वॉशिंग्टन : फायरफ्लाय एरोस्पेसचे ब्लू घोस्ट मून लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सुखरूप उतरले. अंतराळ संशोधनातील हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. ते अचूक उतरल्याने चंद्राच्या शोधाच्या एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. कारण ‘ब्लू घोस्ट’ चंद्राच्या आतापर्यंत दुर्लक्षित बाबींचा शोध घेणार आहे. अशा तीन अंतराळयानांपैकी ते पहिले आहे. शिवाय ब्लू घोस्ट मोहीम ही सखोल अंतराळ संशोधनात खासगी गुंतवणुकीचीही सुरुवात आहे. चंद्रावर मानवी वस्ती करण्यासाठी ‘नासा’कडून सुरू असलेल्या कार्यक्रमाचाही तो एक महत्त्वपूर्ण भाग आहे.(Blue Ghost) ब्लू घोस्ट मोहीम भविष्यातील चांद्रमोहिमांसाठी पथदर्शी ठरणार आहे. ही मोहीम अनेक उद्दिष्ट्ये साध्य करणार आहे.
ब्लू घोस्टच्या मुख्य प्रयोगांपैकी एक म्हणजे चंद्राच्या उष्णतेच्या प्रवाहाचे निरीक्षण. ते त्याची थर्मल उत्क्रांती समजून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. भविष्यातील चांद्रमोहिमांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे चंद्रावरील शाश्वत अधिवासांच्या व्यवहार्यतेची पडताळणी करता येणार आहे.
लँडिंग करताना चंद्राच्या रेगोलिथची इंजिनच्या प्लम्सवर काय रिॲक्शन असते याचाही अभ्यास ब्लू घोस्ट लँडर करेल. लँडिंग करताना धूळ आणि माती कशी उडते याचे परीक्षण करून हे अभियान भविष्यात चंद्रावर अंतराळयान उतरवण्यास मदत करेल. (Blue Ghost)
चंद्राच्या चुंबकीय आणि विद्युत क्षेत्रांबद्दल माहितीही ते गोळा करेल, ज्यामुळे शास्त्रज्ञांना चंद्राच्या भूगर्भीय भूतकाळाबद्दल मौल्यवान माहिती मिळेल. या क्षेत्रांची माहिती भविष्यातील चांद्रमोहिमांसाठी मार्गदर्शक करू शकते. तसेच शास्त्रज्ञांना चंद्राच्या इतिहासाची चांगली माहिती देऊ शकते. (Blue Ghost)
वैज्ञानिक प्रयोगांव्यतिरिक्त, ब्लू घोस्ट त्याच्या तांत्रिक क्षमतांचे प्रात्यक्षिक सादर करेल. चंद्रावरील घाण विविध पृष्ठभागावर चिकटू शकते का याची चाचणी करणारा हा प्रयोग असेल. भविष्यातील मानवी अधिवासांसाठी असा प्रयोग महत्त्वपूर्ण ठरतो.
ब्लू घोस्टच्या मोहिमेचा एक भाग म्हणजे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची एक्स-रे छायाचित्रे काढणे. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि सौर किरणोत्सर्ग यांच्यातील परस्परसंबंधाबद्दलची माहिती मिळेल. ती अवकाशातील हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आणि मोठ्या सौर मंडळाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक आहे. (Blue Ghost)
ब्लू घोस्ट मोहीम सुमारे १४ दिवसांची आहे. त्या काळात ते अनेक महत्त्वाच्या वैज्ञानिक चाचण्या करेल. त्यात चंद्राच्या क्षितिजाच्या प्रकाशाचे हाय-डेफिनिशन व्हिडिओिंगचा समावेश आहे. अंतराळवीरांनी ५० वर्षांपूर्वी अपोलो मोहिमेदरम्यान हे चित्रण पाहिले होते. म्हणून ब्लू घोस्टचे फुटेज चंद्राच्या अभ्यासात एक महत्त्वपूर्ण प्रगती ठरणार आहे. (Blue Ghost)
ब्लू घोस्टची कामगिरी अवकाश संशोधनात वाढत्या खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीवर भर देते. विशेषतः ‘नासा’ आर्टेमिस मोहिमेसाठी व्यावसायिक सहयोगींवर अवलंबून असल्याच्या पार्श्वभूमीवर ते महत्त्वाचे ठरणार आहे. फायरफ्लाय एरोस्पेसच्या या यशामुळे चंद्र संशोधन आणि या क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी परवडणाऱ्या आणि नाविन्यपूर्ण खासगी क्षेत्रांना प्रोत्साहन मिळणार आहे.
हेही वाचा :