वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या करधोरणाबद्दलच्या धरसोडवृत्तीचे दर्शन शनिवारी घडवले. करधोरणात महत्त्वपूर्ण बदल करत ट्रम्प प्रशासनाने स्मार्टफोन, कम्प्युटर्स आयातशुल्क मुक्त करत असल्याची घोषणा केली. यामध्ये चीनचाही समावेश करण्यात आला आहे. (US relief)
ट्रम्प प्रशासनाने स्मार्टफोन, संगणक आणि इतर उच्च-तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्सना त्यांच्या व्यापक अशा “जशास तसे ” जागतिक आयात शुल्कातून सूट दिली आहे. वाढत्या व्यापार तणावादरम्यान अमेरिकन ग्राहकांवर होणाऱ्या संभाव्य परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.
शुक्रवारी (११ एप्रिल) उशिरा यूएस कस्टम्स आणि बॉर्डर प्रोटेक्शनने एका सूचनेद्वारे ही सूट जाहीर केली. त्यामुळे चीनमधून येणाऱ्या आयात शुल्कासह विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लागू होणार नाही. यामध्ये स्मार्टफोन आणि संगणक घटकांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे. चीनविरोधात आक्रमक होत ट्रम्प यांनी अतिरिक्त १४५% कर आकारण्याचे धोरण घेतले होते. (US relief)
अमेरिका आणि चीन या जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापार युद्धाच्या ताज्या घडामोडीदरम्यान, चीनने शुक्रवारी अमेरिकन वस्तूंवरील शुल्क ८४% वरून १२५% पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला इतर राष्ट्रांवरील शुल्क स्थगित केले असताना चिनी आयातीवरील शुल्क एकूण १४५% पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर चीनने जशास तसे धोरण अवलंबले. (US relief)
चीनने अमेरिकेच्या धोरणाला ‘आर्थिक गुंडगिरी’ म्हटले आहे. तसेच आम्ही अमेरिकेपुढे कधीही हार मानणार नाही. प्रसंगी जागतिक व्यापार संघटनेकडे दाद मागू, अशी भूमिका जाहीर केली. जशास तसे शुल्क वाढीमुळे जागतिक बाजारपेठा हादरल्या आहेत. व्यापक आर्थिक मंदीची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ट्रम्प प्रशासनाने इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील आयातशुल्क मागे घेतले. (US relief)
ट्रम्पच्या टॅरिफमुळे अमेरिकन आयातदार हैराण : वोल्डेनबर्ग सीईओ
दरम्यान, ट्रम्प यांनी चीनमधून आयातीवर मोठ्या प्रमाणात नवीन टॅरिफ लादल्याने चिनी उत्पादनांवर अवलंबून असलेल्या अमेरिकन व्यवसायांना धक्का बसला आहे, असे ‘वोल्डेनबर्ग’चे सीईओ रिक वोल्डेनबर्ग यांनी म्हटले आहे.
असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, नाट्यमयरित्या केलेल्या टॅरिफ वाढीमुळे अमेरिकन आयातदारांना धक्का बसला आहे. शिकागो-क्षेत्रातील शैक्षणिक खेळण्यांची कंपनी लर्निंग रिसोर्सेसचे सीईओ रिक वोल्डेनबर्ग म्हणाले की त्यांनी ४०% टॅरिफ वाढ करण्याची योजना आखली होती, परंतु दर तिप्पटीपेक्षा जास्त वाढल्याने ते डोळे पांढरे होण्याची वेळ आली.
चार दशकांपासून चीनमध्ये उत्पादने बनवणाऱ्या वोल्डेनबर्गच्या कंपनीला आता २०२५ साठी अंदाजे १०० दशलक्ष डॉलर्सच्या टॅरिफ बिलाचा सामना करावा लागत आहे. तो गेल्या वर्षीच्या २.३ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
हेही वाचा :
ईव्हीएम हॅक करता येते
मला ‘असला’ वकील नको; राणाची कोर्टाला विनंती