ऑकलंड : पाकिस्तानविरुद्धच्या आगामी टी-२० क्रिकेट मालिकेसाठी न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून अष्टपैलू मायकेल ब्रेसवेलची निवड करण्यात आली आहे. पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेस १६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. (Bracewell)
नुकत्याच संपलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ उपविजेता ठरला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळलेले काही खेळाडू २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत खेळणार असल्याने त्यांचा समावेश पाकविरुद्धच्या मालिकेसाठी करण्यात आलेला नाही. रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डेव्हॉन कॉन्वे, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन हे न्यूझीलंडचे खेळाडू आगामी आयपीएलमध्ये विविध संघांतर्फे खेळणार आहेत. त्याचप्रमाणे, न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसन ११ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळणार असल्याने त्यालाही संघाबाहेर ठेवण्यात आले.(Bracewell)
वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीचा संघात समावेश करण्यात आला असला, तरी तो मालिकेतील अखेरच्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकतो. हेन्री खांद्याच्या दुखापतीतून सावरत असून त्यामुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही खेळता आले नव्हते. त्याचवेळी, काइल जेमिसन आणि विल ऑरुर्के हे वेगवान गोलंदाज मालिकेतील सुरुवातीच्या तीन सामन्यांसाठी उपलब्ध असतील. बेन सिअर्स, फिन ॲलन, जेम्स निशॅम, ईश सोधी, मिचेल हे, टीम सिफर्ट आदी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न खेळलेले खेळाडूही पाकविरुद्ध खेळतील. (Bracewell)
न्यूझीलंड संघ : मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), फिन ॲलन, मार्क चॅपमन, झॅकरी फोक्स, मिचेल हे, मॅट हेन्री, काइल जेमिसन, डॅरेल मिचेल, जेम्स निशॅम, विल ऑरुर्के, टीम रॉबिन्सन, बेन सिअर्स, टीम सिफर्ट, जेकब डफी, ईश सोधी.
हेही वाचा :
मयंक आयपीएलच्या पूर्वार्धास मुकणार
भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी उठवली