नवी दिल्ली : दिल्लीतील रोहिणी जिल्ह्यातील प्रशांत विहार परिसरात स्फोटाच्या आवाजाने परिसरातील लोक घाबरले आहेत. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच जिल्हा पोलिसांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, ‘एनएसजी’ची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी करून नमुने घेतले आहेत. (Diwali 2024)
दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासात ‘एनएसजी’चा सहभाग होण्यापूर्वी रोहिणीच्या प्रशांत विहार परिसरात असलेल्या ‘सीआरपीएफ’ शाळेबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतर ‘एनएसजी’ने घटनास्थळ आपल्या ताब्यात घेतले आहे. फॉरेन्सिक म्हणजेच ‘एफएसएल’ टीम घटनास्थळी पोहोचली आणि नमुने घेतले. श्वानपथक पथकानेही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. याशिवाय काही वायरसारख्या वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.
दिल्ली प्रशांत विहारमधील ‘सीआरपीएफ’ शाळेबाहेर झालेल्या स्फोटाचा प्रत्यक्षदर्शी शशांक म्हणाला, ‘‘स्फोट झाला तेव्हा आम्हाला असे वाटले, की सिलिंडरचा स्फोट झाला आहे किंवा इमारत कोसळली आहे. एक मोठा ढग होता. येथे सुमारे १० मिनिटे धुराचे लोट होते. स्फोटामुळे दुकानांच्या काचा फुटल्या आणि होर्डिंग्स उन्मळून पडले. क्राइम ब्रँच, पोलिस ठाणे आणि जिल्हा न्यायालय जवळ असल्याने दिल्ली पोलिस पाच मिनिटांत येथे पोहोचले. कोणालाही दुखापत झाली नाही हे चांगले आहे.”
दिल्लीतील रोहिणी जिल्ह्यातील प्रशांत विहार भागातील ‘सीआरपीएफ’ शाळेबाहेर रविवारी सकाळी सात वाजता स्फोट झाल्याची घटना उघडकीस आली. स्फोटापूर्वी दिल्ली पोलिस आणि दिल्ली अग्निशमन सेवा विभागाला याबाबत माहिती मिळाली होती. पोलिसांना घटनास्थळावरून काहीही मिळालेले नाही. स्फोटाच्या आवाजामुळे आजूबाजूच्या वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. दरम्यान, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून नमुने घेतले आहेत. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता राष्ट्रीय राजधानीत हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांचे पीआरओ संजय त्यागी म्हणाले, की आज सकाळी प्रशांत विहार पोलिस ठाण्याला ‘सीआरपीएफ’ शाळेजवळ भीषण स्फोट झाल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. शाळेच्या आवारातील खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली. (Diwali 2024)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्रीपासून आज सकाळी ९ वाजेपर्यंत ‘सीआरपीएफ’ शाळेच्या आजूबाजूला असलेल्या मोबाइल टॉवरवर किती फोन कॉल्स आले याचा डेटा स्कॅन करण्यात पोलिसांची टीम व्यस्त आहे. याशिवाय पोलिस संपूर्ण परिसराच्या डंप डेटाचेही विश्लेषण करणार आहेत. जेणेकरून या घटनेमागे कोण आहे हे कळू शकेल.
दहशतवाद्यांचे कारस्थान
या प्रकरणात दिवाळीपूर्वी दहशतवादी कारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दिल्लीतील बाजारपेठांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा :
- बिद्रीच्या ऊस उत्पादक सभासदांची दिवाळी गोड
- ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश
- कोल्हापुरातील भाजपचे दोन उमेदवार समोर