म्हणून एकत्र बसून मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेवू असे एकनाथ शिंदे म्हणाले.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महायुतीने राज्यातील २८८ पैकी २१७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीने ५१ जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतरांनी २० जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान निकाल स्पष्ट होताच महायुतीने सत्ता स्थापन करण्याची तयारी केली आहे.