कोट्टायम : कॉलेजमध्ये नव्याने दाखल झालेल्या फ्रेशर्सचे कपडे काढण्यात आले. त्यांना दारु पाजण्यात आली. चित्रिकरण करण्यात आले. कुणाला सांगितल्यास व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली… येथील सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंगचा धक्कादायक आणि क्रूर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाच वरिष्ठ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. (Brutal ragging)
प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अनेक महिने अनन्वित छळ करण्यात आला. अत्यंत क्रूरपणे त्यांच्यावर रॅगिंग करण्यात आले. या प्रकाराबद्दल नर्सिंगच्या सीनिअर क्लासमधील कोट्टायम येथील सॅम्युअल (२०) आणि विवेक (२१), वायनाड येथील जीवा (१९), रिजिल जिथ (२०) आणि मलप्पुरम येथील राहुल राज (२२) या पाच विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. (Brutal ragging)
नोव्हेंबरमध्ये कॉलेज पुन्हा सुरू झाल्यानंतर लगेचच या घटना सुरू झाल्या. येथे नव्याने दाखल झालेल्या तिरुअनंतपुरममधील सहा विद्यार्थ्यांवर कॉलेजच्या वसतिगृहात रॅगिंग करण्यात आले. वरिष्ठ विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर गंभीर शारीरिक आणि मानसिक छळ केला. कंपासचा वापर करून दुखापत केली. तक्रार केल्यास आणखी त्रासाला सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिली. पीडित विद्यार्थांना झालेल्या जखमांवर लोशन लावले गेले. त्यामुळे त्यांना वेदना झाल्या, तरीही त्यांचा छळ सुरूच होता, असे एका पीडित विद्यार्थ्याने सांगितले.
रॅगिंगमध्ये फ्रेशर्सना कपडे काढण्यास भाग पाडण्यात आले. त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर डंबेल्स लटकवण्यात आले. तसेच त्यांचा सतत अपमान करण्यात आला. कहर म्हणजे या वरिष्ठ विद्यार्थ्यांनी पीडितांना दारू पिण्यास भाग पाडले. त्याचे चित्रीकरण केले आणि ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यामुळे पीडितांना सतत भीती वाटत होती. कारण व्हिडिओ सार्वजनिक झाल्यास त्यांची शैक्षणिक कारकीर्द नष्ट होण्याची त्यांना धमकी देण्यात आली होती. वरिष्ठ विद्यार्थ्यांनी मागितलेले पैसे देण्यास असमर्थ असलेल्या एका पीडित विद्यार्थ्यावर शारीरिक अत्याचारही केल्याचे उघड झाले आहे. (Brutal ragging)
हा प्रकार असह्य झालेल्या एका विद्यार्थ्याने त्याच्या पालकांच्या कानावर ही घटना घातली. त्यांनी त्याला गांधीनगर पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला, पोलिसांना हा किरकोळ प्रकार वाटला, परंतु कसून तपास केल्यावर रॅगिंगचा भयानक प्रकार उघड झाला. (Brutal ragging)
स्टेशन हाऊस ऑफिसर टी. श्रीजीथ यांच्या नेतृत्वाखाली गांधीनगर पोलिसांनी पाच आरोपी विद्यार्थ्यांना अटक केली. रॅगिंगच्या या घटनांमध्ये अन्य विद्यार्थ्यांचा सहभाग आहे का, याचा तपासही पोलिस करत आहेत. दोषींवर कारवाईचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. या त्रासदायक घटनेमुळे विद्यार्थ्यांचे अशा अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.
हेही वाचा :