Home » Blog » cash recovered: कारमध्ये सापडले घबाड

cash recovered: कारमध्ये सापडले घबाड

तब्बल दोन कोटी रोकड जप्त

by प्रतिनिधी
0 comments
cash recovered

कोल्हापूर : प्रतिनिधी : थर्टी फस्ट आणि न्यू इअर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या गस्तीदरम्यान पोलिसांना रोख रकमेचे घबाड मिळाले. एक संशयित कारची तपासणी केली असताना त्यात रोख एक कोटी ९८ लाख ९९ हजार ५०० रुपये सापडले. पोलिसांनी कारमधील किरण हणमंत पवार (रा. देवापूर, ता. माण, जि. सातारा), व आण्णा सुभाष खडतरे (सांगोला, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेतले आहे. सापडलेली रक्कम सोने-खरेदी विक्री व्यवहारातील असून कर्नाटकातील उडपी येथे पोहोचवण्यासाठी नेण्यात येत होती, अशी माहिती प्राथमिक तपासात दोघांनी दिली. (cash recovered)

थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री नाकाबंदीसह गस्तीपथके कार्यरत ठेवली होती. नागाळा पार्क, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कॉन्स्टेबल दिगंबर कुंभार, रत्नदीप जाधव यांना एका हॉटेलच्या पिछाडीला अंधारात थांबलेली कार आढळली. पोलिसांनी कारजवळ जाऊन चौकशीचा प्रयत्न करताच कारमधील किरण पवार आणि आण्णा खडतरे यांची हालचाल संशयास्पद वाटली.(cash recovered)

पोलिसांनी या दोघांना खडसावून विचारणा केली. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना संशय बळावताच त्यांनी कारचा दरवाजा उघडला. त्यात दोन बॅगांसह सीटखाली आणि पायाजवळ नोटांची बंडल सापडले. कॉन्स्टेबल कुंभार, जाधव यांनी तत्काळ पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्याशी संपर्क केला. निरीक्षक डोके लागलीच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून रोकड ताब्यात घेतली. आयकर विभागाचे निरीक्षक अमोल पंढरपूरकर, विनयकुमार दुबे यांच्या उपस्थितीत इनकॅमेरा रक्कम जप्तीची कारवाई करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत दोघांकडे चौकशी सुरू होती. जप्त रक्कम कोल्हापूर येथील माणिक पाटील यांच्याकडून घेतल्याची त्यांनी माहिती दिली. उडपी येथील काही सराफी व्यावसायिकाकडे ही रक्कम पोहोच करण्यासाठी नेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

उर्मिला कोठारेच्या कारची धडक; मजुराचा मृत्यू

मामीने मामाच्या खुनाची सुपारी का दिली?

 

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00