Home » Blog » Book publication : ‘यूज इट ऑर लूज इट’ पुस्तकाचे प्रकाशन

Book publication : ‘यूज इट ऑर लूज इट’ पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. हनुमंत भोसले यांच्या पुस्तकात मातीच्या भरण-पोषणावर माहिती

by प्रतिनिधी
0 comments
Book publication

कोल्हापूर : प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक डॉ. हनुमंत सदाशिव भोसले यांच्या माती आणि खतांचे पोषण या विषयावरील ‘यूज इट ऑर लूज इट’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यसभेचे खासदार इरन्ना काडादी यांच्या हस्ते झाले. यावेळी हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक जयकुमार खोत, कोल्हापूर जिल्हा परिषद कृषी विभागातील तांत्रिक आधिकारी प्रल्हाद साळुंखे, निवृत्त पोलिस अधिकारी विजयकुमार कदम, स्वप्निल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. (Book publication)

युज इट ऑर लूज इट या पुस्तकात ‘फर्टिलायझर अॅक्टिव्हेटर टेक्नोलॉजी’ विषयी माहिती देण्यात आली आहे. ते भारतातील पहिले तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानामुळे खतामधील पोषक  घटकांची गळती वाचवते. मातीची स्थिरता वाढवते आणि पोषक घटकांच्या शोषण प्रक्रियेची गुणवत्ता वाढवते. ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढते. लागवडीचे खर्च कमी होतात. (Book publication)

पुस्तकाचे लेखक डॉ. हनुमंत भोसले यांनी पुस्तकातील ‘४५ दिवसांची भुकेची खिडकी’ ही संकल्पना स्पष्ट केली. बहुतांशी शेतातील पीक हे तीस ते ४५ दिवसाचे असते. या कालावधीत पिकांच्या भुकेच्या अवस्थेचे वर्णन करते. ती पुढील ४५ दिवसांपर्यंत सुरू राहते. या काळात, पिके पोषक घटकांच्या कमतरतेमुळे त्यांच्या अस्तित्वाचे संरक्षण करण्यासाठी अधिक कार्यक्षमतेने अन्न शोषतात. ही सर्वांगीण भरण-पोषण प्रक्रिया प्लांट सेल जनरेशन टेक्नोलॉजीवर आधारित आहे.

राज्यसभेचे खासदार इरान्ना काडादी यांनी डॉ. भोसले यांचे  पुस्तक शेतकऱ्यांना मातीविज्ञान आणि अ‍ॅग्रोनॉमीच्या जटील संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यास मदत करते असे मत व्यक्त केले. या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शेतकरी उत्पादन वाढवू शकतात. या पुस्तकामुळे शेतकऱ्यांना विज्ञानाच्या गहन संकल्पनांचा लाभ घेता येईल. ते आपल्या शेतमालाची गुणवत्ता सुधारू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Book publication)

देशाच्या जेडीपीमध्ये शेतीक्षेत्राचा वाटा कमी आहे. तो वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. शेतकरी उत्पादन वाढीसाठी खर्च करतात. प्रचंड कष्ट करतात. पण त्यांना उत्पन्न कमी मिळते. देशाची लोकसंख्या वाढत आहे पण शेतीसाठी जमीन कमी होत चालली आहे. पायाभूत सुविधा, उद्योगधंद्यासाठी शेतजमिनीचा वापर होत आहे. अशावेळी शेतीमधून जास्त उत्पादन घेण्यासाठी माती परीक्षण केले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अमित नलावडे यांनी केले.

हेही वाचा :

वाद सोडवण्यासाठी मध्यस्थीचा पर्याय महत्त्वाचा
 दूधभेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर पाऊल

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00