बरेली : विवाहाच्या पूर्वी नवरा मुलग्याने मित्रांसमवेत दारु ढोसली आणि विवाहवेदीवर उभा राहिला. विवाह विधीवेळी नवऱ्या मुलाने नवरीला हार घालण्याऐवजी नवरीच्या मैत्रिणीच्या गळ्यात हार घातला. यावेळी चिडलेल्या नवरीने नवऱ्या मुलाचा गाल लाल करत दिवसा चार चाँद दाखवले.(bride cancels marriage)
उत्तर प्रदेशातील बरेली गावात ही घटना घडली. ती चांगलीच व्हायरल झाली आहे. एकवीस वर्षीय राधादेवीचा विवाह रवींद्र कुमार या युवकाबरोबर होणार होता. सोमवारी रवींद्र कुमार वरात घेऊन हॉलवर पोहोचला. हॉलवर येण्यापूर्वी रवींद्रेने मित्रासमवेत दारुची पार्टी केली होती. हॉलवर रवींद्रच्या पालकांनी मुलीच्या पालकांकडे हुंडा मागितला. त्यावरुन वधू वरांच्या दोन्ही कुटुंबात वाद झाला. अखेर मध्यस्त्यांनी वाद मिटवला. त्यानंतर विवाह विधी सुरू झाला. यावेळी दारु पिऊन तर्रर असलेल्या रवींद्रने नवरी मुलगी राधाच्या गळ्यात हार घालण्याऐवजी तिच्या मैत्रिणीच्या गळ्यात हार घातला. त्यावर भडकलेल्या राधादेवीने रवींद्रच्या कानशिलात लगावली आणि लग्नास नकार दिला.(bride cancels marriage)
घडलेल्या प्रकारामुळे दोन्ही कुटुंबात पुन्हा राडा झाला. दोन्हीकडील नातेवाईकांनी एकामेकांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या. अखेर काही नातेवाईकांनी पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळी आल्यावर राडा थांबला. त्यानंतर वधूच्या कुटुंबाने नवरा मुलाच्या कुटुंबाविरोधात तक्रार केली. दारु पिऊन धिंगाणा घातल्यावर वर रवींद्र आणि त्यांच्या मित्रांना पोलिसांनी अटक केली. मुलीच्या कुटुंबाकडून हुंडा घेतला आणि त्यांना मानसिक त्रास दिल्याबद्दल रवींद्रच्या कुटुंबीयाविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
जिल्हा परिषदेला ५७ कोटींचा चुना लावण्याचा प्रयत्न
कोल्हापूरसह ६० ठिकाणी सीबीआय छापे