नवी दिल्लीः अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या कंपनीने अमेरिकेत काम मिळवण्यासाठी लाच दिल्याचा आरोप असून, तिथल्या न्यायालयाने कामकाज सुरू केले आहे. त्याचे पडसाद भारताच्या शेअर बाजारात उमटले. भारतीय गुंतवणूकादारांना मोठा फटका बसला. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानी यांना अटक करण्याची मागणी केली, तर भाजपने राहुल यांच्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाल्याचा आरोप केला. अदानी समूहाने मात्र आरोप फेटाळले असून, अमेरिकेतील कामातून सध्या माघार घेण्याचे जाहीर केले आहे.
अदानी यांनी दोन हजार कोटींचा घोटाळा केला असून, त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी राहुल यांनी केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी अदानींना वाचवत आहेत, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, की मोदी हे अदानी यांचे समर्थन करतात. घोटाळा होऊनही त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि होणार नाही. आम्हाला माहीत होते, की त्यांना अटक होणार नाही, कारण पंतप्रधान त्यांच्या मागे उभे आहेत. राहुल यांनी अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी केली. हा मुद्दा आम्ही संसदेत मांडू. अमेरिकन एजन्सी म्हणाली, की अदानी यांनी गुन्हा केला आहे. तेथेही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोदी इथे अदानीविरोधात काहीही करत नाहीत आणि करू शकत नाहीत.
राहुल म्हणाले, की अदानी यांनी संपूर्ण देशाला हायजॅक केले आहे. घोटाळा होऊनही अदानी तुरुंगाबाहेर का? इथे छोट्या गुन्हेगाराला लगेच तुरुंगात टाकले जाते आणि अदानी इतके दिवस तुरुंगाबाहेर आहेत. अदानी यांचे सरकारवर पूर्ण नियंत्रण आहे. अदानी भारत आणि अमेरिकेतील गुंतवणूकदारांना खोटे बोलले आहेत. त्यांना अटक करून चौकशी करण्यात यावी आणि त्यानंतर यात कोणाचा हात असेल त्यांना अटक करण्यात यावी, अशी आमची इच्छा आहे. अदानी रोज भ्रष्टाचार करत आहे. संपूर्ण निधी एजन्सी त्यांच्या हातात आहे. मोदी यांना इच्छा असूनही अदानी यांना अटक करता येत नाही. अदानी यांना अटक करण्याची ताकद मोदी यांच्याकडे नाही. कारण ज्या दिवशी ते असे करतील त्या दिवशी तेही जातील. मोदी आणि अदानी एक असतील, तर ते सुरक्षित आहे, अशी टीका त्यांनी केली.
इथे मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवले जाते आणि २००० कोटींचा घोटाळा करून अदानी बाहेर फिरत आहेत. कारण पंतप्रधान मोदी त्यांचे संरक्षण करत आहेत. अदानी यांनी भारत आणि अमेरिकेत गुन्हे केल्याचे अमेरिकन तपासात म्हटले आहे; मात्र भारतात अदानींविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. अदानी यांना अटक करावी, अशी आमची मागणी आहे. माधबी बुच यांना पदावरून हटवून त्यांची चौकशी करण्यात यावी.
अदानी यांच्यावर सौरऊर्जेच्या कंत्राटासाठी लाच दिल्याचा आरोप आहे. अदानी यांनी या कंत्राटासाठी भारतीय अधिकाऱ्यांना २२०० कोटी रुपये दिल्याचे आरोपात म्हटले आहे. अदानी यांच्यासह आठ जणांवर फसवणुकीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अदानी आणि सागर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी यूएस कोर्टात केस दाखल करण्यात आली होती. पैशासाठी विदेशी गुंतवणूकदारांना खोटे बोलल्याचा आरोप अदानी यांच्यावर आहे. अमेरिकन गुंतवणूकदारांचे पैसे गुंतल्याने अदानींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच म्हणून पैसे देणे हा अमेरिकन कायद्यानुसार गुन्हा आहे. अदानी यांच्यावर अमेरिकेच्या ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन’ने आरोप केल्यानंतर देशातील राजकीय तापमान तापले आहे.
राहुल यांच्या हल्ल्याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसचे सरकार जिथे होते, तिथे गौतम अदानींनी गुंतवणूक केली होती का, असा सवाल पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला. तुमच्या सरकारांनी मदत का घेतली याचे उत्तर राहुल यांनी द्यावे, अशी मागणी करून संबित पात्रा म्हणाले, की छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांचे सरकार होते. आंध्र प्रदेशात ‘वायएसआरसीपी’चे सरकार होते. तमिळनाडूत स्टॅलिन यांचे सरकार होते, ओडिशात नवीन पटनायक सरकार होते. अदानी यांनी तिथे गुंतवणूक केली होती. अदानी भ्रष्ट असतील तर मदत का घेतली?
अदानी यांच्या मागे मोदी आहेत, असे राहुल म्हणतात, तर मग भूपेश बघेलांच्या काळात छत्तीसगडमध्ये २५ हजार कोटी रुपये का गुंतवले गेले? अशोक गेहलोत यांनी राजस्थानमध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक का केली? तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी त्यांच्या संस्थेसाठी १०० देणग्या का घेतल्या? या सर्व प्रश्नांबाबत आम्ही तुम्हाला न्यायालयात जाण्यास सांगतो, असे आव्हान त्यांनी दिले.
२२०० कोटींची लाच
अदानी यांच्यावर सौरऊर्जेच्या कंत्राटासाठी लाच दिल्याचा आरोप आहे. अदानी यांनी या कंत्राटासाठी भारतीय अधिकाऱ्यांना २२०० कोटी रुपये दिल्याचे आरोपात म्हटले आहे. अदानी यांच्यासह आठ जणांवर फसवणुकीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अदानी आणि सागर यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. २४ ऑक्टोबर रोजी अमेरिकन न्यायालयात केस दाखल करण्यात आली होती.
अमेरिकन सिक्युरिटीज मागे घेण्याचा निर्णय
‘अदानी ग्रीन एनर्जी’ने ‘स्टॉक एक्स्चेंज’ला दिलेल्या फाइलिंगमध्ये म्हटले आहे, की अमेरिकेच्या न्याय विभागाने आमच्या बोर्डाचे सदस्य विनित जैन यांचाही अशाच प्रकारच्या फौजदारी खटल्यात समावेश केला आहे. या घडामोडी लक्षात घेऊन आमच्या सहाय्यक कंपन्यांनी प्रस्तावित अमेरिकन डॉलर मूल्याच्या सिक्युरिटीज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी बंदरांपासून ऊर्जेपर्यंत व्यवसाय करणाऱ्या कंपनीने अमेरिकन शॉर्ट-सेलर ‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या गंभीर आरोपानंतर तिची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडची २० हजार कोटी रुपयांची फॉलो-ऑन पब्लिक ऑफर रद्द केली होती.
हेही वाचा :