Home » Blog » Blast near Red Fort in Delhi : दिल्लीत लाल किल्ल्याजवळ कारमध्ये स्फोट ; आठ ठार

Blast near Red Fort in Delhi : दिल्लीत लाल किल्ल्याजवळ कारमध्ये स्फोट ; आठ ठार

by प्रतिनिधी
0 comments
Blast near Red Fort in Delhi

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ कारमध्ये झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून अंदाजे २४ जण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे आग लागली असून तीन ते चार वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना चांदणी चौकातील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांकजवळ ही घटना सात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर दिल्लीत हाय अलर्ट देण्यात आला आहे. (Blast near Red Fort in Delhi)

जखमींना लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले आहे. जखमीपैकी आठ जणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे हॉस्पिटलचे अधिक्षकांनी एएनआयला सांगितले आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. दिल्ली पोलिस दलातील विशेष कक्षाची एक टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.  दिल्ली उपमुख्य अग्निशमन अधिकारी ए.के. मलिक यांनी एएनआयला सांगितले. “चांदणी चौक मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही तातडीने मदतकार्य सुरू केले आणि सात पथके घटनास्थळी पाठवण्यात आली. संध्याकाळी ७.२९ वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आमचे सर्व पथक घटनास्थळी उपस्थित आहेत.” (Blast near Red Fort in Delhi)

” मला स्फोटाचा मोठा आवाज आला. मी माझ्या घरातून आगीच्या ज्वाळा पाहिल्या आणि मग काय झाले ते पाहण्यासाठी खाली आलो.. ” असे स्थानिक रहिवासी राजधर पांडे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.”मी माझ्या आयुष्यात कधीही इतका मोठा स्फोट ऐकला नव्हता. स्फोटामुळे मी तीन वेळा पडलो. असं वाटलं की आपण सर्वजण मरणार आहोत…” एका स्थानिक दुकानदाराने सांगितले.

दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले: “आम्ही जवळ आलो तेव्हा रस्त्यावर मृतदेहांचे तुकडे पसरलेले दिसले. काय झाले हे कोणालाच कळले नाही. अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे”. तो पुढे म्हणाला: “जेव्हा आम्हाला रस्त्यावर कोणाचा तरी हात दिसला तेव्हा आम्हाला खूप धक्का बसला. मी ते शब्दात सांगू शकत नाही.” (Blast near Red Fort in Delhi)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00